निकाल 2025: बारावी- दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा २०२५ यंदा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आल्या. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
त्यांच्या मते, गुणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल ५ मे ते ७ मे दरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मे ते १८ मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
बोर्डाने सांगितले की, निकाल वेळेआधी घोषित करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा उद्देश आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण होणार नाही याची खात्री देण्यात आली आहे.
शासनाच्या सूचना:
- प्रवेशासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी वेळेआधीच अर्ज करा.ऐनवेळी धावपळ होणार नाही याची काळजी घ्या
- दिशाभूल होणार नाही याची खबरदारी घ्या. कोणत्याही खाजगी संस्थेच्या अमिषाला बळी पडू नका.
- शाळा व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे गरजेचे आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
निकाल पाहण्यासाठी आपला आसनव्यवस्था क्रमांक व आईचे नाव लिहा.