Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

मौजे सुकेणे विद्यालयात समाजदिनी कर्मवीरांना अभिवादन

 मौजे सुकेणे विद्यालयात समाजदिनी कर्मवीरांना अभिवादन 

गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम ट्रॉफी व वृक्ष देऊन सन्मान

मानवी साखळीद्वारे तयार करण्यात आलेले समाज दिन हे नाव

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात समाजदिनी उपसभापती डी बी मोगल,प्राचार्य रायभान दवंगे,लेखिका सुरेखा बोऱ्हाडे , सर्व गुणवंत विद्यार्थी व आदी 

कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,१९- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्म रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्ताने समाजदिनी सर्व कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री व लेखिका सुरेखा बो-हाडे, मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल उपस्थित होते सुरुवातीला रांगोळी, पुष्परचना, हस्तकला व पाककला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उपसभापती डी बी मोगल यांच्या हस्ते समाज दिन ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या हस्ते संस्थेच्या कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी वेशभूषेद्वारे प्रति कर्मवीरांची भूमिका पार पाडली सर्व कर्मवीरांना स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या वतीने मानवी साखळी द्वारे समाजदिन नाव काढून अभिवादन केले प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी तर शालेय पंतप्रधान कु अश्विनी भंडारे, शिक्षक दत्तू पडोळ तर अतिथींच्या वतीने उपसभापती डी बी मोगल व लेखिका सुरेखा बो-हाडे यांनी कर्मवीरांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली यावेळी इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी व वृक्ष देऊन गुण गौरव करण्यात आला. दत्त मंदिर प्रशासनाचे प्रमुख महंत सुकेणेकर महाराज व ज्यू कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले राजेंद्र भालेराव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट दिली तर सुधाकर सोनवणे यांनी सर्व गुणवंतांना व शाळेसाठी वृक्ष भेट दिले, रामराव मोगल यांनी विद्यालयाला चाळीस कुंड्या भेट दिल्या उपस्थितांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे व भारत मोगल यांनी तर आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी मोतीराम जाधव,दिलीप मोगल, माधवराव मोगल,विष्णुपंत उगले, सचिन मोगल,आनंदा भंडारे, संदीप कातकाडे,राजाराम भंडारे, विश्वनाथ मोगल, मुरलीधर मोगल, भाऊसाहेब भंडारे,रामराव मोगल, दत्तात्रय काळे,योगेश मोगल, किरण मोगल,रामनाथ गंभीरे आदीसह स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक पालक व माता पालक संघाचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ,पालक,सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.


शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती निमित्त माहिती.

 कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती विशेष  १३३ वी जयंती 

कर्मवीर रावसाहेब थोरात 
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या बद्दल माहिती 
नाशिक तालुक्यात सुकेणे गावी जन्मलेल्या रावसाहेब भाऊसाहेब थोरात यांचे प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण नाशिकच्या ‘सेंट जॉर्जेस विद्यालय’ मध्ये झाले. तो काळ स्वातंत्र्य चळवळींचा होता. नव्या सामाजिक जाणिवांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले होते. शाळेत शिकत असताना बहुजन समाजातील पाच टक्के विद्यार्थी देखील शिक्षण घेत नाहीत हे रावसाहेबांच्या लक्षात आले. तेव्हा इंग्रजी सहावीत असताना रावसाहेबांंनी पिंपळगाव बसवंत येथील थोर समाजसेवक गणपतदादा मोरे ह्यांनी चालविलेल्या समाज जागृतीच्या कार्यास स्वत:ला वाहून घेतले. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही. या विचाराने, श्रीमंत उदाजीराव महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी १९१४ मध्ये ‘उदाजी मराठा वसतिगृहा’ची स्थापना केली. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यापूर्वीच सुरू झाले होते. या मंडळाची ही पहिली संस्था रावसाहेबांनी नावारूपास आणली. या वसतिगृहात धुळे, जळगाव जिल्ह्यातून मुले जायची.

     राष्ट्रातील बहुजन समाजाला जडलेल्या अज्ञानरोगातून त्याची सुटका करणे या ध्येयाने रावसाहेबांनी लोकसेवेचे व समाज जागृतीचे काम सुरू केले. त्यासाठी ते ‘लोकशिक्षकांच्या’ भूमिकेतून नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी ग्रामसभा घेत, मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करीत, आर्थिक मदतही करीत. १९३६ मध्ये नाशिकमध्ये त्यांनी मराठा विद्यालयाची स्थापना केली. गोरे गल्लीत ही शाळा भरत असे.

     शिक्षणाच्या प्रसारासाठी शासनसंस्थेत बहुजन समाजातील माणसे असणे आवश्यक वाटल्याने रावसाहेबांनी निवडणूक लढविली व नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. १९५२ पर्यंत हा कार्यभार सांभाळला. शिक्षणाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत आधुनिक व उदारमतवादी होता. आत्मशिक्षणाच्या योगाने ‘आत्मविकास करणे व त्या द्वारा आपला देश, आपले राष्ट्र यांच्या उन्नतीस हातभार लावणे म्हणजे शिक्षण’ ही त्यांची शिक्षणाची व्याख्या होती.

     भारतातील महिला ज्ञानसंपन्न झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्रे लिहिली ती ‘बोधामृत’ म्हणून प्रसिद्ध झाली. १९३७ च्या विधिमंडळाच्या निवडणूकीत रावसाहेब नाशिकमधून निवडून आले. नंतरच्या काळात डांग, पेठ, सुरगाणा ह्या आदिवासी विभागाचा त्यांनी कायापालट घडविला. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने १९४१ मध्ये ‘रावसाहेब’ पदवी दिली. पण सरकारी रावसाहेब म्हणून मिरवण्यापेक्षा ‘शेतकऱ्यांचे व गरिबांचे रावसाहेब’ राहण्यातच धन्यता मानणाऱ्या रावसाहेबांनी या पदवीचा त्याग केला. 
रावसाहेब थोरात हे संस्थेचे आद्य संस्थापक बहुजन समाजातील शिक्षणाची अत्यल्प प्रमाण पाहून राजश्री शाहू महाराज थोर समाजसेवक गणपत दादा मोरे कॅप्टन डी आर भोसले आणि कीर्तनराव निंबाळकर यांच्यासह बरोबर समाज जागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला वाहून गेले 1914 मध्ये नाशिक शहरातील इमारतीत वसतिगृह सुरू करून संस्थेचे रोपटे लावले तेव्हा ते अवघ्या 24 वर्षांचे होते त्यानंतर अखेर पर्यंत मोलाचे योगदान देत आयुष्यभर संस्थेच्या संगोपन व कार्यातून घेतले ग्रामीण भागात त्यांनी गावोगावी शिरोड शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याबाबत पालकांचे मन वळविले शेतकरी , ग्रामीण लोकांत  शिक्षणाचे महत्त्व बिंबवले 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब पदवी दिली त्यांचे कार्य याची माहिती तसेच नव्या पिढीला आदर्श व्हावा म्हणून केटीएचम महाविद्यालय नाशिक , माध्यमिक विद्यालय वडील कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुकेने , माध्यमिक शाळा मोहाडी आणि संस्थेच्या सभागृहास त्यांचे नाव दिले त्यांचा जन्मदिन संस्थेतर्फे समाज दिन म्हणून पाळला जातो ते नाशिक जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष होते मुंबई प्रांत विधिमंडळात 1937 आणि मुंबई राज्य विधानसभेत   1952 ते 56 त्यांनी आमदार म्हणून काम केले.  13 मार्च 1958 ला पहाटे त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले .

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

सरस्वती विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा

सरस्वती विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

नाशिक ( दि. १५ ) :- दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित सरस्वती विद्यालय, महात्मा गांधी, रोड नाशिक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह अतिशय जल्लोषात  साजरा  करण्यात आला.   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री. प्रभाकरजी कुलकर्णी,सर सेक्रेटरी मा.श्री.हेमंतजी बरकले सर, अधिक्षिका श्रीमती सुरेखा कमोद मॅडम सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कूल कमिटी सदस्य यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   लेझीमच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे चेअरमन मा.श्री.रवींद्रजी कदम सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    यावेळी उपस्थित मान्यवर,शिक्षक,विद्यार्थी व पालक सर्वांनी  पंचप्राण शपथ घेतली.     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता समारोप वर्षानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले. 'आजादी का अमृत महोत्सव, 'हर घर तिरंगा' मोहिमे अंतर्गत  विद्यार्थ्यांनी

शालेय परिसरात प्रभात फेरी काढून ,घोषणा देत हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार केला. इ.१ ली व २ री  च्या विद्यार्थ्यांनी  भारताच्या स्वातंत्र्यावर आधारित सुंदर अशी नाटिका सादर केली.त्यांना शाळेतील शिक्षिका श्रीमती रंजना वैष्णव,श्रीमती स्वाती आंधळे,सौ.शितल चोथे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्त व क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या. शासनाच्या मेरी माटी,मेरा देश उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी मूठ मूठ माती आणूण कलशात टाकली.

      शाळेचे चेअरमन मा.श्री.रवींद्रजी कदम सर यांच्या अभिनव कल्पनेतून यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाची कायमस्वरूपी आठवण रहावी यासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्यांनी प्राथमिक शाळेतील कायमस्वरूपी स्मरणात राहणाऱ्या आठवणी,नागरीकांचे हक्क व जबाबदारी याविषयी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. अनुराधा बस्ते मॅडम, असिस्टंट सेक्रेटरी सौ.सरला तायडे मॅडम,स्कूल कमिटी सदस्य मा.श्री.विजय शिरसाट सर,मा.श्रीमती नयना कळमकर मॅडम,पा.शि.संघाचे अध्यक्ष, सकाळ सत्र प्रमुख मा.सौ.माधुरी जोशी,शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन श्रीमती स्वाती आंधळे यांनी केले. सौ. जोत्स्ना जोशी,सौ.कविता ठाकरे,श्रीमती प्रिया कुंदे यांनी राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, देशभक्तीपर गीत यांचे गायन केले.श्रीमती पुष्पा गांगुर्डे यांनी घोषणा दिल्या.

मुख्याध्यापिका लता कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 मुख्याध्यापिका लता कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गांधीनगर येथील जनता विद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत मुख्याध्यापिका मंदाकिनी पाटील व पुरस्कार निवड समितीतर्फे सर्व बाबींची पडताळणी करून आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली यात लाता कांबळे यांच्या समवेत जेष्ठ शिक्षक विष्णू राजोळे , माधवी गांगोडे , शैलजा भांगरे यांना या वर्षाचा आदर्श पुरस्कार जाहीर केला आहे आदर्श शिपाईचा पुरस्कार सुनील खालकर तर आदर्श लिपिक पुरस्कार नवनाथ वाळके यांना जाहीर केला आहे पुरस्काराचे वितरण शनिवारी 19 तारखेला समाजदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात केले जाणार आहे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मुख्याध्यापिका श्रीमती पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याबद्दल अभिनंदन केले. 

मौजे सुकेणे विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात ७७ व्या स्वातंत्र्य दिन प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करताना मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, मोतीराम जाधव,अतुल भंडारे व आदी



मौजे सुकेणे विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

कसबे सुकेणे( दि.१५ ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यू कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल होते सुरुवातीला स्काऊट गाईड लीडर कु कल्पेश हळदे याने पुष्पगुच्छ देऊन उपसभापती डी बी मोगल यांचे स्वागत करत त्यांना ध्वजारोहणासाठी निमंत्रित केले याप्रसंगी उपसभापती मोगल यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कलामंच व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी विद्यार्थ्यांसमावेत सामूहिक राष्ट्रगीत,ध्वजगीत,महाराष्ट्र गीत व समूहगीत सादर केले कार्यक्रमासाठी उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे,अभिनव कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव,दिलीप मोगल, सुभाष हळदे,माधवराव मोगल, विष्णुपंत उगले, अण्णासाहेब जाधव,राजाराम भंडारे,विश्वनाथ मोगल,बबनराव वडघुले,रमेश हांडोरे,भाऊसाहेब भंडारे,रामराव मोगल,दत्तात्रय काळे,दत्तात्रय मोगल,रामकृष्ण बोंबले,माधवराव भंडारे,डॉ बाळासाहेब मत्सागर,डॉ जयराज जाधव,अरुण मोगल, रावसाहेब भंडारे,बाळासाहेब काळे,संग्राम मोगल,लालचंद सोनवणे,सुरेश घुगे,डॉ रवींद्र जाधव,योगेश मोगल,किरण मोगल,सरपंच सचिन मोगल,डॉ किरण देशमुख,जयराज दाते आदींसह स्कूल कमिटीचे सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षक पालक व माता पालक संघाचे सदस्य, विशाखा समितीचे सदस्य,ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी नववी ब ची विद्यार्थिनी कु क्रांती काळे हिने वाढदिवसानिमित्ताने गरीब व होतकरू विद्यार्थिनींना वहीचे सेट भेट दिले यावेळी कु श्रावस्ती नन्नवरे,कु जान्हवी अरिगंळे,कु वैष्णवी देशमुख या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिना विषयी मनोगत व्यक्त केले तर अतिथींच्या वतीने उपसभापती डी बी मोगल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य प्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली अध्यक्षिय मनोगतातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी सर्व अतिथींचे स्वागत करत उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले यानंतर स्काऊट गाईड ग्रुपच्यावतीने मौजे सुकेणे येथील शहीद संदीप मोगल यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ग्रामस्थ, स्वातंत्र्य सैनिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य रायभान दवंगे यांच्या हस्ते जवानांच्या आई-वडिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला सूत्रसंचालन भारत मोगल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, अभिनवच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे, शालेय पंतप्रधान कु अश्विनी भंडारे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न

 के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न



नाशिक :- दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी के.के वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण आयोजित गरु - शिष्य स्मृतीमाह स्पर्धा ४० वे निमित्त जिल्हास्तरीय गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा मोठ्या आनंदात , उत्साहात व कूतुहलपुर्वक वातावरणात घेण्यात आली. के.के वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वती नगर कॅम्पस मध्ये दि. ३ ऑगस्ट २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . जिल्हास्तरीय विविध स्पर्धांपैकी ११ ऑगस्ट २०२३ च्या गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेचे संयोजन के.के. वाघ युनिव्हर्सल स्कूल डी.जी.पी नगर , नाशिक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.के वाघ परफॉर्मिंग आर्ट कॉलेजचे प्राचार्य श्री. मकरंद हिंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना श्री. अजिंक्य वाघ म्हणाले की विद्यार्थ्यांच्या लपलेल्या गुणांना वाव देणे व कल्पनाशक्तीचा विकास करणे गरजेचे आहे असे सांगितले. समूह गायन , वैयक्तिक गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी एकूण १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हे विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधून आले होते . सायन्स मॉडेल एकापेक्षा एक अधिक उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कल्पनांचे प्रत्यक्षदर्शी सादरीकरण होते. समूह गायन व वैयक्तिक गायन संपूर्ण वातावरणाला मोहून टाकणारे होते . 
सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे:
ग्रामीण भागातील विद्यार्थी 
वेदांत भोर व स्वरा भोर ( लहान गट ) 
वेदांत करडे व दर्शन घोलप ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
शहरी भागातून निशांत दिवे ( लहान गट) , रोहित पाटील व कार्तिक पांडे ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
के.के वाघ युनिव्हर्सल स्कूल , डी.जी.पी नगर येथील आर्यन नखाटे , ओम कर्डिले व दक्ष मोतारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 
गायन स्पर्धेत ( सामूहिक) 
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, रानवड ( लहान गट ) , राईज एक्सप्रिरियल स्कूल, पिंपळगाव ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
वैयक्तिक गायन स्पर्धेत
आदित्य बस्ते ( लहान गट) 
कृष्णा चौधरी ( मोठा गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विश्वस्त श्रीमती. शकुंतला वाघ व विभागीय सचिव श्री. मच्छिंद्र कदम यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी के.के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. अजिंक्य वाघ , सौ. अवंतिका वाघ सरस्वती कॅम्पसचे समन्वय डॉ. व्हि.एम. सेवलीकर के.के वाघ शाळा व महाविद्यालयाचे समन्वय डॉ. बी.व्ही कर्डिले, शालेय समितीचे अध्यक्ष शि.क नाठे, डॉ. अनिल माळी , प्राचार्य मकरंद हिंगणे, ए.के दिक्षित, सुप्रसिद्ध सतारवादक उध्दव अष्टुरकर , प्राचार्या सौ.अश्विनी पवार , प्राचार्या सौ.निशा एंडाईत, प्राचार्या सौ. अमृत राव व के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्या सौ. चित्रा नरवडे . जिल्ह्यातून आलेले १०४ विद्यार्थी स्पर्धक , शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. उमेश सुर्यवंशी, सौ. प्राजक्ता अत्रे व सौ. स्वप्नाली शिंपी यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.




गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

९ ऑगस्ट रोजी आयटक सलग्न कामगार कर्मचारी संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण विरोधात रस्त्यावर!!

क्रांतीदिनानिमित्त आयटक सलग्न कामगार कर्मचारी संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण विरोधात रस्त्यावर ! 

 

मोर्चेकरांना संबोधित करतांना कॉ. राजू देसले 

नाशिक: केंद्र राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. देशभरात 9 ऑगस्ट रोजी आयटक सह केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. कामगार, कर्मचारी विरोधी चार श्रम सहिता रद्द करा, योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, कंत्राटी नर्सेस, अंगणवाडी सेविका , ग्राम रोजगार सेवक, यांना किमान वेतन लागू करा. गट प्रवर्तक ना शासकीय कर्मचारी दर्जा देईपर्यंत त्वरित वेतन सुसूत्रीकरण मध्ये समावेश करावा. ग्राम रोजगारसेवक अतिरीक्त नेमणूक पत्र रद्द करा. दीपावली बोनस द्या, ग्राम पंचायत कर्मचारी ना पेन्शन लागू करा जीप कर्मचारी दर्जा द्या, अंशकालीन स्री परिचर ना जीप सेवेत सामावून घ्या, शालेय पोषण आहार योजना कर्मचारी ना किमान वेतन लागू करा, घर कामगार मोलकरीण ना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम कामगार ना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमा, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी ना जिल्हा परिषद ने सातवा वेतन लागू करा. जीप सेवेत कायम करा. विज बिल कायदा 2023 रद्द करा. ई पी एस 95 पेंशनर्स ला त्वरित 9हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करा. कामगार कर्मचारी विरोधी धोरण रद्द करा आदि मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. वी .डी धनवटे होते. राज्य सचिव आयटक कॉ. राजू देसले यांनी नेतृव केले 9ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात आंदोलन यशस्वी केले. मोठ्या संख्येने सहभाग होता . 9ऑगस्ट रोजी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथून जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला होता . बैठकीस आयटक नेते सखाराम दुर्गुडे,नामदेव बोराडे, चित्रा जगताप, हसीना शेख, माया घोलप,भीमा पाटील, राजेन्द्र जाधव, एस खतीब, छाया वराडे, रामचंद्र टिळे , निवृत्ती कसबे, राजेन्द्र जाधव,राजेंद्र जगताप, मीनाक्षी मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 


मोर्चाचं आयटक संलग्न संघटना व भाकप, किसान सभा,आशा, गट प्रवर्तक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, विज वर्कर्स फेडरेशन, मोलकरणी , बांधकाम कामगार , ईपी एस 95 पेंशनर्स, कंत्राटी नर्सेस , ग्रिवज कामगार आदि चा सहभाग

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...