Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी

जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

नाशिक

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहातर्फे शिक्षणमंत्र्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत शिक्षणाचे साकडे

नाशिक, दि. १३ सप्टेंबर २०२५
राज्यातील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व सर्वसमावेशक करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाच्या वतीने आज शालेय शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

नेतृत्व व उपस्थित मान्यवर

समूहप्रमुख कु. प्रसाद अरविंद भालेकर (संचालक–संपादक : जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल व माहिती संकेतस्थळ) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

उपस्थित मान्यवर: सहसमूहप्रमुख अदित्य रिकामे व अमित सुधाकर पगार, विद्यार्थी नेतृत्व विभाग प्रमुख ओम क्षिरसागर, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व सुभाष सुर्यवंशी, सार्थक अमोल पवार, ओमकार कुटे, श्री लायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनी प्रतिनिधी: नेतृत्व सहप्रमुख प्रगती भडांगे, रोहिणी गांगुर्डे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सिध्दी जोंधळे यांनीही नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत व अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करावी अशी विनंती केली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

१. मोफत व सक्तीचे शिक्षण
RTE Act 2009 चा विस्तार
RTE Act 2009 चा विस्तार करून इयत्ता १ ते १२ वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण लागू करावे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये ३ ते १८ वयोगटासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुचविले असून, महाराष्ट्र राज्याने यासाठी पुढाकार घ्यावा.
२. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुधारणा
गुणवत्तेवर आधारित प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित करून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५% राखीव जागा ठेवाव्यात. जातीवर आधारित भेदभाव टाळून सर्वांसाठी समान कट-ऑफ व समान प्रवेश शुल्क असावे.
३. आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण
AI व ML विषयांचा समावेश
संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (ML) विषयांचा इयत्ता ८ वी पासून १२ वी पर्यंत अभ्यासक्रमात समावेश करावा. संगणक कक्ष व IT सुविधा सर्व शाखांसाठी उपलब्ध करून अतिरिक्त शुल्काची अन्यायकारक पद्धत बंद करावी.
४. प्रवास सुविधा
मोफत एस.टी. बस पास
ग्रामीण भागातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. बस पास व अकरावीपुढील विद्यार्थ्यांना सवलत मिळावी. शाळांच्या वेळेनुसार बसेस सोडाव्यात.
५. परीक्षा व्यवस्था सुधारणा
कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्था
दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी CCTV, बायोमेट्रिक व डिजिटल साधनांचा वापर करावा. शिक्षकांकडून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कारवाई करावी.
६. शिक्षक व शैक्षणिक सुविधा
ग्रामीण भागातील शिक्षक कमतरता
ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षकांच्या कमतरतेची तातडीने पूर्तता करावी. सर्व महाविद्यालयांत प्रयोगशाळा, संगणक लॅब व इंटरनेट सुविधा उपलब्ध करावी. कलागुण विकासासाठी रंगमंच व नाट्यशास्त्र विषयांचा समावेश करावा.
७. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा
समावेशक शिक्षण व्यवस्था
अपंग विद्यार्थ्यांसाठी मोफत वहन, रॅम्प, शौचालय व विशेष शिक्षकांची नियुक्ती करावी. त्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून द्यावे.
८. आरोग्य व मार्गदर्शन
व्यापक विद्यार्थी कल्याण
शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी व दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, महाविद्यालय वातावरण मार्गदर्शन व वयानुरूप समुपदेशनाची सुविधा शाळेतूनच उपलब्ध करून द्यावी.
९. बेकायदेशीर टाय-अप पद्धतीवर बंदी
शैक्षणिक भ्रष्टाचार निर्मूलन
अनेक महाविद्यालये व शाळा बेकायदेशीर टाय-अप पद्धतीने प्रवेश देतात, ज्यामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक फसवणूक होते. या पद्धतीवर तातडीने बंदी आणावी व २०२५-२६ पासून अशी विद्यार्थी बोर्ड परीक्षेसाठी अपात्र ठरवावी.

न्याय्य मागण्या - शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अंमलबजावणी

निवेदनात नमूद केले आहे की या सर्व मागण्या RTE Act 2009, महाराष्ट्र शासनाचे 2011 चे नियम व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या अनुषंगाने पूर्णपणे न्याय्य व विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून अंमलबजावणी करावी!

समूहाने विशेषतः नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक हक्कांसाठी या आंदोलनाची सुरुवात केली असून, राज्यभरातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी हे निवेदन महत्त्वाचे ठरू शकते.

संपर्क

कु. प्रसाद अरविंद भालेकर
समूहप्रमुख, जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक

मो. ९५२९१९५६८८

संलग्न

१) छायाचित्र - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना समूहप्रमुख प्रसाद भालेकर

२) निवेदनाची प्रत (प्रेसकरीता)

© २०२५ जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ, नाशिक

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे माध्यम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...