Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, ७ मार्च, २०२४

जनता विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

WhatsApp Group Join Button

 

जनता विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 



नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला ‌. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या गीत मंचाच्या सुमधुर गायनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस.डोखळे , ज्येष्ठ शिक्षिका एम.एस.पिंगळे व वाय.बी.गायधनी ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे स्वागत तन्वी सुर्यवंशी आणि तन्मयी आवारे हिने केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता , राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुत्रसंचलन तन्वी सुर्यवंशी व तन्मयी आवारे हिने केले. चैतन्य दुसाने आणि श्रेया इंगळे ह्यांनी भाषणे व महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सृष्टी आंधळे हिने केले. ८ वी -ब च्या वर्गशिक्षिका श्रीमती. वाघ.के.एस. ह्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी मेहनत घेतली.

 महिला दिनानिमित्त मुलींसाठी “ह्या” विवाहसंस्थेत मोफत नावनोंदणी 



नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील ३६ वर्षांपासून कार्यरत असलेली सुप्रसिद्ध विवाहसंस्था पुर्णविराम विवाहसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींसाठी विवाह नोंदणीत विशेष सवलत देण्यात येत आहे. मुलींसाठी मोफत नावनोंदणी ८ मार्च ते १८ मार्च २०२४ पर्यंत मुलींसाठी मोफत नावनोंदणी वैध राहील. सर्व प्रकारच्या जाती- धर्माच्या मुलींना ही नावनोंदणी करता येईल. ह्यासाठी पुर्णविराम विवाहसंस्थेचे संचालक श्री. विजय खैरे मो. 9325224586 ह्यावर संपर्क साधावा किंवा पुर्णविराम संस्था , सपट चहासमोर, मेन रोड , नाशिक येथे प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन विजय खैरे यांनी केले आहे.



रविवार, ३ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात मराठी दिन उत्साहात 



कसबे सुकेणे ता २७- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे व मराठी विषय समितीच्या सदस्य शिक्षकांच्या हस्ते शिरवाडकारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वतीने कु इच्छा काळे व कु आयुश गुरगुडे याने तर शिक्षकांमधून श्री बाळासाहेब निफाडे यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली मराठी दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात मराठी गीत, मराठी नाटिका व प्रांजल जाधव हिने पोवाडा सादर केला कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी स्वयं लिखित कविता सादर केल्या सूत्रसंचालन कु सिद्धी वडघुले व अनन्य विधाते यांनी तर आभार कु सृष्टी हळदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 मौजे सुकेणे विद्यालयाला शुद्ध पाण्यासाठी दोन आरो फिल्टर प्लांट

गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

कसबे सुकेणे ता २ मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव बालविकास मंदिर व कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास २१०० विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या हेतूने दोन आरो फिल्टर प्लांट बसविण्यात आले गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन यांच्यावतीने हे दोन आरो फिल्टर प्लांट विद्यालयात बसविण्यात आले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतील पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे या आरो फिल्टर प्लांटचा लोकार्पण सोहळा मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला हे शुद्ध पाण्याचे आरो फिल्टर प्लांट विद्यालयाला मिळवून देण्यासाठी कसबै सुकेणे येथील दाभोळकर द्राक्ष प्रयोग परिवाराचे संचालक व द्राक्षतज्ञ वासुदेव काठे यांच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने जिल्हा वितरक विकास दवंगे व त्यांचे सहकारी संतोष दवंगे व अमोल दवंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आले हे दोन आरो फिल्टर प्लांट जवळपास २ लाख ७० हजार रुपयांचे असून त्यांची क्षमता प्रति ताशी २५० लिटर इतकी आहे सुरुवातीला प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी या दोन आरो फिल्टर प्लांटची आवश्यकता, पालकांची मागणी व आरो फिल्टर प्लांट देण्यासाठी गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन त्यांचे संचालक व ज्यांच्या पुढाकाराने हे आरो प्लांट बसवले गेले त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी द्राक्ष तज्ञ वासुदेव काठे यांनी आरो फिल्टर प्लांट देण्यामागचा उदात्त हेतू विशद केला तर संस्थेचे उपसभापती मोगल यांनी संस्थेच्या वतीने या फाउंडेशनचे आभार मानत स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन सोमनाथ मतसागर यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब भंडारे, दिलीप मोगल, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षक नितीन भामरे आदीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


