एएसव्ही फाउंडेशन मुंबईच्या
वतीने मौजे सुकेणेत शैक्षणिक
किट वाटप .
५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
एएसव्ही फाउंडेशन घाटकोपर मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देण्याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्राचार्य रायभान दवंगे व आदी |
कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२९- एज्युकेशन सपोर्टस व्हेरियर्स फाउंडेशन घाटकोपर मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील ५० गरीब, होतकरू व आई किंवा वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देत या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या कीट मध्ये उत्कृष्ट दर्जाची स्कूल बॅग, बारा स्क्वायर वह्या, दहा पेन, कंपास पेटी, फूटपट्टी, परीक्षेसाठी आवश्यक असलेला पॅड अशी शैक्षणिक किट असलेली बॅग ५० विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख बीएमसी अधिकारी हरिबा सोनवणे ,सीबीआय अधिकारी सागर बोरणारे,ज्ञानमंदिर हायस्कूल मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल झोरे, कसबे सुकेणे येथील मातोश्री क्लिनिकचे संचालक डॉ योगेश भंडारे आदी उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते अतिथींचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्वयंसेवी संस्थेतील हरिबा सोनवणे,अनिल झोरे व सागर बोरणारे यांनी या स्वयंसेवी संस्थेविषयी माहिती देत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये जाऊन गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदत देत असल्याची माहिती दिली व भविष्यातही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाईल अशी ग्वाही दिली प्राचार्य दवंगे यांनी या दातृत्वाबद्दल उपस्थितांचे आभार मानत ज्या हेतूने शैक्षणिक मदत करण्यात आली तो हेतू साध्य करून विद्यार्थ्यांनी नावलौकिक वाढवण्याचे आव्हान केले सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या या स्वयंसेवी संस्थेमध्ये आम्ही जोडले गेले असून समाजातील मागे पडलेल्या घटकांना शैक्षणिक मदत करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मदत करत आहोत
- डॉ योगेश भंडारे, मातोश्री क्लिनिक कसबे सुकेणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा