Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

 गटप्रवर्तक व आशा १६ ऑक्टोबर पासून  संपावर!!



 नाशिकः राष्ट्रीय  आरोग्य अभियान मध्ये  १८वर्ष पासून कार्यरत आहेत.गट प्रवर्तक  ना  फक्त प्रवास भत्ता दिला जातो. गट प्रवर्तक ना  शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तो मिळेपर्यंत गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन द्या, आशा ना  आँनलाईन कामासाठी दबाव आणला जातो आहे तो त्वरित थाबवावा , आँनलाईन कामे आशा करणार नाही, बहूसंख्य आशा अल्प शिक्षित आहे, त्यांना   आरोग्य विभागातील इंग्रजीत असलेले ॲप वर काम करता येतं नाही त्यामुळें आँनलाईन कामे सांगणे बंद करावे , दिवाळी भाऊबीज लागू करण्याची मागणी अन्यथा 16 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी संप करण्याचा आयटक  सह  कृती समिती ने निर्णय घेतला आहे. त्याचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक  रविंद्र परदेशी यांना     कॉ. राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक यांनी निवेदन दिले.


 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.

देऊन 15 तारखे पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास  महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे 16 ऑक्टोंबर पासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली .राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंन दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन होईल. त्या अनुषंगाने आयटक च्या वतीने जिल्हा परिषद  वर १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२वा.  बी डी भालेकर मैदानं येथुन भव्य मोर्चा  जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद वर नाशिक येथे जाईल.समोर धरणे आंदोलन करण्यात  येईल.

यावेळी  निवेदाद्वारे मागण्या करण्यात आल्या. गट प्रवर्तक कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात  नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्कर ला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची  सक्ती करण्यात येऊ  नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.

 

यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक  सहभागी व्हावें असे आवाहन कॉ. राजू देसले यांनी केले आहे.



बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

आव्हाडांचा पालिकेला दणका ; पालिकेची बाब लाजीरवाणी 

कामगारकल्याण मंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या  बांधकाम कामगार योजणेन्वये नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरक्षा योजणे अंतर्गत विविध लाभ दिले जातात,

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारास पूर्व शिक्षण आणि ओळख प्रशिक्षण दिले जाते .पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात.या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारास अत्यावश्यक संच पुरविले जातात. सदरील योजणे अंतर्गत ॲानलाईन नोंदणी करण्यात येऊन अनेकांना योजणेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील कामगार आयुक्त कार्यालयातून ओळख पञ व बांधकाम मजुरांचे साहित्य घेऊन जावे यासाठी मेसेज प्राप्त झाले असल्याने अनेक लाभार्थ्यी जिल्ह्यातील विविध भागातुन आपल्या लहान मुलांसोबत कार्यालयात आले होते,माञ अधिकारी व कर्मचारी यांनी याची दखल न घेता मशिन बंद पडल्याचे कारण देत कामगाज थांबविले असल्याचे राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांना समजताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन अधिकार्यांना जाब विचारताच अधिकार्यांनी दुसऱ्या मशिनची व्यवस्था केली व राञी उशिरा पर्यंत कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

 13 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंचे वर्चस्व 



  13 व्या राज्य स्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन ने दि.1 व 2 ऑक्टोबर 2023 रोजी राज पॅलेस, करवर ता.जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले‌.


 मा. आमदार सौ.जयश्री जाधव कोल्हापूर, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुलीं साठी घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील ४३८ खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले ,मुंबई झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन, सुरेखा येवले, अध्यक्षा, नवी मुंबई पिंच्याक सिलॅट असोसिएशन, अनुज सरनाईक, साहेबराव ओहोळ, अरविंद शिर्के, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

८ सुवर्ण, ११रौप्य, ६ कांस्य पदक नासिक संघाने प्राप्त केले. या सर्व खेळाडूंची बिहार मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे करता निवड झाली आहे. आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या खेळाडूंना श्री. नागेश बनसोडे( नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशन सचिव) यांनी मार्गदर्शन केले.