 जनता विद्यालयात विज्ञान दिन साजरा 



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २८ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध वैज्ञानिक सी.व्ही रमन ह्यांची जयंती तथा राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ८ वी अ च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले ‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोखळे एम.एस. होत्या . व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षिका के.एस.आगळे व एम.एस.पिंगळे होत्या . साक्षी आव्हाड , आकाश पवार , शौर्य जाधव ह्यांनी भाषणे केली‌. व शिक्षिका एम.एस.पिंगळे ह्यांनी विज्ञानाविषयी अधिक माहिती दिली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयुरी कोठावदे व दिपिका लहामगे ह्यांनी केले.

 जनता विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा 




नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर ह्यांची जयंती व मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या गीत मंचाने ६४ कलांचा अधिपती गणपती च्या नामस्मरणाने गणेशस्तुतीचे गायन केले व कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस.डोखळे , ज्येष्ठ शिक्षिका के.एस.आगळे व गायधनी वाय.बी. ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत केले. व प्रतिमेचे पूजन हे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या मुर्तींचे पूजन करण्यात आले. ह्यानंतर गीत मंचाने ही मायभूमी ही कर्मभूमी , शिवस्तुती व पोवाडा ह्या गाण्यांचे सर्वोत्कृष्ट रीतीने सादरीकरण पार पडले. ह्यानंतर समर्थ केदार, वैभवी दराडे व इश्वरी सहाणे ह्यांनी आपली भाषणे सादर केली. आणि ८ वी बच्या कु. श्रेया इंगळे हिने सुध्दा *गड संवर्धन* ह्या विषयावरती आपले मत व्यक्त केले. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन निवेदिता धुमाळ व आभार प्रदर्शन हर्षदा भोये हिने केले. व ९ वी कच्या वर्गशिक्षका उगले एम.एस ह्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

 मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:- ॲड. नितीन ठाकरे 




नाशिक:- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे प्रमुख प्रसाद भालेकर ह्यांच्या वतीने नाशिक शहरात घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेस संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद लाभला . वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 

१) तेजल नंदकुमार निकम - प्रथम क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
२) ओमकार सुरज देवरे - द्वितीय क्रमांक
पेठे विद्यालय, नाशिक
३) कनक अजयकुमार गुप्ता - तृतीय क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
४) उत्तेजनार्थ क्रमांक:- श्रेया दिवाकर इंगळे
जनता विद्यालय गोरेराम लेन, नाशिक

निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१) रोहिणी प्रविण गांगुर्डे - प्रथम क्रमांक
जनता विद्यालय, पवननगर, सिडको
२) संकेत सुनील नागरे - पुरषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक
३) प्रतिक्षा गोरखनाथ बागुल - जनता विद्यालय, पवननगर, नाशिक
४) गौरी संतोष नारखेडे - उत्तेजनार्थ क्रमांक
होरायझन इंग्लिश स्कूल, नाशिक

स्पर्धेच्या आयोजनाचा मुलभूत हेतू हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे हाच होता. स्पर्धा हि ऑनलाईन पद्धतीने पार पडली‌. विजेत्यांचे सन्मानपत्र+ बक्षीस हे त्यांच्या शाळेत पोहचविण्यात येणार आहे. सन्मानपत्राद्वारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नाशिक पूर्व विधानसभाचे आमदार ॲड. राहुल ढिकले, दै.भ्रमरचे संपादक श्री. चंदुलाल शहा , मराठा समाज ‘सय’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे ह्या मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनात आदित्य रिकामे, ओम क्षिरसागर, ओमकार कुटे ह्यांचे सहकार्य मिळाले. 

प्रतिक्रिया 

 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. 
:- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र नाशिक




मुलांच्या विचारांना व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. आणि त्याच हेतूने आम्ही मराठी राजभाषा दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि ह्यात आम्हाला नाशिक शहरातील तमाम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , विद्यार्थी व पालक ह्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
- प्रसाद भालेकर , आयोजक








  किशोर येवले यांनी पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रौप्य पदक जिंकून रचला नवा इतिहास अबू धाबी, 22 डिसेंबर 2024: अबू धाबी, दुबई येथे 18 ते 22 डिस...