Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

 आरोग्य अभियान कार्यरत गट प्रवर्तक चा राज्य व्यापी मोर्चा १३सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान वर

 नाशिक: राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत गट प्रवर्तक चा राज्यव्यापी मोर्चा मुंबई येथे आझाद मैदान वर आयोजित करण्यात आला आहे. आज मागणी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना देण्यात आले. गट प्रवर्तक ना शासकिय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या व इतर मागण्यांसाठी दि. १३/०२/ २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११.०० पासुन विराट मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत.


महाराष्ट्रामध्ये सन २००५ सालापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीपासुन गटप्रवर्तक या अभियानात काम करीत असुन सध्या महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची संख्या ३५०० पेक्षाही जास्त आहे. बहुतांश गटप्रवर्तक पदवीधर आहेत. गटप्रवर्तकांची नेमनुक सरकार करते. त्यांना मानधन सरकार देते. त्यांना दंड, शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे. म्हणजे त्यांचा "मालक” सरकार असुन गटप्रवर्तक या शासनाच्या “कर्मचारी" आहेत. या तत्वानुसार एनएचएम ही "आस्थापना" आहे. गटप्रवर्तकांची नेमनुक भारतीय संविधानानुसार आरोग्य विषयक घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरीता झाली आहे. एनएचएम सारख्या तात्पुरत्या योजनेचा गटप्रवर्तक भाग नाहीत तर एनएचएम योग्य रित्या चालवण्यासाठी गटप्रवर्तकांची पदे कायदयाने (Statutory Post) निर्माण केलेले पदे आहेत..साधारणतः वीस आशा स्वंयसेविकांसाठी एका गटप्रवर्तकाची नेमनुक करण्यात आली आहे. गटप्रवर्तकांना त्यांच्या जॉब चार्ट नुसार वीस दिवस पी.एच.सी. च्या कार्यक्षेत्रात दौरे करुन पाच दिवसात आशांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करुन वरीष्ठांना सादर करावा लागतो. दौऱ्या दरम्यान गटप्रवर्तकांना आशांना भेटी देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आशांच्या कामावर देखरेख करणे ही कामे करावी लागतात. म्हणजेच त्यांना सुपरविझनचे व क्लार्कचे असे दोन्ही कामे करावी लागतात. त्यामुळे गटप्रवर्तक या कुशल कर्मचारी या वर्गातमोडतात. गेली १८ वर्षापासून हे काम गटप्रवर्तक दररोज ८ तासापेक्षाही जास्त वेळ काम करत आहेत. त्यांच्या जॉब चार्ट व्यतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेली कामे सुध्दा त्यांच्या कडुन सक्तीने करवुन घेतले जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत गटप्रवर्तकांना ११ महिन्याची आर्डर दिली जाते. नंतर दोन दिवस ब्रेक देऊन वैदयकीय अधिकारी यांच्या शिफारशीनुसार त्यांची पुनर्नियुक्ती केली जाते. अशाच प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. परंतु गटप्रवर्तकांना शासन कंत्राटी कर्मचारी मानत नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलेले लाभ गटप्रवर्तक कंत्राटी असुनसुधा तसा त्यांच्याबरोबर करार करुन सुध्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ गटप्रवर्तकांना शासन नाकारत असून महाराष्ट्र शासन या ३५०० गटप्रवर्तकांवर दररोज अन्याय करीत आहे. एनएचएमकडुन गटप्रवर्तकासोबत केलेल्या करारात फक्त दौऱ्यावर आधारीत प्रवास भत्ता देण्याचे नमुद आहे. त्यांना दरमहा साधारणतः १३५०० रुपये मोबदला प्रवासासाठी मिळतो. त्यात त्यांचा सध्याच्या महागाईच्या काळात प्रपंच चालणे कठिण आहे. प्रवास खर्च वितीरिक्त किमान वेतन लागू करा.


आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासन यांचा आदेश जा. क्र. राआसोमु / मनुष्यबळ कक्ष / वेतन सुसूत्रीकरण / ५०३३३-५४१३० दि. ५ ऑक्टोबर २०२० अन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसूत्रीकरण करुन त्यांना नवीन वेतनश्रेणी लागु केलेली आहे. एनएचएम मधील कंत्राटी कर्मचारी Data entry operator यांना दरमहा १८००० वेतन मिळते. हे काम क्लेरीकल आहे. तसेच गटप्रवर्तकांचे कामसुदधा क्लेरीकल व सुपरविझनचे असुनसुदधा शासन गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी मानत नाही. जा. क्र. राआसो/ मनुष्यबळ / कं. कर्म/ वा. मानधनवाढ व अनुभव बोनस / १२५७४३-१२६१३१/२०२२ दि. ०३/०२/२०२२ या आदेशान्वये कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५% वार्षिक वेतनवाढ व १५% अनुभव बोनस (Loyalty Bonus) शासन देते. गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा खुप कमी आहे. एकाच क्षेत्रात एक समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात खुप मोठी तफावत ठेवणे हे योग्य वाटत नाही.


दि. १८/०८/२०२३ रोजी मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य, म.रा.यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्षे सेवा पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात आला नाही. तेव्हा गटप्रवर्तकांनाही सदर निर्णयानुसार शासकिय सेवेत कायम करण्यात यावे. वरील परिस्थितीत आम्ही खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत. मागण्या:-


१. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागु असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षीक वेतनवाढ ५% व अनुभव बोनस (Loyalty Bonus) १५% गटप्रवर्तकांनासुध्दा लागु करावा. याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा.


२.गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत. 


३.गटप्रवर्तक या आशांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांना भेटी देणे, अशी कामेकरतात. ही सर्व कामे सुपरव्हिजनची आहेत. "गटप्रवर्तक" हा शब्द जनमानसांना समजण्यासाठी कठिण आहे. तेव्हा गटप्रवर्तकांना "गटप्रवर्तक " ऐवजी "आशा सुपरवायझर" हे नाव देण्यात यावे. 


५.गटप्रवर्तकांना ऑन-लाईन कामे सांगण्यात येतात. त्याकरीता त्यांना स्मार्ट फोन देण्यात यावा. तसेच डेटा पॅक रिचार्ज करण्यासाठी दरमहा ३०० रुपये देण्यात यावेत. गटप्रवर्तकांचा आरोग्यवर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत

आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करुन दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.


६.गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु. २५०

दिले जात होते. आशा सॉफटवेअर बंद असल्याचे कारण पुढे करुन सदर मोबदला देण्याचे बंद केले आहे. आशा सॉफटवेअर जरी सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा

गटप्रवर्तकांना सदर मोबदला प्रति महा रु. २५०/- पुर्ववत सुरु करण्यात यावा. 


वरील प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी दि. १३/०९/२०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११.०० पासून विराट मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा शिष्टमंडळाला वेळ देवून सहानुभुतिपूर्वक चर्चा करुन प्रश्न त्वरीत निकाली काढावेत. अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा कृती समिती व आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशागटप्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले वतीने करीत आहोत. गट प्रवर्तक नी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, सुवर्णा लोहकरे, बेबी धा त्रक, सुनीता कुलकर्णी, अर्चना गडाख, मनिषा राजगुरू, अरुणा आव्हाड, सुनीता गांगुर्डे, गीतांजली काळे, आदींनी केले आहे 



 खेलो इंडिया वुमन्स लीग पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्चस्‍व


नवी मुंबई : स्पोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल कोपरखैरणे, नवी मुंबई येथे २६ व २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबईच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले‌.


या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे नगरसेवक

ममितजी चौघुले, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जैसन मुंबई झोन मॅनेजिंग डायरेक्टर क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, शीतल कचरे, डॉ. प्रतीक माने, सुधीर वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील ५३५ खेळाडू सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जिटो प्रिन्सिपल क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, संदीप पाटील, अध्यक्ष, मुंबई झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन, सुरेखा येवले, अध्यक्षा, नवी मुंबई पिंच्याक सिलॅट, असोसिएशन, वीरेंद्र शिव, M.D., मलविन इंटरप्राइज, अनुज सरनाईक, साहेबराव ओहोळ, अरविंद शिर्के, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

स्पर्धेचे 'प्रथम क्रमांकाचा सांघिक चषक' २५ सुवर्ण, ५ रौप्य, १४ कांस्य अशा सर्वाधिक पदकांसह नवी मुंबई संघाने पटकावला. त्याप्रमाणे 'द्वितीय क्रमांकाचा सांघिक चषक' ११ सुवर्ण, ९ रौप्य, १५ कांस्य पदकांसह सांगली संघाने पटकावला. तसेच 'तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक' १० सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदकांसह पुणे ग्रामीण संघाने पटकावला. 

