Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल कडून जिल्हाधिकाऱ्यांना मराठा आरक्षणांविषयी निवेदन 



 नाशिक:- मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस चघळत असतांनाच सर्वच पक्ष मराठा आरक्षणासाठी एकत्रित येत आहेत ह्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वकील. सुरेश आव्हाड यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना‌ दि. १० रोजी  निवेदन दिले ह्या निवेदनात म्हटले की , 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे मराठा समजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर मार्ग काढून मराठा समजाला कायम स्वरूपी कायद्यामध्ये टिकेल असे व घटणेच्या निकाशाांमध्ये बसेल असे आरक्षण देण्यात यावे. माञ इतर मागास वगीयाांच्या अथवा इतर कुठल्याही घटकांच्या आरक्षणास कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कायम स्वरूपी आरक्षण देण्यात यावे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेली 50% ची मर्यादा शेड्यूल 9 चा वापर करून काढून टाकावी व बिहार, छत्तीसगड तसेच तामीळनाडूच्या धरती वर आरक्षणा मध्ये वाढ करण्यात यावी. गेल्या अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असलेले मुस्लीम तसेच धनगर समाजाचा आरक्षणचा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावावा. यासाठी बिहार राज्या प्रमाणे सर्व घटकांची व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात येऊन ब्राम्हण,ख्रिश्चन,शिख, जैन याांसारख्या प्रत्येक जाती व घटकाला त्यांच्या संख्ये नुसार आरक्षण देण्यात यावे. इतर मागासवर्गीयांना आरक्षणसाठी घालुन देण्यात आलेली क्रिमिलीयर ची मर्यादा वाढून देण्यात यावी. इंम्पेरिकल डेटा लवकारत लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करून इतर मागासवर्गीयांचे थांबविण्यात आलेले राजकीय आरक्षण त्वरीत सरूु करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलर्शीप वेळेत देण्याची व्यवस्था व्हावी. ओबीसीचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा. रेणके आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागु करण्यात येऊन त्याांची अंमलबजावणी व्हावी. जालना मध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तसेच ओ.बी.सी कार्यकर्ते, पदाधीकारी व आमदार याांच्यावर झालेल्या हल्याचा लवकरात लवकर तपास करण्यात येऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. 

        देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी देशाचे नेते सन्मा. श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेलेली नाही.


देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी,अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर साहेब आणि तसेच तमाम ओबीसी संघटनांची मागणी आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करत जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी.अशी मागणी करण्यात आली.यावेळी

जिल्हाध्यक्ष ॲङ सरेश रा. आव्हाड, शहराध्यक्ष श्री. छबु नागरे,प्रकाश माळोदे,लता वालझाडे,ॲड.सुभाष गिते,भारती चित्ते,ॲड.संदीप दंडगव्हाण,आबा पाटील,बन्सिलाल भागवत,जाकीबा शेख,राजेंद्र परदेशी,शाम परदेशी,सुफिया शेख,संतोष आव्हाड,महेंद्र चव्हाण,किरण गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३











बळीराजा गौरव दिनानिमित्त आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा 


नाशिक:- तमाम शेतकरी -शोषित-कष्टकऱ्यांचा आदर्श असलेल्या बळीराजाला अभिवादन करण्यासाठी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिकच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा आयोजित करीत आहोत.

अ) आकाश कंदील स्पर्धा

आपल्याला शक्य होईल त्या आकारात आकाश कंदील बनवावा.त्यावर "ईडा पीडा टळो-बळीराज्य येवो" असे घोषवाक्य टाकावे.गुगलवरुन बळीराजाचे चित्र मिळवून ते टाकावे.

याव्यतिरिक्त वेगळेपण आणण्यासाठी आणखी घोषवाक्य,वेगळी डिझाईन्स अथवा आणखी काही सजावट तुम्ही करु शकता.

आकाश कंदील बनवल्यावर त्याचा फोटो काढून संयोजकांकडे ९४२११७६४८५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत पाठवावा. त्यानंतर त्यातील उत्कृष्ट व आशयपूर्ण कलाकृतीला निरीक्षक भेट देतील व‌ बलिप्रतिपदेच्या  दिवशी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.

पारितोषिक पुढीलप्रमाणे असतील:

प्रथम - ३०००/-

द्वितीय -  २०००/-

तृतीय - १०००/-

सहभागी सर्वांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात येईल.


--------------------------------------


ब) रांगोळी स्पर्धा

या स्पर्धेत भाग घेण्याकरिता दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत ९४२११७६४८५ या नंबरवर फोन करून सहभागिता कळवावी.

वरीलप्रमाणे "ईडा पिडा टळो- बळीराजा येवो" हे घोषवाक्य आवश्यक त्याव्यतिरिक्त बळीराजाचे चित्र जमेल तसे रेखाटण्याचा प्रयत्न करा किंवा इतर डिझाईन्स तयार करावे.

सहभाग नोंदवलेल्या नागरिकांनी रांगोळीचा फोटो काढून ९४२११७६४८५ या क्रमांकावर बलिप्रतिपदेच्या दिवशी किंवा त्याआधी पाठवावे. त्यातील उत्कृष्ट व आशयपूर्ण कलाकृतीला निरीक्षक भेट देतील व पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील.

स्पर्धेसाठी वयोगट नाही.

पारितोषिक पुढीलप्रमाणे असतील:

प्रथम -  ३०००/-

द्वितीय -  २०००/-

तृतीय -  १०००/-

सहभागी सर्वांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात येईल. असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव कॉ. राजू देसले, नाशिक जिल्हा सचिव कॉ. महादेव खुडे,  नाशिक सचिव तलहा शेख, कॉ. दत्तु तुपे,  विराज देवांग,  आदींनी केले आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क व वयोमर्यादा नाही अधिक माहितीसाठी संपर्क तल्हा शेख मो. ९४२११७६४८५



रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात प्रदूषणमुक्त दीपावलीचे आवाहन 

फटाके न फोडता विद्यार्थी घेणार शालेय शूज

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ याप्रसंगी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ५ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात प्रदूषण मुक्त दीपावली चे आवाहन करण्यात आले यावेळी शालेय पंतप्रधान कु अश्विनी भंडारे हिने विद्यार्थ्यांना चालू वर्षीच्या दीपावलीत प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे फटाके न फोडण्याची शपथ दिली प्राचार्य रायभान दवंगे यांनी विद्यार्थ्यांना चालू वर्षी प्रदूषणमुक्त दिपावली साजरे करण्याचे आवाहन करुन यांनी  विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे होणारे तोटे,ऑक्सीजन चे महत्व ,शुद्ध वातावरणाचे मानवाला होणारे फायदे याविषयी संदेश देऊन प्रदूषण मुक्त दीपावलीचे आवाहन करुन फटाके न फोडता वाचलेल्या पैशांमधून ज्या विद्यार्थ्यांकडे शालेय शूज नाही त्यांनी ते खरेदी करावे असेही आवाहन केले याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांच्या सह उपमुख्यद्यापक अनिल परदेसी पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

  डी बी मोगल उपसभापती मविप्र - प्रदूषण मुक्त दिवाळी काळाची गरज असून विद्यार्थ्यांना भविष्यातील निरोगीमय जीवनासाठी प्रदूषण मुक्त वातावरणाची गरज असून त्यासाठी शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांवर संस्कार होण्याची गरज आहे विद्यार्थी व सर्व सेवकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

मखमलाबाद भागात पाणीटंचाई; महापालिकेसमोर नागरीकांचे आंदोलन 



राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी महानगरपालिकेच्या समोर हंडा कळशी घेऊन व अति. आयुक्त श्री. चौधरी यांना पाण्याची बाटली देऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
       एकीकडे म.न.पा.आयुक्त गंगापुर धरण पूर्ण भरले म्हणुन जलपुजन करता व दुसरीकडे अनेकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन अनेकांना टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.आजही नाशिक शहरातील अनेक भाग प्रामुख्याने पंचवटी मधील मखमलाबाद रोड वरील म.न.पा.कॅालनी,मानकर मळा,स्वामीविवेकानंद नगर,उदय नगर,वडजाईमाता नगर,विद्यानगर, तांबे मळा,प्रथमेश पार्क ,सत्यदेव नगर,काकड नगर,परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.सदरील कमीदाबाने पाणीपुरवठा करुन केवळ कंञाटदारांना फायदा व्हावा यासाठीच क्रुञीम पाणी टंचाई भासवली जात आहे.मोठ्याप्रमाणात खर्च करुन पाण्याच्या लाईन व टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी परिसरातील पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने हा खर्च केवळ राजकीय नेते,कंञाटदार,अधिकारी,यांच्या फायद्यासाठीच करण्यात आल्याचे आरोप यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी केले असुन पाणीपुरवठा होत नसला तरी हजारो रुपये पाण्याची बिले येत असुन सदरील प्रकार हा निंदणीय असुन जो पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही,तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे पाणीबिले आकारण्यात येऊ नये.त्वरित सदरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 निवेदनात म्हटले आहे की,दिनांक २०/०७/२०२३ रोजी म.न.पा.प्रशासणास जाग यावी यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले होते,सदरील आंदोलणाची दखल घेऊन म.न.पा.मार्फत सत्यदेव नगर,काकडनगर,महादेव बाग,तांबे मळा आदी परिसरात पथदिपे बसविण्यात आली असुन अजून ही इतर भागात पथदिपे बसविण्याची गरज आहे.तसेच श्रीक्रुष्ण नगर, महादेव बाग,सत्यदेव नगर,काकड नगर, महाडा कॅालनी,मानकर मळा आदी परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे शक्य नसेल तर किमान खडीकरण तरी त्वरीत करण्यात यावे.हनुमानवाडी चौफुली,मोरेमळा चौफुली,जगझाप मार्ग कॅार्नर,क्रांतिनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढझालेली असल्याने सदरील भागात स्पिड ब्रेकर टाकण्यात यावे. मखमलाबाद रिड वरील हनुमानवाडी कॅार्नर ते जॅागींग ट्रॅक समोरील भागातील रस्त्यांची रुंदी वाढविण्यात यावी.अशी मागणी निवेदणा द्वारे करण्यात आली असुन सदरील मागण्यांचा त्वरित विचार न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड, हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण,ॲड.सुभाष गिते,भारतीताई चित्ते, भास्कर धुमाळ,बन्सिलाल भागवत,सुभाष देशमुख,अजय पाटील,अमोल काशीद,उत्तम जाधव,नितीन भडांगे,लक्ष्मण रणमाळे,अशोक शिंदे,शशिकांत पाटिल,हेमंत वाटपाडे,चंद्रकांत इंपाळ,अंतोष धाञक,रंजणा पगार,आशा काकड,संगिता भाडमुखे,सुजाता भदाणे,वैशाली अहिरे,सुरेखा रामायणे,पूजा वाढवे,रंजना दुबे,मोनिका जगताप,मनीषा चौधरी,शुचिता दिक्षित,निशा धाञक,विमल सोनवणे,भारती वाघेरे,कासुबाई जाधव,तारा निकम,मुभा पेहेरकर,रेखा सुर्यवंशी,सुषमा आंबेकर,जिजाबाई चव्हाण,कल्पणा बच्छाव आदी स्थानिक नागरीक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र यंदाही अव्वल स्थानी राहणार :- किशोर येवले 