विजयी खेळाडूंची नावे

इंद्रा बनसोडे याने 3-6 वयोगटात तुंगल या प्रकारात (सुवर्ण )पदक मिळवले व टेंडिंग या प्रकारात(रौप्य )पदक मिळवले व पर्व उबाळे ने (सुवर्ण) पदक मिळवले. 10 -11 या वयोगटात विराज कवडे याने (सुवर्ण) पदक मिळवले. तसेच रेगु या प्रकारात अथर्व बर्वे, अर्णव विधाते व विराज कवडे यांनी (रौप्य) पदक मिळवले. 12-13 या वयोगटात अर्णव गवई ( सुवर्ण), चेतन पवार ( कास्य) , आर्यन पटेल ( कास्य) पदक मिळवले तसेच दक्ष विश्वकर्मा ने तुंगल प्रकारात ( कास्य) पदक मिळवले.14-16 या वयोगटात तनिष्क गवई (सुवर्ण), गणेश खंडेराव ( रौप्य), प्रेम विश्वकर्मा ( कास्य) पदक मिळवले. तसेच तुंगल या प्रकारात देखील प्रेम विश्वकर्मा ( कास्य) याने पदक मिळवले.

पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. 


या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

मंत्रीमंडळाची बैठक ! पहा महत्वाचे निर्णय 




अन्न व नागरी पुरवठा विभाग

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. 


पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. 

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.  

यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.  

ऊर्जा विभाग



कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल. 


ही योजना २०१८ ते २०२० या वर्षात पूर्ण करावयाची होती. परंतु मुसळधार पाऊस आणि शेतात उभी पिके असल्याने ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) उभारणीत अडथळा निर्माण झाला. कोविडमुळे देखील या योजनेची प्रगती होऊ शकलेली नाही. उपकेंद्रांच्या कामांसाठी लागणारा वेळ १५ते १८ महिन्यांचा होता. त्यामुळे या योजनेचा मूळ खर्च ५ हजार ४८ कोटी १३ लाख इतक्यावरून ४ हजार ७३४ कोटी ६१ लाख इतका सुधारित करण्यात आला आणि योजनेचा कालावधी मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला होता. सध्या १ लाख ३८ हजार ७८७ वीज जोडण्यांपैकी २३ कृषी पंप वीज जोडण्या आणि ९३ उपकेंद्रांपैकी ४ उपकेंद्रांची कामे प्रलंबित आहेत. सध्या पावसाळ्यामुळे या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याकरिता योजनेचा कालावधी मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आला आहे.  

अल्पसंख्याक विकास विभाग



अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.


क्यूएस वर्ल्ड रॅन्कींगमधील २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी पी.एच्.डी. अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती राहील. याकरिता १० कोटी ८० लाख इतक्या खर्चास देखील मंजुरी देण्यात आली. 

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी यासाठी एकूण १० शिष्यवृत्ती तर औषधी व जीवशास्त्र, लिबरल आर्ट व ह्युमॅनिटीजसाठी प्रत्येकी ६, शेतकीसाठी ३ आणि कायदा व वाणिज्यसाठी २ अशा या २७ शिष्यवृत्ती राहतील. 

विधी व न्याय विभाग

नागपूरला ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करुन ४५ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


नागपूर येथे ४ कौटुंबिक न्यायालये असून वाढत्या कौटुंबिक विवादांच्या प्रकरणांमुळे ही ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या नागापूरच्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये ८ हजार ४१८ न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. या न्यायालयांच्या उभारणीपोटी ५ कोटी ६० लाख ५४ हजार खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग 

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील अँड रुरल इंजिनिअरिंग या अनुदानातील संस्थेतील 3 विनाअनुदानीत पदविका अभ्यासक्रमांना 2023-24 पासून ९० टक्के शासन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 


याशिवाय या संस्थेत 16 शिक्षकांची पदे देखिल निर्माण करण्यात येतील. या संस्थेत सध्या विद्युत अभियांत्रिकी 60, यंत्र अभियांत्रिकी 120, संगणक अभियांत्रिकी 40 अशी 220 प्रवेश क्षमता आहे. सध्याच्या अनुदानित संस्थेतील अधिव्याख्याता (उपयोजित यंत्रशास्त्र) या पदाचे रुपांतरण कर्मशाळा अधिक्षक या पदात देखील करण्यात येईल. या अनुदानापोटी व पदनिर्मितीसाठी मिळून 1 कोटी 77 लाख 7 हजार 992 इतका वार्षिक निधी देण्यासही मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने अतिदुर्गम ग्रामीण भागात कमी खर्चात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून स्थापन केलेल्या एस. राधाकृष्णन यांच्या समितीने देशातील 10 विद्यापीठात तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरु करण्याची शिफारस केली होती. यात गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठचा समावेश आहे. 

गृहनिर्माण विभाग

महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट (महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० मधील नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल.


यामुळे आता विरोध करणाऱ्या रहिवाशी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरिता स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात येईल. अधिनियमात त्याप्रमाणे कलम 6 (अ) नंतर कलम 6 (ब) समाविष्ट करण्यात येईल.  

या अधिनियमात 7 जुलै 2018 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणात बहुसंख्य वेश्म मालकांची (सदनिका मालकांची) संमती आवश्यक असल्याचे नमूदg करण्यात आले आहे. बहुसंख्य या शब्दाची व्याख्या 51 टक्के वेश्म मालक अशी आहे. कलम 6 नुसार बहुसंख्येने पारित केलेल्या प्रस्तावास काही सदस्यांचा विरोध होतो आणि त्यामुळे असहकार करणाऱ्या सभासदांविरुद्ध कोणती कार्यवाही करावी याची सुस्पष्ट तरतूद नसल्यामुळे पुनर्विकास खोळंबून इमारती धोकादायक होतात. विभागाच्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये नाही म्हणून ही तरतूद करण्यात आली.

 मौजे सुकेणे महाविद्यालयात गांधीजी व शास्त्रीजींची जयंती साजरी

 रासेयोच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम

 मौजे सुकेने कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, प्रा राजेंद्र धनवटे ,प्रा दिनकर रसाळ व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २- मौजे सुकेणे ता निफाड येथील के आर टी ज्यु कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या 'स्वच्छता हीच सेवा' हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सहभागी होऊन त्यांनीही एक 'तास स्वच्छता मोहीम 'राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांनी एन एस एस +2 स्तर जिल्हा समन्वयक प्रा राजेंद्र धनवटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा दिनकर रसाळ, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन 'स्वच्छता हीच सेवा' हा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य दवंगे होते प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा दिनकर रसाळ यांनी केले. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा धनवटे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन एकाच दिवशी येणे हा दुग्धशर्करा योग आहे. महात्मा गांधी यांचा देश बलवान करण्यासाठी खेडी बलवान करणे तसेच लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान या संदेशाची अंमलबजावणी झाली तरच देश जागतिक सत्ता म्हणून निश्चित पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारच्या 'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगून स्वच्छतेचे महत्व विशद केले. तसेच प्रत्येकाने स्वच्छतेचे व्रत अंगीकारून आपल्या आजूबाजूचा परिसर, महाविद्यालय, गाव, समाज व राष्ट्राची स्वच्छता ठेवण्यात आपला हातभार लावावा असा संदेश दिला सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा रसाळ यांनी केले. तर आभार मुकुंद ताकाटे यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 गीताई कन्या विद्यालयात गांधीजी व शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान

गीताई कन्या वाघ भा नगर विद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी मुख्याध्यापिका उज्वला तासकर, शिक्षक व विद्यार्थी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २- के के वाघ शिक्षण संस्था संचलित गीताई वाघ कन्या विद्यालयात स्वच्छता ही सेवा या अंतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ,अजिंक्य वाघ व मुख्याध्यापिका उज्वला तासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पान सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून प्रकाश झोत टाकला सूत्रसंचालन कु अश्विनी शिंदे व कु श्रावणी शिंदे यांनी तर प्रास्ताविक कु सोनल सूर्यवंशी हिने केले यावेळी शिक्षक श्री सोनवणे व मुख्याध्यापिका उज्वला तासकर यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवन कार्याची ओळख करून दिली आभार कु माधुरी मोरे हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नववी अ च्या विद्यार्थिनी व वर्गशिक्षिका श्रीम ननवरे यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

 सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात “एक तारीख एक तास” मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद



मुंबई, दि.१ : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोक चळवळ झाली आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारापेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.



उद्या (२ ऑक्टो.) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी,अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.


या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला; पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.


 स्वच्छता कागदावर नको 


स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये. असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.


गड,किल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता


राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे,मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे.ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते पंतप्रधानांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्ट्राचाराची सफाई झाली. 

 

चौपाटीवर नागरिकांचा उत्साह


गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या बरोबर आले होते. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांबरोबर हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी सुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्था देखील उतरल्या होत्या.स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल,नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नैशनलं हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या.  


प्रारंभी 'जय जय महाराष्ट्र, माझा राज्य' गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी स्वच्छतेची प्रार्थना देखील घेण्यात आली.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...