दरम्यान, किशोर येवले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांचा सत्कार करून पिंच्याक सिलॅट खेळाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाल्याची महिती दिली. या राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडू महाराष्ट्राला जास्तीतजास्त पदके मिळवून देतील, असे शिरगावकर यांना सांगितले. पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे; पण, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे महाराष्ट्र संघ मागील ११ वर्षे अव्वल स्थानी असूनसुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना शासनाच्या नोकर भरतीचा आणि योजनांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देऊन खेळाडूंना योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती नामदेव शिरगावकर यांच्याकडे केली.

 त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट या खेळाला खेलो इंडिया वुमन्स लीगमध्ये सामील करून पिंच्याक सिलॅटच्या महिला खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड ह्यांचे आभार मानले. 

नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पिंच्याक सिलॅट खेळाविषयी बोलताना या खेळाचा गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाल्याबद्दल किशोर येवले सरांचे व त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना सरावासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मदत ही महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाईल, असे सांगितले. किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे शिरगावकरांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देण्याचे आश्वासित करून महाराष्ट्रातील खेळाडूंना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या मिटिंगमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा शब्द सर्व खेळाडूंना दिला.

पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. 


या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ?

 महावितरण नागरीकांच्या 

संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ? 




महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी, तक्रार करण्यासाठी दिलेल्या तक्रार‌ कम्रांकांवर संपर्क साधल्यास तो अमान्य किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहेत. महावितरण ज्याप्रकारे पैश्यांचा वसुलीसाठी, थकबाकीकरीत ग्राहकांना सतत फोन करून आठवण करून देते तीच महावितरण विद्युत कंपनी गरजेच्या वेळी ग्राहकांच्या सादेला हाकही देत नाही असे समजते. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्रार करण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा नंबर अस्तित्वात आणावा. किंवा काही तांत्रिक कारणांमुळे, अडचणींमुळे जर महावितरणशी संपर्क साधण्यास अडचणी ग्राहकांना येत येणार असेल तर पर्यायी महावितरणने दुसरा संपर्क क्रमांक तात्काळ ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा. अनेकवेळा विनाकारण वीजपुरवठा खंडित होत असतो. अनेकवेळा विनाकारण लोडशेडींग, भारनियमन सुरू केले जाते परंतु ह्याची ग्राहकांना भणकही नसते. जर काही तांत्रिक कारणांमुळे अडचणींमुळे भारनियमन सुरू होणार असेल तर तसे ग्राहकांना संदेशांद्वारे कळवावे जेणेकरून ग्राहकांचे कामे निलंबित राहणार नाहीत असा मुद्दा अनेकवेळा नागरिकांनी उपस्थित केला होता. महावितरणच्या अश्या बेजबाबदार कारभारावर नागरिकांनी सतत प्रश्न उपस्थित केल्याचे दिसते. विद्युत पुरवठा का खंडित करण्यात आला आहे ह्याचे कारण ग्राहकांना कळाले पाहिजे व ग्राहकांचा महावितरणशी जो संपर्क राहायला हवा तो तक्रार क्रमांक बंद पडल्याने तुटलेला आहे.  आता महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर पडले की काय असा प्रश्न सध्या नागरिकांना सतावतोय . 

मौजे सुकेणे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन उत्साहात

 मौजे सुकेणे विद्यालयात 

राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन

 उत्साहात 

विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना राखी बांधतांना


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२९- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज येथे राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व उपस्थितांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षाला राखी बांधण्यात आली विद्यार्थिनी कु जान्हवी गुरगुडे,कु संध्या हळदे,कु सृष्टी हळदे,कु जागृती पवार यांनी रक्षाबंधन विषयी माहिती करून दिली तर कु हर्षदा गायकवाड,कु सानवी जाधव व शिक्षक अनिल उगले यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची ओळख करून दिली यावेळी सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला अध्यक्षिय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यामागचा हेतू विशद करत व मेजर ध्यानचंद त्यांचे हॉकी विषयीचे कार्य विशद केले सूत्रसंचालन सातवी अ ची विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले व कु अनन्या विधाते यांनी तर आभार कु अनुष्का भोज हिने मानले यावेळी सातवी अ चे विद्यार्थी व त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीम संगीता थोरात यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्याला गणवेश दिला कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व आदी


 

एएसव्ही फाउंडेशन मुंबईच्या वतीने मौजे सुकेणेत शैक्षणिक किट वाटप

 एएसव्ही फाउंडेशन मुंबईच्या 

वतीने मौजे सुकेणेत शैक्षणिक 

किट वाटप . 

