Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

जालनातील लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी सेल कडून आत्मक्लेष आंदोलन !

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मांना निवेदन 



नाशिक :- 

मनिपुर मधे झालेल्या हिंसाचाराच्या व जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष आंदोलन करण्यात येऊन नाशिक जिल्हधिकारी श्री जलाज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.



    गेले अनेक वर्षांपासून इतरमागासवर्गीय समाज जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करतोय.यासाठी अनेक आंदोलने व निवेदन देऊन झालेली असुन स्व.गोपीनाथजी मुंढे तसेच भुजबळ साहेबांनी देखील अनेकदा जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.तरीसुद्धा कोणतेही सरकार यावर ठोस निर्णय घेत नाही.आता भुजबळ साहेब सत्तेत असुन केंद्रात देखील मिञपक्षाचे सरकार असल्याने भुजबळ साहेबांनी जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा,अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जची तसेच मनिपुर मधील हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत केंद्रीय ग्रुह मंञी अमित शहा व महाराष्ट्राचे ग्रुहमंञी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावे OBCच्या अथवा इतर कुठल्याही घटकाच्या आरक्षणास धका न लावता 

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे.यासाठी शेड्युल्ड ९ चा वापर करण्यात येऊन आरक्षणावर घालण्यात आलेली ५०%ची मर्यादा काढून टाकण्यात यावी.तामिळनाडू च्या धरतीवर आरक्षणाची मर्यादा वाढविल्यास सर्वच घटकांना आरक्षणाचा फायदा होईल.अर्धवट मंडल आयोग लागू केल्याने OBC समाजाचे मागासलेपणा कमी झालेले नसून मराठा समाजाला सरसकट कुणबी च्या माध्यमातून OBC आरक्षण दिल्यास कुणबी समाजा बरोबरच OBC च्या इतर घटकांवर मोठा अन्याय होईल व त्या माध्यमातुन मराठा समाजाच्या पदरात देखील काही पडणार नसुन हे जुमलेबाज सरकार सरसकट मराठा समाजाला कुणबी च्या नावाने OBC मधे घुसवुन वेळ काढु पणा करत आहे. असे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही व हे सरकार मराठा OBC वाद लावुन दंगली घडविण्याच्या मनस्थिती असल्याने त्वरित जातनिहाय जनगणना करण्यात येऊन मराठा,ब्राम्हण,जैन,शिख, ख्रिश्चन या सर्व घटकांना संख्येनुसार आरक्षण देण्यात यावे.इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करुन इतर मागासवर्गीय समाजाचे न्यायालयाने थांबविलेले राजकिय आरक्षण पुनः सुरु करण्यात यावे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॅालर्शीप वेळेत देण्याची व्यवस्था व्हावी.ओबीसी वर्गाचा अनुशेष भरण्यात यावा रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागु कराव्यात.जालना जिल्ह्यामधे मराठा आंदोलकवार झालेल्या लाठीचार्जचा तपास करण्यात येऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे,हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण,भारतीताई चित्ते,रेखा शेलार,ॲड.शाम तावरे,ॲड.नितीन जाधव,अमोल कदम,ॲड.नामदेव गिते,बन्सिलाल भागवत,गणेश धोञे,राजेंद्र मोरे,शारदा मोरे,रंजना पगार,चंद्रकला बुरडे,मीना पेहरकर,अभिलाश भावसार,वसंत पगार,रमेश निकम,भास्कर धुमाळ,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  घराला लागलेल्या आगीवर वेळेत नियंत्रण: मोठा अनर्थ टळला नाशिक, ७ जानेवारी २०२५ - काकड बाग, मोरे मळा येथील विकास देवरे यांच्या घरात दि. ४ जान...