Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, २८ जून, २०२५

११वीचे महाविद्यालय या तारखेला होणार सुरू!
🏛️ जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ नाशिक

११वीचे महाविद्यालय या तारखेला होणार सुरू!

📍 नाशिक
🔴 महत्वाची तारीख: ११ ऑगस्ट २०२५

महाराष्ट्र राज्यात सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. ह्या सर्व कारणांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

🎓 महत्वाची घोषणा

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२५ च्या माहितीनुसार अकरावी महाविद्यालय सुरू करण्यासाठीची तारीख आधीच निश्चित करण्यात आल्याने महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे.

📋 महाविद्यालय सुरुवातीचे नियम

शिक्षण मंडळाच्या माहितीपुस्तिकेतील माहितीनुसार महाविद्यालयात ७५% प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना देण्यात आले आहे. आणि सर्व महाविद्यालये ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करणे अनिवार्य असणार आहे.

जर एखाद्या महाविद्यालयात ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी ७५% पेक्षा जास्त प्रवेश झाल्यास ते महाविद्यालय सुरू करू शकतात त्यांना तसे स्वातंत्र्य आहे.

⚠️ तांत्रिक अडचणी

काही तांत्रिक अडचणींमुळे अकरावी पहिली फेरी यादीची तारीख पुढे ढकलली आहे.

📅 सुधारित वेळापत्रक

तारीख कार्यक्रम
३० जून २०२५ कॅप फेरी - १ व कोटा फेरी १ यांची महाविद्यालय वाटप यादी जारी
१ ते ७ जुलै २०२५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे

🌐 अधिकृत संकेतस्थळ

📱 आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा

नवीन अपडेट्स आणि महत्वाच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा

📲 ग्रुपमध्ये सामील व्हा

शुक्रवार, २७ जून, २०२५

श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचे भव्य भूमिपूजन संपन्न

श्री साईनाथ मंदिर चौक भूमिपूजन - जीवन केशरी

जीवन केशरी

मराठी माहिती संकेतस्थळ, नाशिक

📍 जुने सिडको २६ जुन २०२५

श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचे भव्य भूमिपूजन संपन्न

जुने सिडको, नाशिक येथील श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवसेना महानगरप्रमुख मा. प्रविण (बंटी) तिदमे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी विकास कामाला मंजुरी मिळाली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात असूनही, भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोमात आणि स्थानिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्स्फूर्त उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. या विशेष प्रसंगी अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली.

मान्यवर उपस्थित व्यक्ती

मुख्य अतिथी: मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.

शिवसेना पदाधिकारी: जेष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, शिवसेना उपमहानगरप्रमुख राजेंद्र मोहिते, विभागप्रमुख इसाक शेख, शाखाप्रमुख अजय पंडित, वामनराव राहणे, सुनील जाधव, विक्रम काळे, नाना पाटील, दिलीप जाधव, मछिंद्र घोडके, अविनाश राहणे, संदीप पांडे, नरेंद्र नागरे, शाम जाधव, रामदास शिंदे, हेमंत कोठारी, महेश कुलथे, मिलिंद कतवारे, भास्कर पाटील, सुनील पवार, सुमित कोष्टी, महेश शिंदे, मल्हार भांबेरे यांनी उपस्थिती लावली.

महिला आघाडी: महिला आघाडी नाशिक पश्चिम विधानसभाप्रमुख सुलोचना मोहिते, विभागप्रमुख मंगल पाटील, रंजन तिदमे, शोभाताई जाधव, देवकर ताई, गोडगेमावशी, केंगेताई, सोनल तिदमे, पावटेकर मावशी, साक्षी तिदमे, कविता घोडके, रोहिणी काळे, वृषाली काळे, योगिता पांडे, काजल पाटील आदी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला शोभा दिली.

या भूमिपूजनाच्या निमित्ताने वैदिक मंत्रोच्चारासह परंपरागत पूजा-अर्चना संपन्न करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या विकास कामाचे स्वागत करत, त्यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होत असल्याचे समाधान व्यक्त केले.

"श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणार असून, नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठा फायदा होणार आहे."

या कामामुळे परिसरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारणार असून, पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना प्रवासात सोय होणार आहे.

परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि या भागातील विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या गतीला भरभरून प्रोत्साहन दिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांचे अभिनंदन केले. या विकास कामामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गुरुवार, १९ जून, २०२५

बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन - नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात

बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन - नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात

🎓 बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन 🎓

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था

नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

📅 नाशिक, १९ जून २०२५
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन, नाशिक येथे सोमवारी नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती

या शुभ प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात खालील प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते:

👨‍💼 श्री. बारकू कोशिरे
शालेय समिती सदस्य
👨‍💼 श्री. विजय म्हस्के
शालेय समिती सदस्य
👨‍💼 श्री. सुभाष पाटील
शालेय समिती सदस्य
👨‍⚕️ डॉ. चौधरी
शालेय समिती सदस्य
👨‍🏫 श्री. के. के. तांदळे
मुख्याध्यापक

विद्यार्थ्यांच्या भावना

😊शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मिश्र भावना दिसून आल्या. काही जुन्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्साह वाटत होता, तर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवीन वातावरणामुळे थोडी घाबरवाणी वाटत होती.

❤️काही लहान मुले रडत होती, परंतु शाळेतील अनुभवी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमाने त्यांच्या वर्गात बसवले आणि त्यांचे स्वागत केले.

विशेष व्यवस्था आणि सुविधा

🍽️नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांचे आरक्षण करून त्यांना पौष्टिक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

📖त्यानंतर प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.

शिक्षणाचे महत्त्व

🎯शालेय समिती सदस्य श्री. सुभाष पाटील आणि मुख्याध्यापक श्री. के. के. तांदळे यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे व शाळेचे महत्त्व विशद केले. त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन

🎵कार्यक्रमाच्या सुरळीत संचलनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

🎶उपशिक्षक श्री. शेवाळे यांनी स्वागत गीत सादर केले

✍️सुश्री सविता पेखळे आणि सुश्री शितल शिंदे यांनी फलक लेखनाचे काम केले

🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गावले यांनी कुशलतेने केले

भविष्याची अपेक्षा

🌟मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतून पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

🚀नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळा प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले.

🎓 शिक्षणाच्या प्रकाशाने उजळूया विद्यार्थांचे भविष्य 🎓

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था

शुक्रवार, ६ जून, २०२५

११वी एकरकमी शुल्काविरोधात जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा विरोध

११वी एकरकमी शुल्काविरोधात जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा विरोध

राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती; जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा गंभीर विरोध

एकरकमी फी भरण्याची अट अन्यायकारक; हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मागणी

नाशिक, दि. ७ जून २०२५

राज्यातील ११वी प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे नाशिकमधील 'जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहा'ने म्हटले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या समूहाने शिक्षण व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुणवत्ता यादी जाहीर झाली, पण प्रवेशासाठी अडथळे

गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून संपूर्ण वर्षाची फी एकरकमी भरण्याची अट सांगण्यात येत आहे. हे शुल्क काही ठिकाणी ₹२५,००० पर्यंत आहे, जे अनेकांना परवडणारे नाही.

शासनाने नियम बदलावेत

समूहाने स्पष्ट केले की, सरकारने परिस्थितीनुसार नियम व धोरणे बदलणे आवश्यक आहे. नियमही काळानुसार बदलायला हवेत.

शिक्षणही EMI वर का नाही?

मोबाईल, घर , वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणे शिक्षणासाठीही हप्त्यांमध्ये फी भरण्याची सोय का नसावी? शिक्षण हक्क आहे, व्यवहार नाही, असा सवाल समूहाने उपस्थित केला आहे.

गुणवत्तेचा अपमान

फक्त आर्थिक कारणांमुळे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळणे ही शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली आहे.

पुस्तक वितरण उपक्रमालाही अडथळे

समूहाने मोफत पुस्तक वितरण उपक्रम सुरू केला आहे, मात्र स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

NEP 2020 आणि वास्तव

NEP 2020 मध्ये ३-१८ वयोगटासाठी मोफत शिक्षणाचा अधिकार आहे, पण प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेत ते दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांकडे मागण्या

  • ११वी महाविद्यालय प्रवेश निश्चितीसाठी संपूर्ण वर्षाची फी एकाचवेळी भरण्याची अट शिथिल करावी
  • “ ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश निश्चित करतांना एकरकमी शुल्क अदा करणे शक्हय नाही त्यांनी प्रतीकात्मक शुल्क उदा. ११ रु. , २१ रु. , ५१ रु. १०१ रु. असे शुल्क भरणा करून महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा आणि उर्वरित रक्कम प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भरावी ” असा नियम लागू करावा
  • शिक्षणाच्या व्यवसायीकरणाला आळा घालावा .शिक्षणाला देवतेचा दर्जा असल्याने महाविद्यालय प्रवेश निश्चितीसाठी उपरोक्त निर्णय समर्पक असेल. आणि ती रक्कमही शुभ आहे.

समाजाचा पाठिंबा

शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते या मागण्यांना समर्थन देत आहेत. शिक्षणातून कोणीही वंचित राहू नये हीच भूमिका आहे.

निष्कर्ष

शिक्षण हे सौदा नसून हक्क आहे. शासनाने या विषयात तातडीने लक्ष घालून गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती - जीवन केशरी
🔥 LIVE: राज्यातील ११वी प्रवेशात एकरकमी शुल्काची सक्ती • जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा तीव्र विरोध • आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय • हप्त्यांमध्ये फी भरण्याची मागणी
🌟 माहिती संकेतस्थळ • विश्वसनीय बातम्या • समाजसेवा 🌟
🔥 आज की ब्रेकिंग न्यूज

राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती

जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा गंभीर विरोध

नाशिक, दि. ६ जून २०२५ - एकरकमी फी भरण्याची अट अन्यायकारक; हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मागणी
राज्यातील ११वी प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे नाशिकमधील 'जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहा'ने म्हटले आहे. दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या समूहाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

🎓गुणवत्ता यादी जाहीर झाली, पण प्रवेशासाठी आर्थिक अडचणी

गुरुवारी दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता ११वी प्रवेशासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधल्यावर समोर आले की प्रवेश निश्चितीसाठी संपूर्ण वर्षाची फी एकरकमी भरावी लागेल.
राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती - जीवन केशरी
🚨 ताज्या बातम्या - BREAKING NEWS 🚨

राज्यातील ११वी प्रवेशातील एकरकमी शुल्काची सक्ती

जीवन केशरी विद्यार्थी समूहाचा गंभीर विरोध
📍 नाशिक, दि. ६ जून २०२५ | जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

राज्यातील ११वी प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे नाशिकमधील 'जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहा'ने म्हटले आहे. दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या समूहाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

🎓 गुणवत्ता यादी जाहीर झाली, पण प्रवेशासाठी आर्थिक अडचणी

गुरुवारी दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता ११वी प्रवेशासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधल्यावर समोर आले की प्रवेश निश्चितीसाठी संपूर्ण वर्षाची फी एकरकमी भरावी लागेल.

₹२,५००-३,०००
सरकारी अनुदानित महाविद्यालये
₹८,०००-१५,०००
खाजगी/अनुदानविना महाविद्यालये
₹२०,०००-२५,०००
नामांकित महाविद्यालये

⚖️ सरकार बदलते, नियमावलीही बदलणे आवश्यक

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाने स्पष्ट केले की दर पाच वर्षांनी सरकार बदलत असते, त्यामुळे निर्णय आणि नियमावली बदलणे काळाची गरज आहे. एकाच कर्मचाऱ्याला आयुष्यभर काम करणे शक्य नसल्याप्रमाणे, एका नियमावलीला कायमस्वरूपी ठेवणे योग्य नाही.

परिस्थिती आणि काळानुरूप नियम व प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे.

💳 शिक्षण विक्रीसारखे का?

समूहाने प्रश्न उपस्थित केला की मोबाईल, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करताना शून्य रुपये डाऊन पेमेंट किंवा ₹९९ इतक्या कमी रकमेने सुरुवात केली जाते आणि नंतर हप्त्यांमध्ये EMI दिली जाते, तर शिक्षणासाठी का ही सुविधा नाही?

जर शिक्षण विकण्यायोग्य वस्तू असेल, तर त्यासाठी ₹१, ₹११, ₹२१, ₹५१, ₹१०१ रुपयांपासून टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याची मुभा द्यावी.

🏆 गुणवत्तेचा अपमान

गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक अडचणींमुळे प्रवेश मिळत नसेल तर तो विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क फोडून टाकण्यासारखा प्रकार आहे.

प्रश्न: शिक्षण अधिकार आहे का, की फक्त आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असलेला व्यवसाय?

📚 मोफत पाठ्यपुस्तक वितरण उपक्रमालाही प्रशासनाचा विरोध

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाद्वारे दहावी आणि नववीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. मात्र यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्याची खंत समूहाने व्यक्त केली आहे.

📋 नवीन शैक्षणिक धोरण २०२० व वास्तवातील विसंगती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ३ ते १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. परंतु प्रत्यक्षात प्रवेशासाठी संपूर्ण शुल्क एकरकमी भरण्याची अट आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव आणत आहे.

🙏 मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे अपेक्षा

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शिक्षण मंडळाकडे या विषयावर त्वरीत हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

समूहाच्या मुख्य मागण्या:

  • प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने फी भरण्याची परवानगी द्यावी
  • आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी ₹१ ते ₹१०१ रुपयांच्या सुरुवातीच्या हप्त्यांद्वारे प्रवेश निश्चितीची सुविधा द्यावी
  • शिक्षणाच्या बाजारीकरणाला राज्य सरकार आळा घालावा

🤝 समाजातील प्रतिसाद

या मुद्द्यावर अनेक शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून समर्थन मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणे हा समाजाचा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

📝 निष्कर्ष

शिक्षण हे फक्त व्यवसाय नसून सामाजिक अधिकार आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूलभूत गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करत योग्य ती सुधारणा करणे गरजेचे आहे, अन्यथा गुणवत्ता यादीतील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाचे स्पष्ट मत: शिक्षण हक्क आहे, सौदा नाही. आर्थिक परिस्थितीवर आधारित भेदभाव शिक्षण क्षेत्रात कधीच सहन केला जाणार नाही.

रविवार, १ जून, २०२५

सिंहस्थासाठी राखीव शासकीय जागा भूमाफियांच्या घशात - जीवन केशरी

जीवन केशरी

मराठी माहिती संकेतस्थळ

सिंहस्थासाठी राखीव शासकीय जागा भूमाफियांच्या घशात; दोषी अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी

📍 नाशिक
दि. १ जून २०२५

सातपूर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेने राखीव ठेवलेली शासकीय जागा अनधिकृतपणे अतिक्रमण करून भूमाफियांनी बळकावल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला आहे. याबाबत शिवसेना नाशिक महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तसेच मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

🔍 प्रकरणाचे तपशील

नाशिक येथे दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक देशविदेशातून येत असतात. या पार्श्वभूमीवर सातपूर येथे पार्किंगसाठी शासकीय जमीन आरक्षित करण्यात आली होती. मात्र, हॉटेल प्रतीक्षा व श्री. भंदुरे यांनी या जागेवर अतिक्रमण करून ती बळकावली असून, नगर भूमापन अधिकारी राजेश नितनवरे यांनी त्यांना अनधिकृतरित्या प्रॉपर्टी कार्ड देऊन शासकीय जमीन भूमाफियांच्या नावे करण्याची प्रक्रिया केली आहे.

⚠️ गंभीर आरोप

सिटी सर्वे नं. १३४ अ, ब, क, ड या भूखंडांवर बनावट व बेकायदेशीर प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले असून, संबंधित भूमाफियांना शासकीय जागेचा मालक घोषित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर केवळ ५० लाख रुपयांची उलाढाल करून सरकारी जागा खाजगी व्यक्तींना हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

🚫 प्रशासकीय अडचणी

महानगरपालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्याची माहिती असूनही श्री. नितनवरे व श्री. गणेश फोकणे यांनी या जागेवर अनधिकृत मालकी नोंद करून प्रशासनासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सिंहस्थ मेळ्यादरम्यान संभाव्य चेंगराचेंगरीच्या घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

✍️ मुख्य मागण्या

१. सातपूर सिटी सर्वे नं. १३४ अ, ब, क, ड या बनावट प्रॉपर्टी कार्ड रद्द करण्यात यावीत.
२. श्री. नितनवरे व अन्य दोषी अधिकाऱ्यांची एस.आय.टी व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
३. दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे.
४. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

🚨 जनआंदोलनाचा इशारा

याबाबत शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्री. तिदमे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

"हे पूर्णपणे लज्जास्पद आहे! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राखीव ठेवलेली शासकीय जमीन काही भूमाफियांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मिळीभगतीने बळकावली आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येकाविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. लाखो भाविकांच्या सुविधेशी खेळणाऱ्यांना माफ केले जाणार नाही!"

- प्रविण (बंटी) तिदमे, महानगरप्रमुख, शिवसेना नाशिक

📊 प्रकरणाचा परिणाम

या गंभीर प्रकरणामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या पार्किंगची व्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी तत्काळ कारवाई करून दोषींना शिक्षा देणे आवश्यक आहे.

विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी ...