Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

 मौजे सुकेणे महाविद्यालयात गांधीजी व शास्त्रीजींची जयंती साजरी

 रासेयोच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम

 मौजे सुकेने कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, प्रा राजेंद्र धनवटे ,प्रा दिनकर रसाळ व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २- मौजे सुकेणे ता निफाड येथील के आर टी ज्यु कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या 'स्वच्छता हीच सेवा' हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सहभागी होऊन त्यांनीही एक 'तास स्वच्छता मोहीम 'राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांनी एन एस एस +2 स्तर जिल्हा समन्वयक प्रा राजेंद्र धनवटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा दिनकर रसाळ, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन 'स्वच्छता हीच सेवा' हा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य दवंगे होते प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा दिनकर रसाळ यांनी केले. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा धनवटे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन एकाच दिवशी येणे हा दुग्धशर्करा योग आहे. महात्मा गांधी यांचा देश बलवान करण्यासाठी खेडी बलवान करणे तसेच लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान या संदेशाची अंमलबजावणी झाली तरच देश जागतिक सत्ता म्हणून निश्चित पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारच्या 'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगून स्वच्छतेचे महत्व विशद केले. तसेच प्रत्येकाने स्वच्छतेचे व्रत अंगीकारून आपल्या आजूबाजूचा परिसर, महाविद्यालय, गाव, समाज व राष्ट्राची स्वच्छता ठेवण्यात आपला हातभार लावावा असा संदेश दिला सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा रसाळ यांनी केले. तर आभार मुकुंद ताकाटे यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...