Join The WhatsApp group
शनिवार, २९ जुलै, २०२३
धक्कादायक ! आशा सेविकेवर लोखंडी रॉडने डोक्यावर वार
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
महादेव खुडे लिखित अण्णाभाऊ ; अलक्षित पैलूंचे आकलण' पुस्तकाचे प्रकाशन
महादेव खुडे लिखित अण्णाभाऊ ;
अलक्षित पैलूंचे आकलण'
पुस्तकाचे प्रकाशन
( नाशिक ता.२८ ) प्रगतिशील लेखक संघ नाशिक व इप्टा नाशिकच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चळवळीतील कार्यकर्ते लेखक महादेव खुडे लिखित 'अण्णाभाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन' पुस्तकाचा प्रकाशन सुप्रसिद्ध कवीइतिहास तज्ञ नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त समाधान महाजन यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगतिशील लेखक संघ राज्य सचिव तथा 'पुरोगामी ' कादंबरीचे लेखक राकेश वानखेडे हे भुषवणार आहेत. प्रगतिशील लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, असे अनेक सर्जनशील घटकांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी अ लोकवाड:मय प्रकाशन गृह कॉ. राजू देसले उपास्थित राहणार आहे.अरुण घोडेराव प्रगतिशिल लेखक संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे उपस्थित राहणार आहेत.सदर प्रकाशन सोहळात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद पवार व इप्टा नाशिक चे तल्हा शेख यांनी केले आहे. मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी सायं ५ :०० वा. पत्ता :- हुतात्मा स्मारक, बिटको शाळेजवळ , जूना सीबीएस, नाशिक .
बुधवार, २६ जुलै, २०२३
आज आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर मोर्चा
आज आशा गटप्रवर्तकांचा
आझाद मैदानावर मोठा
मोर्चा ! या आहेत मागण्या
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत.
महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांत ७० हजार आशा व ४००० गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीतसुदधा आशा स्वयसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या खालीलाप्रमाणे मागण्या आहेत, त्या विनाविलंब मान्य कराव्यात, ही विनंती. गटप्रवर्तकांच्या मागण्या :-
• राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचान्याइतके काम करावे लागते. तरीसुदधा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळत नाही. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारीत मोबदला मिळतो. तोही अत्यल्प आहे. त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या बाबीचा विचार करुन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व त्यानुषंगाने मिळणारे इतर लाभ देण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करून दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.
• गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु.२५०
सन २०२०-२१ च्या पीआयपीमध्ये मंजुर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकादवारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गट प्रवर्तकांना दिला जात नाही. आशा सॉफटवेअर जरी
सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रील २०२० पासुन प्रति महा रु. २५०/- गट प्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांना वीस दिवस दौरे करून पाच दिवस पी.एच.सी.त अहवाल तयार करावा लागतो. दुर्गम अतिदुर्गम भागात वाहनांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांना दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी. गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या:- ६. आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविकांना दरमहा १८००० रु. व गटप्रवर्तकांना २६००० रु. मानधन देण्यात यावे. १० एप्रील २०२३ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात एप्रील २०२३ पासुन १५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी.
• आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकाचे कामावर आधारीत मोबदल्याचे दर ५-६ वर्षापुर्वी ठरवलेले आहेत. त्यानंतर महागाई दुपटी-तिपटीने वाढली. परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही. वाढलेल्या महागाईच्या
प्रमाणांत कामावर आधारीत मोबदल्याचे दर वाढवुन देण्यात यावे. केंद्र सरकारने 2019पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ केली नाही.त्वरित केंद्र सरकारने मोबदला वाढ करावी.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा.
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. दि. २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी कृति समितीची बैठक झाली. सदर बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्याबाबत, त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्यासाठी आरोग्य विभाग, यशदा व कृति समिती पदाधिकारी यांची समिती गठीत करायचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
• केंद्र निधी (पीआयपी) आणि राज्य निधी मधुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमित पाच तारखेच्या आत देण्यात यावा.
*गट प्रवर्तक ना दररोज सक्तीने आरोग्य उप केंद्रात हजेरी व सेल्फी सक्ती करु नये. सन्मानाची वागणूक द्या
• आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भर पगारी प्रसूती रजा सहा महिना करता देण्यात यावी
•नागरी भागातील अशांचे महिला आरोग्य समिती (MAS) स्थापन असल्यामुळे त्यांच्या मोबदल्यात कपात केली जाते. सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असुन त्यांच्या हयगईमुळे आशांचे नुकसान होत आहे. तेव्हा आशांच्या मोबदल्या काटछाट करु नये.
•आरोग्य वर्धिनी अंतर्गत थुंकी नमुना घेण्याकरीता मोबदला दिला जात नसताना सुदधा आशांना सक्तीने थुंकी नमुना घ्यायला सांगितले जाते. जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत थुंकी नमुना घेण्यासाठी आशांना सक्ती करू नये.
