नाशिक शहर खड्डेमुक्त न झाल्यास मनपा शहर अभियंत्यांवर होणार निलंबनाची कारवाई
🚨 महत्वाची बातमी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नाशिक दौरा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिक महानगरपालिका हद्दीतील खड्डेमय रस्त्यांच्या दुर्दशेबाबत निवेदन सादर केले.
🛣️ नाशिकच्या रस्त्यांची भयावह परिस्थिती
नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. छोटे मोठे सर्व रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. या खड्ड्यांनी नागरिकांचा जीवही घेतला आहे. नागरिक आंदोलन करत आहेत, मात्र महापालिका अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली महापालिका अधिकारी केवळ विशिष्ट ठेकेदारांसाठी मोठ्या मोठ्या क्लब टेंडरिंग करून इतर कामे करण्यातच गुंग आहेत. अधिकाऱ्यांवर कुणाचा अंकुश नसल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुर्दशेकडे कुणीच लक्ष देत नाहीये.
संपूर्ण नाशिककरांचे आरोग्य आणि वाहनांचे नुकसान या खड्ड्यांमुळे होत असल्याने जनमाणसात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. भर पावसात खड्डे बुजविण्याचे कामे देऊन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी अधिकारी आणि ठेकेदार वर्गाने केली आहे. आजही संपूर्ण नाशिक शहर खड्डेमय आहे.
⚠️ १९० किलोमीटर रस्ते खोदण्याची परवानगी
आधीच सर्व रस्त्यांची दुर्दशा असतांना या अधिकाऱ्यांनी नाशिक मधील सुमारे १९० किलोमीटरच्या रस्त्यांना खोदण्याची परवानगी एमएनजीएल कंपनीला देण्याचा घाट घातला आहे. नाशिककरांना आता रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांऐवजी हवेत उडणारी वाहने घ्यावी लागतील, अशीच परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे.
💼 क्लब टेंडरिंगचा प्रश्न
सध्या नाशिक महापालिकेतील अधिकारी विशिष्ट मोठ्या ठेकेदारांचीच काम करत असून छोटे छोटे कामे एकत्रित करून मोठ्या ठेकेदारांनाच कामे मिळावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे असंख्य छोट्या व्यवसायिक, ठेकेदार यांच्यावर अन्याय होत आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात जाऊन ही क्लब टेंडरिंग पद्धत अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. यामुळे छोट्या ठेकेदारांना कामांपासून वंचित ठेवले जात आहे.
📋 शिवसेनेच्या मागण्या
निवेदन सादरकर्ते शिवसेना पदाधिकारी
श्री.विजय करंजकर
उपनेते
श्री.अजय बोरस्ते
उपनेते, जिल्हा प्रमुख
श्री.विलास शिंदे
प्रभारी संपर्क प्रमुख
श्री.चंद्रकांत लवटे
सहसंपर्क प्रमुख
श्री.प्रविण तिदमे
महानगर प्रमुख
समस्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक, नाशिक महानगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा