Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचे महत्व

 उपसभापती डी बी मोगल यांचे मौजे सुकेणे विद्यालयात प्रतिपादन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात स्काऊट गाईड आनंद मेळाव्यात आनंद घेताना विद्यार्थी



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २०- स्काऊट गाईड युनिटच्या माध्यमातून विद्यालयांमध्ये जे आनंद मेळावा आयोजित केला जातो त्यातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने खऱ्या कमाईचे महत्त्व पटून बचत व खर्चात काटकसरीचे महत्त्व लक्षात येते असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे उपसभापती डीपी अण्णा मोगल यांनी केले ते मौजे सुकेने येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित स्काऊट गाईडच्या आनंद मेळाव्यानिमित्ताने उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी अभिनव कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाबरोबरच कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी असा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आल्याचे प्राचार्य रायभान दवंगे यांनी सांगितले. ५० ते ६० विद्यार्थ्यांनी पालेभाज्या,फळभाज्या यांच्यासह विविध खाद्यपदार्थ व विक्री योग्य वस्तू आनंद मेळाव्यात विक्रीसाठी ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सकाळपासून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्काऊट प्रमुख संजय पगार यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व आर्थिक विकासासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माफक दरात भाज्यांची,खाद्य वस्तू व इतर विक्री योग्य वस्तूंचे विक्री केली. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून व्यवहारिक ज्ञान, अनुभव व जीवन कौशल्य मिळविण्याचा प्रयत्न केला प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी केले सूत्रसंचालन श्रीम ज्योती कुशारे यांनी तर आभार मनीषा घोटेकर यांनी मानले आनंद मेळाव्यासाठी सर्व स्काऊट गाईड शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले मेळाव्यासाठी उच्च माध्यमिक कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे,डॉ बाळासाहेब मत्सागर,ॲड उत्तमराव मोगल, आनंदराव भंडारे,योगेश मोगल, रामराव मोगल,रामकृष्ण बोंबले, माधवराव भंडारे,दिलीप मोगल, रामेश्वर काठे,संदीप खोडे आदींसह पालक, विद्यार्थी व सर्व सेवक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...