Join The WhatsApp group
शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४
मौजे सुकेणे विद्यालयात जिजाऊ व विवेकानंद जयंती उत्साहात
![]() |
मौजे सुकेणे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी |
कसबे सुकेणे ता १२- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक श्री भामरे व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले व कु संध्या हळदे यांनी अनुक्रमे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची ओळख करून दिली तर शिक्षकांच्या वतीने प्रा ज्ञानेश्वर वाघ व कार्यक्रमाचे अध्यक्ष रायभान दवंगे यांनीही थोर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महान व्यक्तींचे कार्य विशद करत त्यांची जयंती साजरा करण्यामागचा हेतू विशद करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अनन्या विधाते व कु जान्हवी बुरगुडे हिने तर आभार कु सानवी जाधव हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी सातवी अ चे विद्यार्थी व वर्गशिक्षिका श्रीम संगीता थोरात यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
गुरुवार, ११ जानेवारी, २०२४
![]() |
Image By :- Prasad Bhalekar |
हमारे देश का गौरव है युवा...!
:- प्रसाद भालेकर
हमारे देश की शान है युवा ,
हमारे देश का गौरव है युवा ,
हमारे देश का भवितव्य है युवा ,
अच्छे संस्कारों से भरा एक समंदर है युवा || १ ||
देश के भवितव्य के लिये ,
भारत माँ के रक्षा के लिये जान नौछावर करने वाला एक हमारा सिपाई है युवा || २ ||
मरीज कौनसा भी हो कैसा भी हो , मगर उसका हसकर स्वागत करने वाला और आनेवाले रोते हुए मरीज को हसते हुए बिदा करने वाला एक डॉक्टर युवा || ३ ||
देश की उन्नती में कंधा से कंधा मिलाने वाला है युवा
और चाँद, सुरज , तारे उनपर भारत का ध्वज लहराने वाला एक सायंटिस्ट है युवा || ४ ||
स्वामी विवेकानंद इनके विचारोंसे प्रेरणा लेकर हम आगे बढेंगे देश के सभी खिलाडी, बेहतरीन युवा कलाकाओंको, सभी युवा डॉक्टर , सायंटिस्ट और हमारे सिपाई बांधवो को युवा दिन की बहोत बहोत शुभकामनाए एवम् बधाईया...!
शनिवार, ६ जानेवारी, २०२४
सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो :- नितीन ठाकरे
कसबे सुकेणे ता ६- मविप्र संस्थेच्या माध्यमातून केंद्र व जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित माध्यमिक गट केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी उपसभापती डी बी अण्णा मोगल होते तर व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,संचालक शिवाजी पाटील गडाख,संजय अहिरराव,उपसरपंच सचिन मोगल,स्कूल कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अॅड ठाकरे यांनी प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी व अभ्यासाबरोबरच अभ्यास पूरक उपक्रम राबवावे व शिक्षकांनी आधुनिक काळात अपडेट व्हावे असे मत मांडले प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले यावेळी सांस्कृतिक महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपसभापती डी बी अण्णा मोगल, संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके व दौलत जाधव,उपसरपंच सचिन मोगल,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,दिलीप मोगल रामराव मोगल,विष्णुपंत उगले, सुभाषराव हळदे, शाम मोगल, योगेश मोगल, लालु सोनवणे,भाऊराज उगले, माधवराव भंडारे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक श्री भामरे आदी उपस्थित होते परीक्षक म्हणून डॉ दत्तात्रय गोडगे व श्रीम प्रियांका बोचरे यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे वैयक्तिक वादन प्रथम मौजे सुकेणे, द्वितीय शिरवाडे वणी, तृतीय पिंपळगाव व उत्तेजनार्थ होरायझन पिंपळगाव व आहेरगाव,समूहगीत स्पर्धा प्रथम कुंदेवाडी, द्वितीय होरायझन पिंपळगाव,तृतीय होरायझन ओझर ,उत्तेजनार्थ नांदुर्डी व आहेरगाव ,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा प्रथम ओझर, द्वितीय आहेरगाव, तृतीय कुंदेवाडी, उत्तेजनार्थ पिंपळगाव व शिरवाडे वणी तर समूहनृत्य प्रकारात प्रथम ओझर, द्वितीय शिरसगाव, तृतीय निफाड व उत्तेजनार्थ पिंपळगाव व कारसूळ विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे व सोमनाथ मत्सागर यांनी तर आभार श्रीम सुवर्णा ठाकरे व राजेंद्र धनवटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे व सर्व सेवकांनी व स्काऊट विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले
गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
मौजे सुकेणे विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात
वैयक्तिक गायन व समूह नृत्यात अभिनव ओझर प्रथम
