सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो :- नितीन ठाकरे
|
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ॲड नितीन ठाकरे, व्यासपीठावर बाळासाहेब क्षिरसागर, विश्वास मोरे, डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे व आदी |
कसबे सुकेणे ता ६- मविप्र संस्थेच्या माध्यमातून केंद्र व जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित माध्यमिक गट केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी उपसभापती डी बी अण्णा मोगल होते तर व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,संचालक शिवाजी पाटील गडाख,संजय अहिरराव,उपसरपंच सचिन मोगल,स्कूल कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अॅड ठाकरे यांनी प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी व अभ्यासाबरोबरच अभ्यास पूरक उपक्रम राबवावे व शिक्षकांनी आधुनिक काळात अपडेट व्हावे असे मत मांडले प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले यावेळी सांस्कृतिक महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपसभापती डी बी अण्णा मोगल, संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके व दौलत जाधव,उपसरपंच सचिन मोगल,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,दिलीप मोगल रामराव मोगल,विष्णुपंत उगले, सुभाषराव हळदे, शाम मोगल, योगेश मोगल, लालु सोनवणे,भाऊराज उगले, माधवराव भंडारे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक श्री भामरे आदी उपस्थित होते परीक्षक म्हणून डॉ दत्तात्रय गोडगे व श्रीम प्रियांका बोचरे यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे वैयक्तिक वादन प्रथम मौजे सुकेणे, द्वितीय शिरवाडे वणी, तृतीय पिंपळगाव व उत्तेजनार्थ होरायझन पिंपळगाव व आहेरगाव,समूहगीत स्पर्धा प्रथम कुंदेवाडी, द्वितीय होरायझन पिंपळगाव,तृतीय होरायझन ओझर ,उत्तेजनार्थ नांदुर्डी व आहेरगाव ,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा प्रथम ओझर, द्वितीय आहेरगाव, तृतीय कुंदेवाडी, उत्तेजनार्थ पिंपळगाव व शिरवाडे वणी तर समूहनृत्य प्रकारात प्रथम ओझर, द्वितीय शिरसगाव, तृतीय निफाड व उत्तेजनार्थ पिंपळगाव व कारसूळ विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे व सोमनाथ मत्सागर यांनी तर आभार श्रीम सुवर्णा ठाकरे व राजेंद्र धनवटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे व सर्व सेवकांनी व स्काऊट विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले