🔥 LIVE: राज्यातील ११वी प्रवेशात एकरकमी शुल्काची सक्ती • जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा तीव्र विरोध • आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय • हप्त्यांमध्ये फी भरण्याची मागणी
जीवन केशरी
🌟 माहिती संकेतस्थळ • विश्वसनीय बातम्या • समाजसेवा 🌟
🔥 आज की ब्रेकिंग न्यूज
राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती
जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा गंभीर विरोध
नाशिक, दि. ६ जून २०२५ - एकरकमी फी भरण्याची अट अन्यायकारक; हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मागणी
राज्यातील ११वी प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे नाशिकमधील 'जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहा'ने म्हटले आहे. दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या समूहाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
🎓गुणवत्ता यादी जाहीर झाली, पण प्रवेशासाठी आर्थिक अडचणी
गुरुवारी दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता ११वी प्रवेशासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधल्यावर समोर आले की प्रवेश निश्चितीसाठी संपूर्ण वर्षाची फी एकरकमी भरावी लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा