Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २८ जुलै, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात सुवर्ण महोत्सवी कारगिल दिन उत्साहात



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २६- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात २६ नोव्हेंबर हा सुवर्ण महोत्सवी कारगिल विजयदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी देशासाठी शहीद झालेले भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त फौजी विजय विधाते, मनोज खापरे, उपसरपंच सचिन मोगल, प्राचार्य दवंगे, उपमुख्यद्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या हस्ते करण्यात आले सुवर्ण महोत्सवी कारगिल विजय दिनानिमित्ताने कारगिल युद्धाविषयी सविस्तर माहिती यावेळी फौजी विजय विधाते व मनोज खापरे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी कारगिल विजयदिन साजरा करण्यामागचा हेतू विशद करून सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय जवान विषयी प्रेम, सदभाव व आदर राखून आपल्या अधिकाराचा बरोबरच कर्तव्याची जाणीव करून दिली याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी तर आभार भारत मोगल यांनी मानले

 

बुधवार, २४ जुलै, २०२४

मनपा प्रशासन करतेय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना ब्लॅकमेल?




नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी होत आहे. महायुती सरकारचे संपर्क कार्यालये , सेतु कार्यालय तसेच इतर सरकारने नियुक्त केलेल्या ठिकाणी ह्या नोंदण्या होत आहे. अश्यातच नाशिक महानगरपालिकेने अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांच्यावर सुद्धा हि जबाबदारी लादली असून अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितले आहे व लाडकी बहिण योजनेचे काम करण्यासाठी सक्ती करण्यात आली असून जर लाडकी बहिण योजनेचे काम केले नाही तर अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांची वार्षिक मुदतवाढ तसेच मानधन देण्यात येणार नाही व त्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कारणे दाखवा ( Show Cause Notice ) नोटीस बजावण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. ह्यामुळे महिलांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण होऊन संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे की एकीकडे भाऊराया जवळ करतो आणि दुसरीकडे गरीब बहिणींच्या पोटावर पाय देतो का ? असा प्रश्न उपस्थित होतो. अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वार्षिक मुदतवाढ मिळाल्यानंतर दरमहा मानधन काढण्यात येते. आणि अनेक वर्षांपासून मनपा प्रशासन अंगणवाडी सेविकांच्या मानधन देण्यास दिरंगाई करते किंवा वार्षिक मुदतवाढ देण्यास विलंब करते ह्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. सदरील महिला ह्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून अनेक महिलांना ऑनलाईन फॉर्म भरणे हे अवघड जात आहे आणि त्याचमुळे महिला आपल्या अंगणवाड्या भरवतात व आपल्या परीसरातील महिलांना सदरील योजनेसंदर्भात माहिती देतात. 

  सदरील अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या प्रत्येक सर्वेक्षणात , मतदानाच्या कामांमध्ये व इतर शासनाने नेमून दिलेल्या कामांमध्ये नेहमीच सक्रिय असतात परंतु त्यांची मानधनाच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी केली जाते किंवा दिरंगाई केली जाते. ह्याबाबत अनेकवेळा पत्रकार परिषदेत, सामाजिक माध्यमांमध्ये व इतर स्वरूपात त्या महिलांची स्थिती दर्शवली गेली आहे परंतु त्या स्थितीवर नेहमी कानाडोळा केला जातो. आणि ह्यावेळीही तोच प्रसंग पुन्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांच्यावर आला आहे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने होत आले परंतु अजूनही अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांना वार्षिक मुदतवाढ देण्यात आली नाही व जुन , जुलैचे मानधनही देण्यात आले नाही. वार्षिक मुदतवाढ दिल्यानंतरच मानधन देण्यात येत असते. अंगणवाडी प्रकल्पावर कार्यरत अंगणवाडी कर्मचारी ह्यांची आर्थिक परीस्थिती ही अतिशय गंभीर आहे याची कल्पना प्रशासनासह सर्व जनतेला आहे. अनेक अंगणवाड्या ह्या भाडेतत्त्वावर भरत असून ह्याचे भाडे हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातून सेविका व मदतनीस मिळून भरतात. सध्याची महागाई बघता तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून मुलांचा शैक्षणिक खर्च , आरोग्य खर्च व इतर दैनंदिन खर्च हा ह्या मानधनाच्या माध्यमातून होतो. ह्याची कल्पना मनपा प्रशासनास आहे तरीही दरवर्षी अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांना का त्रास होतो ? त्या गरीब महिलांच्या मानधनावर गदा आणण्याचा प्रयत्न का केला जातो ? आणि जर त्यांच्याकडून तुम्हाला जर कोणते विनामूल्य अर्थात त्या कामाचा कोणताही आर्थिक स्वरूपातील मोबदला न देता काम करवून घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांचा मानधनाचा मुद्दा दाखवतात आणि काम करवून घेतात . थोडक्यात मनपा प्रशासन महिलांना ब्लॅकमेल करते का ? किंवा त्यांच्यावर हुकुमशाही गाजवतेय का ? हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

गुरुवार, १८ जुलै, २०२४

शहरस्तरीय निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेच्या २२० विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

शहरस्तरीय निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेच्या २५० विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात 


बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद भालेकर, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट. सुरेश आव्हाड, मराठा समाज ‘सय ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश डापसे , वकील बार असोसिएशनचे माजी संचालक श्री. अतुल लोंढे विद्यार्थी व पालक 



नाशिक, दि. [ १८ जुलै] - शहरातील विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर आणि त्यांच्या समूहाने आयोजित केलेल्या शहरस्तरीय निबंधलेखन आणि काव्यगायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच ( दि. १६ जुलैला संध्या ६:३० वा. ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

सदरील निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धा हि शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती व ह्या स्पर्धेत उदंड प्रतिसाद लाभला व स्पर्धेत सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये नाशिकचे सुप्रसिद्ध ग्राफिक डिझाइनर आणि मराठा समाज 'सय' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे, वकील बार असोसिएशनचे माजी संचालक ॲड. अतुल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व ऋषिकेश (बापू) डापसे यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या निकालात, काव्यगायन विभागात टी.जे.चव्हाण विद्यालयाच्या सरस्वती गटाने प्रथम क्रमांक पटकावला. अंजली संदीप पिंपरकर आणि ज्ञानेश्वरी सचिन जाधव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. निबंधलेखन स्पर्धेत नयन विजय सोनार यांनी बाजी मारली, तर तनिष्का गजानन लोखंडे आणि हर्दिका गोपिनाथ ह्याळीज यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले.

ॲड. सुरेश आव्हाड यांनी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, "कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन अत्यंत उत्कृष्ट होते. सध्याच्या काळात अशा स्पर्धेचे आयोजन करणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्यासपीठ करणे गरजेचे आहे."

श्री. ऋषिकेश (बापू) डापसे यांनी आयोजकांचे कौतुक करताना म्हटले, "कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या समूहाने केले आणि त्यांच्या मनात या वयात ही उत्कृष्ट कल्पना आली याचा मला अभिमान आहे. त्यांच्या कार्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत. त्यांची ही कल्पना सर्वोत्कृष्ट आहे आणि समाजातील मुलामुलींनी यांचा आदर्श घ्यावा."

श्री. विजय खैरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, "आजच्या या स्पर्धेचे आयोजन पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आहे. विशेषतः ही कल्पना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी राबवली, हे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदर निर्माण झाला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढीस लागते. या तरुण पिढीने दाखवलेला उत्साह आणि कर्तृत्व हे नाशिक शहराच्या उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे."

यासोबतच, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आणि व्ही.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप सपकाळ यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ओमकार कुटे, अथर्व तुपे, आदित्य रिकामे , अमित पगार , ओम क्षिरसागर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समारोपप्रसंगी, कार्यक्रमाचे आयोजक तथा नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांनी उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमाद्वारे नाशिकमधील तरुण प्रतिभावंतांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली, त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने सुरू झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कला व साहित्यिक कौशल्याचा उत्सव ठरला.

सोमवार, २७ मे, २०२४

 १० वी बोर्डाच्या परीक्षेत सांजेगावच्या जनता विद्यालयाचा १००% निकाल ! 

Image By Prasad Bhalekar AI 


सांजेगाव :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, सांजेगाव येथील माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४ अर्थात १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील जनता विद्यालय सांजेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे शाळेचा निकाल 100% लागला असून प्रथम पाच विद्यार्थी 

 १) प्रथम क्रमांक

       शुभम अनिल गोवर्धने - ९०.२०%

       कावेरी जीवन गोवर्धने - ९०.२०%

  २) द्वितीय क्रमांक

   प्रल्हाद तानाजी गोवर्धने - ८८.६० %

 ३) तृतीय क्रमांक 

      वृषाली प्रभाकर गोवर्धने - ८६.४०%

 ४) चतुर्थ क्रमांक 

  प्रथमेश भाऊसाहेब गोवर्धने - ८५.८०%

 ५) पाचवा क्रमांक

       विद्या संपत राऊत - ८३ %

 गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पागिरे एस.एस. यांनी व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 मौजे सुकेणे विद्यालयात स्नेहल भंडारे प्रथम 

कु. स्नेहल भंडारे - प्रथम 



कसबे सुकेणे ,वार्ताहर-ता २७ मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात कु स्नेहल विलास भंडारे ८७.८० % गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला विद्यालयाचा निकाल ८८.१७ % लागला असून विद्यालयातील एकूण १८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १६४ विद्यार्थी पास झाले असून विशेष प्राविण्य वर्गात ३०, प्रथम श्रेणीत ६३, द्वितीय श्रेणीत ४९ तर पास श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम पाच क्रमांक (१) स्नेहल विलास भंडारे ८७.८०) (४३९/५००)

(२) श्रुती दिलीपकुमार बोरा (८७.२०)(४३६/५००)

(३)धनश्री चंद्रकांत पागेरे (८६.६०)(४३३/५००)

(४) अश्विनी जनार्धन भंडारे (८५.२०)(४२६/५००)

(५) रसिका विक्रम शिंदे (८४.६०)(४२३/५००)

 गुण मिळवत उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिररसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख, प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे,स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे,मोतीराम जाधव, सर्व स्कूल कमिटीचे सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

 १० वी बोर्डाच्या परीक्षेत जनता विद्यालयाचा १०० % निकाल ! 

विद्यार्थी ठरले उत्कृष्ट गुणवत्तेचे शिलेदार 

Image By:- Prasad Bhalekar, AI. 



नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय गोरेराम लेन येथील इयत्ता १० वी मार्च २०२४ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल १००% लागला असून परीक्षेला एकूण प्रविष्ट विद्यार्थी-१२२

पास विद्यार्थी-१२२ , विशेष श्रेणी -९० , प्रथम श्रेणी -३० , द्वितीय श्रेणी -२ 

मार्च २०२४ परीक्षेत विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी-

 1) हर्षिता प्रशांत शेलार - ९६.४०


2) प्रियंका नंदकिशोर शेळके - ९५.८०


3) वैष्णवी प्रताप गायकवाड - ९४.६० 


4) कलश रामेश्वर कदम -९३.८० 


5) पायल पंडित कालेकर - ९३.२०

अशी गुणवत्तेच्या शिलेदारांची उत्कृष्ट टक्केवारी आहे. ह्या

गुणवंत विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षिरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष श्री.रावसाहेब मोरे, व सर्व शालेय समिती सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.एम.एस. डोखळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

रविवार, २६ मे, २०२४

महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

 




महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

     महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान ह्या नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हास्तरीय खुली

१) लोकगीत गायन स्पर्धा(एकल व सांघिक)

२) पोवाडा गायन स्पर्धा (एकल व सांघिक)  

३) काव्यलेखन स्पर्धां (खुली/एकल)


 इ .स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांघिक स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क नाममात्र रु.१००/- असून एकल स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क रू.२०/- तर काव्य लेखन स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क रु.५०/- ठेवण्यात आलेले आहे.


सांघिक स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.१०००/- ;द्वितीय रू.७००/- ; तृतीय रू.५००/- असून एकल स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम रू.४००/- , द्वितीय रू.३००/-, तृतीय रू.२००/- असून स्पर्धेतील सहभागी सर्व कलावंतांना/स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.

   नाव नोंदणी,स्पर्धेच्या अटी,नियम साठी तसेच कविता पाठविण्यासाठी सरचिटणीस अशोक भालेराव,प्रेस कॉलनी,गांधीनगर नाशिक-६ ह्या पत्यावर (मो.नं.९२२६० ३२८९८) किंवा जिल्हा सचिव मनोहर नेटावटे मो.नं.९७६७५२१०५० यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थाध्यक्ष शा.

सुरेशचंद्र आहेर,उपाध्यक्ष उत्तम गायकर,कोषाध्यक्ष अनिल मनोहर, जिल्हाध्यक्ष संपत खैरे,श्रीकांत श्रावण,

रेखा महाजन,देवचंद महाले,राजेंद्र वावधने इ.नी केले आहे.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...