Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, १८ जुलै, २०२४

शहरस्तरीय निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेच्या २२० विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

शहरस्तरीय निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेच्या २५० विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात 


बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद भालेकर, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट. सुरेश आव्हाड, मराठा समाज ‘सय ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश डापसे , वकील बार असोसिएशनचे माजी संचालक श्री. अतुल लोंढे विद्यार्थी व पालक 



नाशिक, दि. [ १८ जुलै] - शहरातील विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर आणि त्यांच्या समूहाने आयोजित केलेल्या शहरस्तरीय निबंधलेखन आणि काव्यगायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच ( दि. १६ जुलैला संध्या ६:३० वा. ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

सदरील निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धा हि शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती व ह्या स्पर्धेत उदंड प्रतिसाद लाभला व स्पर्धेत सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये नाशिकचे सुप्रसिद्ध ग्राफिक डिझाइनर आणि मराठा समाज 'सय' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे, वकील बार असोसिएशनचे माजी संचालक ॲड. अतुल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व ऋषिकेश (बापू) डापसे यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या निकालात, काव्यगायन विभागात टी.जे.चव्हाण विद्यालयाच्या सरस्वती गटाने प्रथम क्रमांक पटकावला. अंजली संदीप पिंपरकर आणि ज्ञानेश्वरी सचिन जाधव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. निबंधलेखन स्पर्धेत नयन विजय सोनार यांनी बाजी मारली, तर तनिष्का गजानन लोखंडे आणि हर्दिका गोपिनाथ ह्याळीज यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले.

ॲड. सुरेश आव्हाड यांनी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, "कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन अत्यंत उत्कृष्ट होते. सध्याच्या काळात अशा स्पर्धेचे आयोजन करणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्यासपीठ करणे गरजेचे आहे."

श्री. ऋषिकेश (बापू) डापसे यांनी आयोजकांचे कौतुक करताना म्हटले, "कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या समूहाने केले आणि त्यांच्या मनात या वयात ही उत्कृष्ट कल्पना आली याचा मला अभिमान आहे. त्यांच्या कार्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत. त्यांची ही कल्पना सर्वोत्कृष्ट आहे आणि समाजातील मुलामुलींनी यांचा आदर्श घ्यावा."

श्री. विजय खैरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, "आजच्या या स्पर्धेचे आयोजन पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आहे. विशेषतः ही कल्पना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी राबवली, हे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदर निर्माण झाला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढीस लागते. या तरुण पिढीने दाखवलेला उत्साह आणि कर्तृत्व हे नाशिक शहराच्या उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे."

यासोबतच, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आणि व्ही.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप सपकाळ यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ओमकार कुटे, अथर्व तुपे, आदित्य रिकामे , अमित पगार , ओम क्षिरसागर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समारोपप्रसंगी, कार्यक्रमाचे आयोजक तथा नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांनी उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमाद्वारे नाशिकमधील तरुण प्रतिभावंतांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली, त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने सुरू झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कला व साहित्यिक कौशल्याचा उत्सव ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...