नवी मुंबई : २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये युध्दकला पिंच्याक सिल्याट खेळाची स्पर्धाही संपन्न होत आहे. या खेळामध्ये एकूण २८ राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल २० खेळाडूंची निवड झालेली असून, ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र ऑलिम्पिक  असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक किशोर येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे येथे पार पडले.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट खेळ प्रथमच समाविष्ट झाला आहे. कॅम्पल ग्राउंड विलेज, पणजी येथे होणाऱ्या या स्पर्धेत २० खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामध्ये धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट- ४५ किलो), रामचंद्र बदक (टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट), सोमनाथ सोनवणे (टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो), वैभव काळे (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलोइव्हेंट), मुकेश चौधरी (टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग (टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे (टॅडींग‍ इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक (टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला ( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५ ), धनंजय जगता टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे (गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेग इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिम तेली ( टॅडींग इव्हेंट ६५ ७० किलो), दीक्ष शिंदे (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार ( ८५ ते १०० किलो), रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे ( सोलो इव्हेंट) यांच समावेश आहे. तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली. मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील, अशी माहिती 'इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन'चे अध्यक्ष किशोर येवले यांनी दिली

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

 राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती ! 

मुंबई,दि. २७ : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.


यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार  दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडीसेविकेंच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार-श्रीमती स्मृती इराणी


केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.


केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.



महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसुती होताना अडचणी येवू नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

 श्री गोरेराम मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला चिन्मय उदगीरकरची भेट


नाशिक:- नाशिकमधील रविवार कारंजा येथील सुप्रसिध्द श्री गोरेराम मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव २०२३ मध्ये दि. २१/१०/२०२३ नवरात्रीच्या सातव्या दिवशी संध्याकाळी ८:३० वा. मराठीचे सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्री. चिन्मय उदगीरकर हे‌ श्री गोरेराम मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवात सहभागी झाले . यासोबतच त्यांच्या हस्ते देवीचा आरती सोहळा करण्यात आला. चिन्मय उदगीकर हे कलर्स मराठी वाहिनीवरील योग योगेश्वर जय शंकर मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आणि त्यांनी सांगितले की माझे बालपण नाशिकमधील रविवार कारंजा येथील ग्यानोपागा लेन ( फुटाणे गल्ली) येथे पार पडलेले आहे. हे तुमचे नव्हे तर आपल्या सगळ्यांचे मंडळ आहे . यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की कोरोना काळात आम्ही सुमारे ५ ते ६ मालिकांची सुरुवात केली आणि कोणत्याही कलाकाराला यापुढे कसारा घाट ओल्यांडण्याची गरज पडणार नाही असा आमचा प्रयत्न असणार आहे. असे त्यांनी भाविकांशी बोलताना सांगितले. ते करत असलेल्या कामाचे भाविकांनी कौतुक केले. व श्री गोरेराम मित्र मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष श्री. हर्षद जाधव यांच्या हस्ते संपुर्ण गोरेराम मित्र मंडळ व गोरेराम लेन यांच्या वतीने चिन्मय उदगीरकर ह्यांचा कौतुक सोहळा  पार पडला. चिन्मय उदगीरकर यांनीसुद्धा मंडळाचे व मंडळातील कार्यकर्त्यांचे , आयोजकांचे , कार्यक्रमाचे व वेळ काढून उपस्थित असलेल्या व आपली संस्कृती जपत असलेल्या नागरीकांचे मनापासून कौतुक केले.

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...