 ५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

एएसव्ही फाउंडेशन घाटकोपर मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देण्याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२९- एज्युकेशन सपोर्टस व्हेरियर्स फाउंडेशन घाटकोपर मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील ५० गरीब, होतकरू व आई किंवा वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देत या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या कीट मध्ये उत्कृष्ट दर्जाची स्कूल बॅग, बारा स्क्वायर वह्या, दहा पेन, कंपास पेटी, फूटपट्टी, परीक्षेसाठी आवश्यक असलेला पॅड अशी शैक्षणिक किट असलेली बॅग ५० विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख बीएमसी अधिकारी हरिबा सोनवणे ,सीबीआय अधिकारी सागर बोरणारे,ज्ञानमंदिर हायस्कूल मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल झोरे, कसबे सुकेणे येथील मातोश्री क्लिनिकचे संचालक डॉ योगेश भंडारे आदी उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते अतिथींचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्वयंसेवी संस्थेतील हरिबा सोनवणे,अनिल झोरे व सागर बोरणारे यांनी या स्वयंसेवी संस्थेविषयी माहिती देत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये जाऊन गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदत देत असल्याची माहिती दिली व भविष्यातही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाईल अशी ग्वाही दिली प्राचार्य दवंगे यांनी या दातृत्वाबद्दल उपस्थितांचे आभार मानत ज्या हेतूने शैक्षणिक मदत करण्यात आली तो हेतू साध्य करून विद्यार्थ्यांनी नावलौकिक वाढवण्याचे आव्हान केले सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

 सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या या स्वयंसेवी संस्थेमध्ये आम्ही जोडले गेले असून समाजातील मागे पडलेल्या घटकांना शैक्षणिक मदत करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मदत करत आहोत

 - डॉ योगेश भंडारे, मातोश्री क्लिनिक कसबे सुकेणे

 

गट प्रवर्तक ना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासाठी तीव्र लढा उभारणार :- कॉ. राजू देसले

 गट प्रवर्तक ना राज्य शासनाने 

कंत्राटी कर्मचारी प्रमाणे 

शासकीय सेवेत सामावून घ्यावे 

यासाठी तीव्र लढा उभारणार :- 

 कॉ. राजू देसले



 नंदुरबार: राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये गेली १६ वर्ष कार्यरत गट प्रवर्तक ना आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन आयटक राज्यभर उभारेल असा इशारा कॉ. राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक यानी नंदुरबार येथे झालेल्या गट प्रवर्तक आशा मेळाव्यात दिला.

  हॉटेल डी एस के सभागृह नंदुरबार येथे आयटक वतीने गट प्रवर्तक आशा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विचारमंचावर राज्य उपाध्यक्षा वैशाली खंदारे, मनीषा सहासे, गुली पावरा, रत्ना नंदन, मंदाकिनी पाटिल, ललिता माळी, देविदास नरभवरे, संध्या साळवे, रामेश्वरी वसावे, वसंत वाघ आदि उपस्थित होते.

 कोरोना काळात शहीद झालेल्या अंजना देविदास नरभवरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कॉ. वैशाली खंदारे यांनी गट प्रवर्तक ना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करावे. उच्चशिक्षित गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे च आम्ही काम करत आहोत. तरी शासनाचे आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी दखल घेऊन शासन सेवेत कायम करण्याबत बैठक आयोजित केली होती. त्यात गट प्रवर्तक समावेश नव्हता. हे अंन्यायकारक आहे. त्वरित यात गट प्रवर्तक चा समावेश करावा . अन्यथा तीव्र आंदोलन गट प्रवर्तक करतील असा इशारा दिला. ऑनलाइन ची प्रंचड कामे गट प्रवर्तक वर लादली जात आहेत. मात्र कोणतेही सुविधा दिली जात नाही. त्यामूळे येणाऱ्या काळात बहिष्कार टाकू असा इशारा दिला.

