मौजे सुकेणे विद्यालयाच्या
वतीने पावसाळी वनभोजन
सहलीचे आयोजन
ऍग्रोफँब कंपनीला भेट देत क्षेत्रभेटीचाही लुटला आनंद
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील विद्यार्थी वनभोजनासाठी जाताना व महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना प्राचार्य रायभान दवंगे ,लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे व आदी |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १३- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची पावसाळी एक दिवशीय वनभोजन सहलीचे कसबे सुकेणे येथील कुलस्वामिनी महालक्ष्मी माता मंदिर परिसरात प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तीन किलोमीटर अंतर असलेल्या कसबे सुकेणे ते कोकणगाव रोडवरील श्री महालक्ष्मी माता मंदिर परिसरात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वनभोजन सहलीचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यालयाच्या वतीने श्री महालक्ष्मी माता ट्रस्टचे सदस्य लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे, प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करत येथून जवळ असलेल्या ऍग्रोफँब या कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपनीला भेट देऊन भौगोलिक क्षेत्र भेटीचाही आनंद लुटला याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांच्यासह, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, सहल प्रमुख दिलीप काळे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा