Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

संपादकीय : पर्यावरण संवर्धन

 संपादकीय 

पर्यावरण संवर्धन 



ध्याचे युग हे तंत्रज्ञानी आहे. मागील दोन वर्षात आपल्याला पर्यावरण, निसर्ग हे काय आहे आणि ते का जपावे हे कळालेच असेल . मागील वर्षी २०२० मध्ये कोरोना सारख्या मोठ्या महामारीचे संकट अख्ख्या जगात पसरले होते ह्यात रुग्णांना गरज भासत होती ती प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची मात्र आपल्याच दोषांमुळे, चुकांमुळे आपलाच अंत झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही ‌ हे का झाले ? हे कदाचित लोकांना माहिती नसावे. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी घेऊ शकतो ह्यामुळे हे झाले असावे. वृक्षतोड हे ह्याचे मुख्य कारण आहे. लहानपणापासून ऐकता - वाचता की वनस्पती सजीव आहेत. सुर्याच्या प्रकाशामार्फत ते श्वास घेतात. मग सजीवाने सजीवाचीच हत्या का करावी ? झाडांपासून आपल्याला प्राणवायू मिळतो परंतु आपण अनेक कारणांसाठी वृक्षतोड करतो परंतु वृक्ष लागवड करत नाही. या कारणांमुळे कोरोना स्थितीत अनेक रूग्णांना प्राणवायूचा तुटवड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही तुमच्या घराच्या फर्निचरसाठी पक्ष्यांचे घरे उद्ध्वस्त करून वृक्षतोड करून आपले घरे बांधतात. तुम्हाला राहायचा हक्क आहे त्याचप्रमाणे त्यांचाही ह्या जमिनीवर , आकाशावर , निसर्गावर राहण्याचा विसावण्याचा हक्क आहे. झाडे नसल्याने अनेक मोठ्या - मोठ्या शहरांतून पक्षी नाहीसे झाले आहेत. निसर्गाचे संतुलन बिघडले असल्याने सृष्टीचा कारभारही बिघडला आहे असे अनेकदा अनुभवते. पृथ्वीच्या अंतरंगात , भूगर्भात उष्णता वाढल्याने हिवाळ्यात, पावसाळ्यातही अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा पडतात. ह्यामुळे पावसाळ्यात सुध्दा अनेकदा पाऊस गैरहजर असतो यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई, दुष्काळ यांसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत असतात. भूभागात उष्णता वाढण्याचे कारण रस्ताही असावा. रस्ता बनवतान काँक्रीट , डांबर यांचे मिश्रण योग्य पद्धतीने नसते. यामुळे रस्ते अधिक उंच किंवा जाड बनतात व रस्त्यावर अनेकदा अनेकवेळा डांबर टाकले जाते ह्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. ह्यामुळे भूभाग थंड होत नाही. ह्याचे हे कारण असू शकते. 

   भारत जरी तंत्रज्ञान आणि प्रगती साध्य केलेला देश असला तरीही पर्यावरण संतुलित राखण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वर्षातून फक्त ५ जून रोजी सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वृक्षारोपण करतात परंतु नंतर रोपाकडे कोणीही लक्ष देत नाही. काही पर्यावरण, निसर्ग प्रेमी अनेकदा वृक्षारोपण करतात व निसर्गाने दिलेल्या असंख्य गोष्टींचा मोबदला देतात‌ परंतु प्राणवायू, निसर्गाचे सान्निध्य इ. ह्या सर्व गोष्टींची गरज आपल्या सर्वांना आहे. लोक जसे गरज नसलेल्या कार्यक्रम, वाढदिवस शुभारंभ इ. साठी हजेरी लावतात सहभाग घेतात त्याचप्रमाणे सहभाग घेणारे व आयोजित करणाऱ्यांनी सुध्दा वृक्षारोपणाच्या , स्वच्छता अभियानाच्या इ. कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी व्हायला हवे. सर्वात पहिले हवा प्रदुषणामुळे निसर्गात व माणसांमध्ये विविध आजार पसरले आहे. वाहनांच्या निघणाऱ्या धुरामुळे निसर्गाच्या स्वच्छ हवेत दुषित हवा प्रस्थापित होते . यामुळे आपल्याला दुषित हवा मिळते व अनेक आजार शरीरात पसरतात. वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण होते. सरकारने इंधन जाळणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी आणायला हवी. वाहनांमुळे शहरात वाहनांची कोंडी होते. नागरिकांनी इंधन जाळणाऱ्या वाहने सोडून सायकल वापरणे सरु केले पाहिजे. सायकल वापरल्याने माणसांचे स्वास्थही सुदृढ राहील तसेच होणारे प्रदुषणही थांबेल . भारतातील युवा पिढीने वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. आणि तो त्यांनी घ्यावाच.

लेखक :- प्रसाद भालेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...