 मेळाव्यात उपास्थित गट प्रवर्तक आशा यांनी समास्य मांडल्या.

 अध्यक्षीय समारोप करताना कॉ. राजू देसले यांनी केंद्र सरकार योजना कर्मचारी चे शोषण करत आहे. उच्चशिक्षित गट प्रवर्तक ना फक्त प्रवास भत्ता देऊन काम करून घेत आहे. हा महीला गट प्रवर्तक चा अवमान केंद्र सरकार करत आहे. कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करण्याबाबत राज्य सरकारने गट प्रवर्तक चा समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन राज्यभर होईल. असा इशारा दिला. 

 मेळाव्यात खालिल ठराव संमत करण्यात आले.

१) गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करा.

२) गट प्रवर्तक ना शासकीय सेवेत कायम करे पर्यंत कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या. आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी ना शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत सूरू असलेल्या प्रक्रियेत गट प्रवर्तक समावेश करावा.

३) केंद्र सरकारने २०१९पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ केली नाही. ती करावी. किमान वेतन लागू करा. सामाजिक सुरक्षा लागू करा

४) आशा गट प्रवर्तक ना आँनलाईन ची कामे देऊ नयेत. 

५) दरवर्षी आशा गट प्रवर्तक ना दीपावली ला बोनस द्यावा. 

 आदि ठराव संमत करण्यात आले. या प्रसंगी उषा पावरा, अनिता महिरे, शेवंती मोरे, माधुरी पाटिल, सरला गिरासे, सुमित्रा वसावे, मालती वळवी, प्राजक्ता कापडणे, जेमा वळवी, शीला गावित, मोगी पाडवी , देवकी गावित, रंजना चव्हाण, मंजुळा सोनवणे, लक्ष्मी ठाकरे, अनिता जाधव नंदा राऊत, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयटक राज्यव्यापी जनजागरण यात्रा कामगार कर्मचारी धोरण विरोधात नंदुरबार जिल्हा येथे आल्यावर यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

मौजे सुकेणेतील चिमुकले गुंतले राखी कार्यशाळेत

 मौजे सुकेणेतील चिमुकले 

गुंतले राखी कार्यशाळेत 

 तयार राख्या पाठवणार अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ! 

 मौजे सुकेणे अभिनव विद्यालयातील विद्यार्थी गुंतले राखी कार्यशाळेत तर दुसऱ्या छायाचित्रात तयार राखी दाखवताना विद्यार्थी








कसबे सुकेणे ता,२८- मराठा विद्या प्रसारक संचालित अभिनव बाल विकास मंदिर मौजे सुकेणे ता,निफाड या विद्यालयातील चिमुकले राखी कार्यशाळेसाठी इतके गुंग झाले होते की जणू आपण शाळेत आहोत की नाही हे देखील विसरून गेले येथील अभिनव विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा प्राचार्य रायभान दवंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली .या कार्यशाळेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यशाळेसाठी दोन गट करण्यात आले पहिली ते दुसरीचा एक गट तर तिसरी ते चौथीचा दुसरा गट तयार करून स्पर्धा घेण्यात आले दोन्ही गटातील अनुक्रमे दोन नंबर काढण्यात आले. तयार झालेल्या राख्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचा मानस शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला असून सदर राख्या अनाथ आश्रमात पाठवण्यात येणार आहे सुरुवातीला या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी राखी कशा प्रकारे तयार करावी याविषयी मार्गदर्शन केले ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे ,प्रियंका खुळे, कावेरी देशमुख, राहुल मोगल, वर्षा चौधरी, प्रियंका मोगल, जाधव मॅडम,राणी साबळे, संगीता पगारे , पुष्पा पगारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली.



 अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने लहान विद्यार्थ्यांमध्ये रक्षाबंधन सणाचे महत्व लक्षात यावे व बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी हा स्तुत्य उपक्रम असून तयार झालेल्या राख्या अनाथांना पाठवण्यात येत आहे

- श्री. रायभान दवंगे,  प्राचार्य मौजे सुकेणे

 

  किशोर येवले यांनी पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रौप्य पदक जिंकून रचला नवा इतिहास अबू धाबी, 22 डिसेंबर 2024: अबू धाबी, दुबई येथे 18 ते 22 डिस...