*आशा ना सन्मानाची वागणूक द्या . शहरी आशा, गट प्रवर्तक रिक्त जागा त्वरित भरा. थकीत मानधन मोबदला त्वरित द्या.
•आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना विनामोबदला कामे सांगण्यात येवु नये.
•आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी.
वरील प्रश्नांची सोडवणुक व्हावी, यासाठी दि. २६/०७/२०२३ रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे झाला. मोर्चास एम् ए पाटील, कॉ. राजू देसले, आनंदी अवघडे, निलेश दातखिळे, मुगाजी बुरुड, राजेश सिंग आरमती, आदिनी मार्गदर्शन केले.
रविवार, २३ जुलै, २०२३
मणिपूरात झालेल्या अत्याचाराविरोधात नाशकात मूक मोर्चा
मणिपूरात महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशकात मूक मोर्चा !
नाशिक:- मणिपूर मध्ये झालेल्या क्रुर घटनेमुळे सर्व भारतीयांसमोर एक नवीन आव्हान समोर आले आहे. त्याचा सामना करुना सांविधानिक मूल्य बळकट करणे गरजेचे आहे. यानिमित्ताने विचारपूर्वक नाशिक शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मंगळवार दिनांक २५ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:०० सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळून नेहरू गार्डन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जुने सीबीएस येथे होणार असून तरी संवेदनशील नागरिकांनी या घटनेविरूध्द एकत्र येऊन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवार, १८ जुलै, २०२३
स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार २०२३ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर
स्वातंत्र्य सैनिक कॉ.
माधवराव गायकवाड
जीवनगौरव पुरस्कार
२०२३ माजी मंत्री
बाळासाहेब थोरात यांना
जाहीर
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात |
मोठी बातमी :- नाशिक शहरात बांधलेली जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे सदोष !
मोठी बातमी :- नाशिक शहरात
बांधलेली जवाहरलाल नेहरू
घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे
सदोष ! ; आंदोलनाचा इशारा
नाशिक महापालिकेला दिलेल्या निवेदनात काय म्हटले ?
रविवार, १६ जुलै, २०२३
छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ
छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ
नाशिक: छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नाशिक शाखा वतीने 30 वर्धापदिनानिमित्त व संस्थापक अध्यक्ष कॉ. माधवराव गायकवाड यांच्या ९९ जयंतनिमित्त दि. १६ जुलै २०२३रोजी सकाळीं १० वा. संस्था सभासद, ठेवीदार गुणवंत पाल्यांना सत्कार संस्थेच्या मेघदूत शॉपिंग सेंटर नाशिक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुनील ढिकले व कार्याध्यक्ष पदी मा. नारायण शेठ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सभासद सुवर्णा देसले यांना पी एच डी प्राप्त पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी प्रमूख म्हणून मार्गदर्शन करताना डॉ ढिकले यांनी छत्रपती नाशिक जिल्हा पतसंस्था 30वर्षा पासून नाशिक जिल्हा मध्ये सर्वसामान्य सभासदांना पुरवठा करून विकासाला चालना देत आहे. या बद्दल अभिनंदन केले. ८ शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्या सैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या कार्याला सलाम केला. संस्थेच्या हा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ नक्कीच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पत संस्था फेडरेशन नवं निर्वाचित जिल्हा अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी केले. नारायण वाजे यांनी सहकार चळवळीतील सभासद चे महत्व सांगितले. छत्रपती पतसंस्था चांगले काम करतं आहे. या बद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अॅड.साधना गायकवाड होत्या. त्यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे सहकार शेत्रातील कार्याची माहिती दिली. पुढील वर्ष कॉ.माधवराव गायकवाड यांचे 100वा. जयंती आहे. या निमित्ताने शेतकरी, कामगार, सहकार विषयावर मंधन आयोजित करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आनंद वेक्त केला.मंचावर व्हा.चेअरमन अॅड. शिवाजी जाधव, संचालक अॅड. दत्ता निकम, कॉ. राजू देसले, धर्मेंद्र जाधव, भागवत पाटील, श्याम गरुड, ओझर वेवस्थपक अण्णा गुर्गुडे, चारुदत्त पवार प्रा.सोमनाथ मुठाळ, अॅड. रिकब जैन संस्थेचे सभासद, अल्प बचत खातेदार, ठेवीदार उपास्थित होतें
सूत्र संचलन संचालक राजू देसले यांनी केले प्रास्ताविक चारुदत्त पवार यांनी केले. आभार शशिकिरन साखला यांनी केले. स्वागत भालचंद्र देसले, किरण मालुंजकर, राकेश वालझडे, रामदास बेंडकोली , रोहित कर्पे,
श्रीमाल यांनी केले.
आपले
ॲड दत्ता निकम कॉ राजू देसले संचालक
चारुदत्त पवार वेवस्थापक
अल्प बचत प्रतिनिधि कर्मचारी कर्मचारी वर्ग
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...
-
नाशिक महानगरपालिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि राजकीय ...
-
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी हो...
-
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...