Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न

 के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न



नाशिक :- दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी के.के वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण आयोजित गरु - शिष्य स्मृतीमाह स्पर्धा ४० वे निमित्त जिल्हास्तरीय गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा मोठ्या आनंदात , उत्साहात व कूतुहलपुर्वक वातावरणात घेण्यात आली. के.के वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वती नगर कॅम्पस मध्ये दि. ३ ऑगस्ट २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . जिल्हास्तरीय विविध स्पर्धांपैकी ११ ऑगस्ट २०२३ च्या गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेचे संयोजन के.के. वाघ युनिव्हर्सल स्कूल डी.जी.पी नगर , नाशिक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.के वाघ परफॉर्मिंग आर्ट कॉलेजचे प्राचार्य श्री. मकरंद हिंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना श्री. अजिंक्य वाघ म्हणाले की विद्यार्थ्यांच्या लपलेल्या गुणांना वाव देणे व कल्पनाशक्तीचा विकास करणे गरजेचे आहे असे सांगितले. समूह गायन , वैयक्तिक गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी एकूण १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हे विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधून आले होते . सायन्स मॉडेल एकापेक्षा एक अधिक उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कल्पनांचे प्रत्यक्षदर्शी सादरीकरण होते. समूह गायन व वैयक्तिक गायन संपूर्ण वातावरणाला मोहून टाकणारे होते . 
सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे:
ग्रामीण भागातील विद्यार्थी 
वेदांत भोर व स्वरा भोर ( लहान गट ) 
वेदांत करडे व दर्शन घोलप ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
शहरी भागातून निशांत दिवे ( लहान गट) , रोहित पाटील व कार्तिक पांडे ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
के.के वाघ युनिव्हर्सल स्कूल , डी.जी.पी नगर येथील आर्यन नखाटे , ओम कर्डिले व दक्ष मोतारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 
गायन स्पर्धेत ( सामूहिक) 
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, रानवड ( लहान गट ) , राईज एक्सप्रिरियल स्कूल, पिंपळगाव ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
वैयक्तिक गायन स्पर्धेत
आदित्य बस्ते ( लहान गट) 
कृष्णा चौधरी ( मोठा गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विश्वस्त श्रीमती. शकुंतला वाघ व विभागीय सचिव श्री. मच्छिंद्र कदम यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी के.के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. अजिंक्य वाघ , सौ. अवंतिका वाघ सरस्वती कॅम्पसचे समन्वय डॉ. व्हि.एम. सेवलीकर के.के वाघ शाळा व महाविद्यालयाचे समन्वय डॉ. बी.व्ही कर्डिले, शालेय समितीचे अध्यक्ष शि.क नाठे, डॉ. अनिल माळी , प्राचार्य मकरंद हिंगणे, ए.के दिक्षित, सुप्रसिद्ध सतारवादक उध्दव अष्टुरकर , प्राचार्या सौ.अश्विनी पवार , प्राचार्या सौ.निशा एंडाईत, प्राचार्या सौ. अमृत राव व के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्या सौ. चित्रा नरवडे . जिल्ह्यातून आलेले १०४ विद्यार्थी स्पर्धक , शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. उमेश सुर्यवंशी, सौ. प्राजक्ता अत्रे व सौ. स्वप्नाली शिंपी यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...