जनता विद्यालयात गणित दिन साजरा
मुलांना आयुष्याचे गणित समजणे महत्वाचे
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २३ रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुध्दीचा व कलेचा अधिपती श्रीगणेशाच्या मंत्र गायनाने झाली. शाळेच्या गीतमंचाने गायन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. शिंदे होत्या. श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गणित विषयाबद्दल प्राची बादशे , इश्वरी शहाणे, निवेदिता धुमाळ, तन्मयी आवारे ह्या विद्यार्थ्यांनीनी माहिती दिली व विद्यालयमध्ये गणित विषयाबाबतची जागृता निर्माण केली. विद्यालयात रांगोळी व गणिताचे चार्ट इ. ह्यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन सुध्दा आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पगारे हिने केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे , एम.एस.पिंगळे व आदी शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा