Kids Corner

स्मार्टशाळा – मिशन गुप्त कोड
अर्जुन नावाचा एक हुशार, पण थोडा शांत स्वभावाचा मुलगा होता. तो नेहमी संगणक, कोडिंग आणि रहस्यांची पुस्तकं यामध्ये गुंतलेला असायचा. त्याच्या शाळेत नवीनच एक डिजिटल "स्मार्ट बोर्ड" बसवण्यात आला होता, ज्याचं नियंत्रण मुख्याध्यापकांच्या लॅपटॉपवरून होतं.
पण काही दिवसांनी शाळेत विचित्र घटना घडू लागल्या. वर्गात अचानक projector सुरू व्हायचा, शिक्षिकेचा आवाज robot मध्ये बदलायचा, आणि एकदा तर बोर्डवर एकच वाक्य झळकलं – "माझा कोड सोडव… नाहीतर शिक्षण थांबेल!"
सर्वजण घाबरले. पण अर्जुनच्या डोक्यात काही तरी वेगळंच चालू होतं. त्याने त्या कोडमधलं पहिलं pattern ओळखलं – तो होता binary कोड!
तो लायब्ररीत गेला, जुन्या CCTV फूटेज तपासले, शाळेच्या Wi-Fi चा ट्रॅफिक trace केला… आणि त्याला सापडलं एक नाव – ZEON!
ZEON म्हणजे कोण? बाहेरचा हॅकर? की शाळेतलाच कोणी?
त्याने रात्री शाळेच्या lab मध्ये चोरून प्रवेश केला… आणि तिथं काय पाहतो? एक माणूस hoodie घालून typing करत होता… आणि…
पुढील भागासाठी “Kids Corner” ला भेट देत राहा!
व्हॉट्सअॅपवर शेअर करा