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय प्राथमिक गट विभागाच्या सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या केंद्रस्तरीय झालेल्या या स्पर्धेत अभिनव गटातील १४ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गीत गायन व समूह नृत्य प्रकारात सहभाग नोंदवला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, होते प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी संस्थेचा सांस्कृतिक स्पर्धा घेण्यामागचा हेतू विशद केला कार्यक्रमासाठी संस्थेच्या महिला संचालिका सौ शोभाताई बोरस्ते,निसाकाचे माजी चेअरमन भागवत बाबा बोरसते,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,स्कूल कमिटी सदस्य सुभाष हाळदे,रामकृष्ण बोंबले, डॉ रवींद्र जाधव,रामराव मोगल, दिलीप मोगल,डॉ मत्सागर,विष्णू उगले,योगेश मोगल,रामकृष्ण बोंबले,उपसरपंच सचिन मोगल, सरपंच आनंदराव भंडारे,सुरेश घुगे,दिनकर बोडके,अशोक जाधव,भाऊराज उगले, भाऊसाहेब भंडारे,संग्राम मोगल, सरपंच सुरेखा चव्हाण,सुनिता मोगल,निकिता मोगल,अँड निर्मला अरिंगळे,सुवर्णा भंडारे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे,मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ आदींसह स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले अतिथीतींचा सत्कार शालेय प्रशासनाच्या वतीने करण्यात आला यावेळी भागवत बाबा बोरस्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष डी बी मोगल,परीक्षक अर्चना जाब्रस यांनी मनोगत व्यक्त केले या स्पर्धेत वैयक्तिक गीत गायनात अभिनव ओझर प्रथम,होरायझन अकॅडमी निफाड द्वितीय,अभिनव मौजे सुकेणे तृतीय,अभिनव नांदूर मध्यमेश्वर व माळसाकोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर समूह नृत्य प्रकारात अभिनव ओझर प्रथम,आदर्श पिंपळगाव द्वितीय,अभिनव नांदुर्डी तृतीय,अभिनव शिरवाडे वणी व होरायझन निफाड यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले परीक्षक म्हणून दिनकर दांडेकर व अर्चना जाब्रस यांनी काम केले आभार उपप्राचार्य अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
जनता विद्यालयात सावित्रीबाई फुलेंना मानवंदना व विज्ञान प्रदर्शन
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सावित्रीबाई यांच्याबद्दल अनुष्का बघडावे हिने माहिती दिली व साक्षी आव्हाड हिने कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपिका लहामगे व आभार प्रदर्शन प्रिती देशमुख हिने केले यानंतर विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ह्यामध्ये विविध प्रयोगाची विद्यार्थ्यांनी सुसंगतरीत्या मांडणी व त्या प्रयोगामधून मानवी जीवनासाठी कशापद्धतीने सहकार्यक आहे ते मांडले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी.शिंदे व आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
रविवार, २४ डिसेंबर, २०२३
शिक्षकांनी वसा व वारसा घेऊन भविष्यात काम करणे काळाची गरज
मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे सायखेडा येथे सेवापुर्तीत प्रतिपादन
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३ ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी निवृत्तीनंतर दिलेला वसा व वारसा घेऊन जे काम त्यांनी केले ते आपण सर्वांनी भविष्यात करावे त्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांनी केले ते सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीम मंदा झांबरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर होते अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने काम करून पालकांनी पाल्यास शाळेत ज्या विश्वासाने पाठवले असते त्या विश्वासास पात्र झाले पाहिजे असे ते म्हणाल प्रास्ताविक प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी केले .या कार्यक्रमास मविप्रचे उपाध्यक्ष श्री विश्वास मोरे ,उपसभापती श्री डी.बी. मोगल ,निफाड तालुका संचालक शिवाजीराव गडाख ,इगतपुरी तालुका संचालक श्री संदीप गुळवे ,अँड
.जी एन शिंदे ,चार्टर्ड अकाउंटंट श्री आर आर बस्ते, प्रतापराव मोगल, सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, अँड उत्तमराव मोगल, शिक्षणाधिकारी डॉ अशोकराव पिंगळे,शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांतचार्य महाराज, शालेय समिती सदस्य संजय कांडेकर, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जगन कुटे ,ऋषिकेश गणोरे, अविनाश सुकेनकर,पोपट गोराडे, हरिभाऊ खालकर, भाऊलाल कुटे,भास्कर गायखे, मधुकर भोर, बाबाजी गायखे, अँड प्रशांत पाटील,अरुण पाटील, उमेश डुंबरे ,वनसगावचे सरपंच एकनाथ शिंदे ,एकनाथ उशीर ,उपप्राचार्य श्री शरद शेळके उपस्थित होते शालेय गीतमंचने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले .मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे यांचा सहपत्नीक व उपशिक्षिका श्रीम मंदा झांबरे यांचा सहपतिक मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीमती मंदा झांबरे यांच्याकडून संस्थेसाठी मदत म्हणून प्रत्येकी २१ हजाराचा चेक सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीमती मंदा झांबरे यांनी विविध आठवणींना उजाळा देत आठवणी जिवंत केल्या सूत्रसंचालन श्रीम प्रतीक्षा शिंदे व अवधूत आवारे यांनी केले .कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी जीवन केशरी मराठी ...

-
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...
-
आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा नाशिक:- विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे प्रयोग बघतां...
-
शूरवीर मराठा ( स्वरचित कविता ) - कवयित्री :- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे, विद्यार्थिनी - मविप्र संचलित, जनता विद्यालय, पवननगर, नाशिक ( प्र...