विधानसभा निवडणुकांमुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन रखडले
नाशिक:- नाशिक शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे ऑक्टोबर महिन्याचे मानधन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमुळे रखडले आहे. आचारसंहिता संपूनही अद्याप त्यांना मानधन मिळालेले नाही.
महिलांनी मनपा आयुक्त कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून आपली व्याकुळता व्यक्त केली असून त्यांच्या निरंतर विनवण्यांनंतरही मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे या महिलांवर उपजीविकेचा मार्ग कोरडा पडला असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.
या महिलांना मिळणारे मानधन त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विधानसभा निवडणूक संपूनही त्यांना मानधन न मिळणे चिंताजनक बाब आहे.
स्थानिक महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन संबंधित महिलांचे थकीत मानधन तत्काल अदा करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
या महिलांचे मानधन ५ हजार इतके असून यांच्या दुप्पट ते दहापट वेतन असणाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो परंतु ह्या गरीब महिलांवर नाशिक महानगरपालिका नेहमी अन्याय करतांनाचे दिसून येते.
निवडणूकीचे कामेही ह्या महिलांनी जबाबदारीने पार पाडले. परंतु कामे करूनही पदरी मनपाने ह्या प्रकारचा केलेल्या कारभारावर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून समस्याचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा