Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयाच्या 

वतीने पावसाळी वनभोजन 

सहलीचे आयोजन

 ऍग्रोफँब कंपनीला भेट देत क्षेत्रभेटीचाही लुटला आनंद

 मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील विद्यार्थी वनभोजनासाठी जाताना व महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना प्राचार्य रायभान दवंगे ,लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १३- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची पावसाळी एक दिवशीय वनभोजन सहलीचे कसबे सुकेणे येथील कुलस्वामिनी महालक्ष्मी माता मंदिर परिसरात प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तीन किलोमीटर अंतर असलेल्या कसबे सुकेणे ते कोकणगाव रोडवरील श्री महालक्ष्मी माता मंदिर परिसरात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वनभोजन सहलीचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यालयाच्या वतीने श्री महालक्ष्मी माता ट्रस्टचे सदस्य लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे, प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करत येथून जवळ असलेल्या ऍग्रोफँब या कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपनीला भेट देऊन भौगोलिक क्षेत्र भेटीचाही आनंद लुटला याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांच्यासह, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, सहल प्रमुख दिलीप काळे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

 शहरात दिवसाही पथदिवे

 सुरू !  प्रशासनाचे दुर्लक्ष. 


समर्थ ज्युस सेंटर , पेठे विद्यालय शेजारी , रविवार कारंजा जवळील पथदिवे दुपारी १:३० वाजता सरु होते .





२) पेठे  विद्यालय  समोरील पथदिपक 


नाशिक:- शहरात पथदिकांची समस्या नेहमीच नागरिकांना भेडसावत आली आहेत. कधीकधी रात्री पुर्णवेळ पथदीपक बंद असतो‌ व कधीतरी दिवसांचा लख्खं प्रकाश असताना‌ सुध्दा पथदीपक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सरु राहतात व ह्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यासारखे आहे. 
( छाया :- प्रसाद भालेकर) 



गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

 घरकामगार मोलकरीणच्या मुलांना शालेय साहित्य मदत गरजेची -  कामगार उपायुक्त माळी



नाशिक : दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन घरकाम मोलकरीण संघटना नाशिक (आयटक) तर्फे करण्यात आले होते.



दिवसेंदिवस मुलांचे शिक्षण महागडे होत असल्याने मध्यमवर्गीय हैराण आहेत अशा वेळी लोकांच्या घरी- धुनी भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा असतो. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत शिकणाऱ्या सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटना (आयटक)नाशिक तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग कामगार उपायुक्त मा. विकास माळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उद्देशून विकास माळी यांनी भाष्य केलें. प्रत्त्येक विद्यार्थ्याने जिद्द ठेवली पाहिजे. प्रत्येकाला जन्मतःच गुण नसतात, ते गुण आत्मसात कराव्या लागतात. व्यवहारीक नॉलेज प्रत्येकाला आल पाहिजे. त्यासाठी भरपूर अभ्यास करणं महत्वाचं आहे. शिक्षण घेणं महत्वाचं आहे. मुलांना काय बनायचं हे त्याच्या कला गुना वरून ठरवा. शालेय साहित्य मदत जमा करुन वाटप उपक्रम गेली २०वर्ष सूरू असल्याबद्दल आयटक घरकाम संघटना चे कौतुक केले. व पुढील काळात मदती साठी नक्कीच हातभार लावणार असे आश्वासन दिले. मा. विकास माळी , राजू देसले, महादेव खुडे यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन कार्यक्रमास सुरूवात केली.


आयटकचे राज्यसचिव कॉम्रेड राजू देसले यांनी आयटक कामगार संघटनेच्या माध्यमातून मदत केलेल्या विद्यार्थ्यांची धडपड बद्दल सांगताना, प्रयत्न केले तर आपले स्वप्न पूर्ण करणे नक्कीच शक्य असल्याने विद्यार्थ्यांनी न डगमगता परिस्थितीचा विचार न करता झेप घ्यावी, संघटना म्हणून आम्ही सोबत उभे आहोत असा विश्वास व्यक्त केला. समाजातील शिक्षणासाठी जाणीव असणाऱ्यांनी मदत करावी. ज्यानी मदत केली त्यांचे आभार मानले.


भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष कॉ. महादेव खुडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्या.  


सूत्रसंचालन प्राजक्ता कापडणे यांनी केले.घरकाम मोलकरीण संघटना नाशिक शहर कॉ. मीना आढाव, कैवल्य चंद्रात्रे, तल्हा शेख, पद्माकर इंगळे, प्रिया इंगळे उपस्थित होते. या वेळी घरकामगार मोलकरीण संघटना सल्लागार पद्माकर इंगळे यांची कन्या प्रिया इंगळे वैद्यकीय डॉ. झाल्याबद्दल. मा. विकास माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार भीमा पाटील यांनी मानले. यावेळी ५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

जालनातील लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी सेल कडून आत्मक्लेष आंदोलन !

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मांना निवेदन 



नाशिक :- 

मनिपुर मधे झालेल्या हिंसाचाराच्या व जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष आंदोलन करण्यात येऊन नाशिक जिल्हधिकारी श्री जलाज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.



    गेले अनेक वर्षांपासून इतरमागासवर्गीय समाज जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करतोय.यासाठी अनेक आंदोलने व निवेदन देऊन झालेली असुन स्व.गोपीनाथजी मुंढे तसेच भुजबळ साहेबांनी देखील अनेकदा जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.तरीसुद्धा कोणतेही सरकार यावर ठोस निर्णय घेत नाही.आता भुजबळ साहेब सत्तेत असुन केंद्रात देखील मिञपक्षाचे सरकार असल्याने भुजबळ साहेबांनी जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा,अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जची तसेच मनिपुर मधील हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत केंद्रीय ग्रुह मंञी अमित शहा व महाराष्ट्राचे ग्रुहमंञी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावे OBCच्या अथवा इतर कुठल्याही घटकाच्या आरक्षणास धका न लावता 

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे.यासाठी शेड्युल्ड ९ चा वापर करण्यात येऊन आरक्षणावर घालण्यात आलेली ५०%ची मर्यादा काढून टाकण्यात यावी.तामिळनाडू च्या धरतीवर आरक्षणाची मर्यादा वाढविल्यास सर्वच घटकांना आरक्षणाचा फायदा होईल.अर्धवट मंडल आयोग लागू केल्याने OBC समाजाचे मागासलेपणा कमी झालेले नसून मराठा समाजाला सरसकट कुणबी च्या माध्यमातून OBC आरक्षण दिल्यास कुणबी समाजा बरोबरच OBC च्या इतर घटकांवर मोठा अन्याय होईल व त्या माध्यमातुन मराठा समाजाच्या पदरात देखील काही पडणार नसुन हे जुमलेबाज सरकार सरसकट मराठा समाजाला कुणबी च्या नावाने OBC मधे घुसवुन वेळ काढु पणा करत आहे. असे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही व हे सरकार मराठा OBC वाद लावुन दंगली घडविण्याच्या मनस्थिती असल्याने त्वरित जातनिहाय जनगणना करण्यात येऊन मराठा,ब्राम्हण,जैन,शिख, ख्रिश्चन या सर्व घटकांना संख्येनुसार आरक्षण देण्यात यावे.इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करुन इतर मागासवर्गीय समाजाचे न्यायालयाने थांबविलेले राजकिय आरक्षण पुनः सुरु करण्यात यावे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॅालर्शीप वेळेत देण्याची व्यवस्था व्हावी.ओबीसी वर्गाचा अनुशेष भरण्यात यावा रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागु कराव्यात.जालना जिल्ह्यामधे मराठा आंदोलकवार झालेल्या लाठीचार्जचा तपास करण्यात येऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे,हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण,भारतीताई चित्ते,रेखा शेलार,ॲड.शाम तावरे,ॲड.नितीन जाधव,अमोल कदम,ॲड.नामदेव गिते,बन्सिलाल भागवत,गणेश धोञे,राजेंद्र मोरे,शारदा मोरे,रंजना पगार,चंद्रकला बुरडे,मीना पेहरकर,अभिलाश भावसार,वसंत पगार,रमेश निकम,भास्कर धुमाळ,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे बालगोपालांकडून

 दहीहंडी उत्सव

मौजे सुकेणे अभिनव बाल विकास मंदिर च्या विद्यार्थ्यांकडून दहीहंडी उत्सव याप्रसंगी वेशभूषा केलेले बालगोपाल, शिक्षक, विद्यार्थी व पालक


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता ६ - मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर मौजे सुकेणे ता निफाड येथील बालगोपालांकडून दहीहंडी उत्सवासह गोपाल काला हा कार्यक्रम प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीम संगीता सोनवणे तर व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे उपस्थित होत्या .सुरुवातीला उपस्थित पालक व शिक्षकांच्या हस्ते सरस्वती मातेचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीम प्रियंका खुळे यांनी उपस्थितांना माहिती करून दिली यावेळी विद्यार्थ्यांनी बाल श्रीकृष्ण, राधा, गोपाल व गोपिकाऔ यांच्या वेशभूषा परिधान करत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळावर नृत्य सादर केले व मोठ्या उत्साहात बाल गोपालांकडून दहीहंडी फोडण्यात आली उपस्थितांना दही प्रसादाचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन प्रियंका मोगल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ठाकरे, वर्षा चौधरी, प्रियंका खुळे,कावेरी देशमुख, राहुल मोगल ,प्रियंका मोगल, राणी साबळे,मीरा जाधव, संगीता पगारे,पुष्पा पगारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी पालक वर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 मौजे सुकेणेची खूशी बोरा 

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत

 द्वितीय

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु खुशी बोरा हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करताना संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे व आदी.







कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता ६- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने समाज दिनानिमित्ताने माझी शाळा माझा अभियान या उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयाची सहावी अ ची विद्यार्थिनी कु खुशी दिलीपकुमार बोरा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तिला शिक्षक दिनी संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी बी मोगल, तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख,शिक्षणाधिकारी डॉ अशोक पिंगळे, तिचे वडील दिलीपकुमार बोरा आदी उपस्थित होते तिच्या या यशाबद्दल प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, तिच्या मार्गदर्शक कला शिक्षिका सविता कापडी,विशाखा वाघ ,सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले

  

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात डॉ 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 

अभिवादन

 शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनवून चालवली शाळा

फोटो मौजे सुकेणे विद्यालयात शिक्षक दिनी शिक्षक बनलेले सर्व विद्यार्थी, प्राचार्य रायभान दवंगे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक









कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता.५- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता.निफाड विद्यालयात शिक्षक दिनी भारताचे उपराष्ट्रपती थोर शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते. सुरुवातीला प्राचार्य दवंगे व उपप्राचार्य अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,पंतप्रधान आश्विनी भंडारे,उपपंतप्रधान ओमकार शेवकर व उपस्थितांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून ज्ञानदानाचे काम केले मुख्याध्यापक म्हणून कु अश्विनी भंडारे,उपमुख्याध्यापक म्हणून कु ओमकार शेवकर तर पर्यवेक्षिका म्हणून कु उत्कर्षा भार्गवे व कु प्रीती गांगुर्डे यांनी काम पाहीले शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व गुरुजनांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आदर्श ठरलेल्या विद्यार्थी शिक्षक कु तेजल भोज,निकिता केदारे, नुजहत टाकारी,साक्षी कर्डक,यश गुरगुडे,शिफा शेख,पायल धुळे, भक्ती भंडारे,उम्मेहानी पठाण, अक्षरा गांधी,आदित्य रावते, गायत्री पवार,उत्कर्षा भार्गवे,भक्ती शेवकर,अश्विनी धनराव,सिद्धी जाधव,उदय कुयटे,गायत्री मोरे, धनश्री पागेरे,कल्पेश हळदे,स्नेहल भंडारे,अश्विनी भंडारे,अनुष्का भंडारे,आशिष विधाते यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय पंतप्रधान कु आश्विनी भंडारे हिने केले यावेळी कु आशिष विधाते, कृणाल कुमावत,धनश्री पागेरे, कल्पेश हळदे, यश गुरगुडे,कृष्णा भंडारे,ओमकार शेवकर यांनी शिक्षक म्हणून आलेले अनुभव कथन केले तर शिक्षकांच्या वतीने दत्तू पडोळ व प्राचार्य रायभान दवंगे यांनी मनोगतातून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून का साजरी केली जाते याविषयी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन कु श्रुती बोरा व तेजल भोज हिने तर आभार कु रसिका शिंदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...