गटप्रवर्तक व आशा १६ ऑक्टोबर पासून संपावर!!
नाशिकः राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये १८वर्ष पासून कार्यरत आहेत.गट प्रवर्तक ना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. गट प्रवर्तक ना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तो मिळेपर्यंत गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन द्या, आशा ना आँनलाईन कामासाठी दबाव आणला जातो आहे तो त्वरित थाबवावा , आँनलाईन कामे आशा करणार नाही, बहूसंख्य आशा अल्प शिक्षित आहे, त्यांना आरोग्य विभागातील इंग्रजीत असलेले ॲप वर काम करता येतं नाही त्यामुळें आँनलाईन कामे सांगणे बंद करावे , दिवाळी भाऊबीज लागू करण्याची मागणी अन्यथा 16 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी संप करण्याचा आयटक सह कृती समिती ने निर्णय घेतला आहे. त्याचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक रविंद्र परदेशी यांना कॉ. राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक यांनी निवेदन दिले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
देऊन 15 तारखे पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे 16 ऑक्टोंबर पासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली .राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंन दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन होईल. त्या अनुषंगाने आयटक च्या वतीने जिल्हा परिषद वर १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२वा. बी डी भालेकर मैदानं येथुन भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद वर नाशिक येथे जाईल.समोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी निवेदाद्वारे मागण्या करण्यात आल्या. गट प्रवर्तक कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्कर ला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक सहभागी व्हावें असे आवाहन कॉ. राजू देसले यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा