Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

 शिक्षकांनी वसा व वारसा घेऊन भविष्यात काम करणे काळाची गरज

 मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे सायखेडा येथे सेवापुर्तीत प्रतिपादन

 अँड नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षिरसागर, डी बी मोगल, विश्वासराव मोरे व आदी


 कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३ ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी निवृत्तीनंतर दिलेला वसा व वारसा घेऊन जे काम त्यांनी केले ते आपण सर्वांनी भविष्यात करावे त्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांनी केले ते सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीम मंदा झांबरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर होते अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने काम करून पालकांनी पाल्यास शाळेत ज्या विश्वासाने पाठवले असते त्या विश्वासास पात्र झाले पाहिजे असे ते म्हणाल प्रास्ताविक प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी केले .या कार्यक्रमास मविप्रचे उपाध्यक्ष श्री विश्वास मोरे ,उपसभापती श्री डी.बी. मोगल ,निफाड तालुका संचालक शिवाजीराव गडाख ,इगतपुरी तालुका संचालक श्री संदीप गुळवे ,अँड

.जी एन शिंदे ,चार्टर्ड अकाउंटंट श्री आर आर बस्ते, प्रतापराव मोगल, सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, अँड उत्तमराव मोगल, शिक्षणाधिकारी डॉ अशोकराव पिंगळे,शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांतचार्य महाराज, शालेय समिती सदस्य संजय कांडेकर, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जगन कुटे ,ऋषिकेश गणोरे, अविनाश सुकेनकर,पोपट गोराडे, हरिभाऊ खालकर, भाऊलाल कुटे,भास्कर गायखे, मधुकर भोर, बाबाजी गायखे, अँड प्रशांत पाटील,अरुण पाटील, उमेश डुंबरे ,वनसगावचे सरपंच एकनाथ शिंदे ,एकनाथ उशीर ,उपप्राचार्य श्री शरद शेळके उपस्थित होते शालेय गीतमंचने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले .मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे यांचा सहपत्नीक व उपशिक्षिका श्रीम मंदा झांबरे यांचा सहपतिक मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीमती मंदा झांबरे यांच्याकडून संस्थेसाठी मदत म्हणून प्रत्येकी २१ हजाराचा चेक सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .यावेळी सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे व उपशिक्षिका श्रीमती मंदा झांबरे यांनी विविध आठवणींना उजाळा देत आठवणी जिवंत केल्या सूत्रसंचालन श्रीम प्रतीक्षा शिंदे व अवधूत आवारे यांनी केले .कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

जनता विद्यालयात गणित दिन साजरा

मुलांना आयुष्याचे गणित समजणे महत्वाचे 



 नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २३ रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरुवात बुध्दीचा व कलेचा अधिपती श्रीगणेशाच्या मंत्र गायनाने झाली. शाळेच्या गीतमंचाने गायन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. शिंदे होत्या. श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गणित विषयाबद्दल प्राची बादशे , इश्वरी शहाणे, निवेदिता धुमाळ, तन्मयी आवारे ह्या विद्यार्थ्यांनीनी माहिती दिली व विद्यालयमध्ये गणित विषयाबाबतची जागृता निर्माण केली. विद्यालयात रांगोळी व गणिताचे चार्ट इ. ह्यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन सुध्दा आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पगारे हिने केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे , एम.एस.पिंगळे व आदी शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 स्काऊट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचे महत्व

 उपसभापती डी बी मोगल यांचे मौजे सुकेणे विद्यालयात प्रतिपादन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात स्काऊट गाईड आनंद मेळाव्यात आनंद घेताना विद्यार्थी



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २०- स्काऊट गाईड युनिटच्या माध्यमातून विद्यालयांमध्ये जे आनंद मेळावा आयोजित केला जातो त्यातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने खऱ्या कमाईचे महत्त्व पटून बचत व खर्चात काटकसरीचे महत्त्व लक्षात येते असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे उपसभापती डीपी अण्णा मोगल यांनी केले ते मौजे सुकेने येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित स्काऊट गाईडच्या आनंद मेळाव्यानिमित्ताने उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी अभिनव कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाबरोबरच कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी असा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आल्याचे प्राचार्य रायभान दवंगे यांनी सांगितले. ५० ते ६० विद्यार्थ्यांनी पालेभाज्या,फळभाज्या यांच्यासह विविध खाद्यपदार्थ व विक्री योग्य वस्तू आनंद मेळाव्यात विक्रीसाठी ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सकाळपासून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्काऊट प्रमुख संजय पगार यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व आर्थिक विकासासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माफक दरात भाज्यांची,खाद्य वस्तू व इतर विक्री योग्य वस्तूंचे विक्री केली. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून व्यवहारिक ज्ञान, अनुभव व जीवन कौशल्य मिळविण्याचा प्रयत्न केला प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी केले सूत्रसंचालन श्रीम ज्योती कुशारे यांनी तर आभार मनीषा घोटेकर यांनी मानले आनंद मेळाव्यासाठी सर्व स्काऊट गाईड शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले मेळाव्यासाठी उच्च माध्यमिक कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे,डॉ बाळासाहेब मत्सागर,ॲड उत्तमराव मोगल, आनंदराव भंडारे,योगेश मोगल, रामराव मोगल,रामकृष्ण बोंबले, माधवराव भंडारे,दिलीप मोगल, रामेश्वर काठे,संदीप खोडे आदींसह पालक, विद्यार्थी व सर्व सेवक उपस्थित होते.


बुधवार, २० डिसेंबर, २०२३

जनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन 
नाशिक:- आनंद मेळाव्याचे प्रसंगी प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १९ डिसेंबर रोजी स्काऊट - गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ह्यामध्ये इ. ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये एकूण ४० ते ४५ स्टॉल लावण्यात आले होते . यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करून अनेक रूचकर विशिष्ट पदार्थ व काहींनी बुध्दीचे खेळ असे स्टॉल लावले होते. आनंद मेळाव्याचे उदिष्ट हे विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाचे स्वरूप कळणे व त्यांची व्यवसायाबाबतची आत्तापासूनच तोंडओळख करून देणे जेणेकरून पुढे जाऊन ते यशस्वीरीत्या काहीही गोष्टी अचूकपणे साध्य करू शकतात. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. रावसाहेब मोरे व श्री. काश्मिरे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व स्पर्धकांचे मनोबल वाढवले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

 होमी भाभा विज्ञान परीक्षेत जनता विद्यालयाचे यश

नाशिक:- संकेत खैरनारचा सत्कार करतांना मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे व मार्गदर्शिका एस.एस.पाटील व एम.के.चव्हाण



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथील इयत्ता ९ वी बचा विद्यार्थी कु. संकेत प्रमोद खैरनार डॉक्टर होमी भाभा विज्ञान परीक्षेत मेरीटमध्ये आला असून पुढील राऊंड साठी त्याची निवड झाली आहे. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. शिंदे यांनी सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्या परीक्षेसाठी त्याला एस.एस.पाटील व एम.के. चव्हाण ह्या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


रविवार, १७ डिसेंबर, २०२३

 विद्यार्थ्यांनो शालेय जीवनापासूनच विज्ञानाची कास धरा

 मविप्र उपसभापती डी बी मोगल यांचे मौजे सुकेणेत प्रतिपादन

मौजे सुकेणे तालुका निफाड येथील शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त करताना मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,प्राचार्य रायभान दवंगे व विज्ञान प्रदर्शन पाहताना मान्यवर आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १७- शालेय जीवनातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच विज्ञानाची कास धरावी असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल यांनी केले ते मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड येथे शालेय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते सुरुवातीला विज्ञानाचे जनक व मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपसभापती मोगल,शालेय समितीचे अध्यक्ष मोतीराम जाधव, उच्च माध्यमिक कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे,प्राचार्य रायभान दवंगे व स्कूल कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्कूल कमिटी सदस्य डॉ बाळासाहेब मत्सागर,ॲड उत्तमराव मोगल, सरपंच आनंदराव भंडारे, योगेश मोगल, रामराव मोगल, रामकृष्ण बोंबले, माधवराव भंडारे, दिलीप मोगल, रामेश्वर काठे, संदीप खोडे,प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे आदींच्या हस्ते शालेय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपसभापती मोगल यांनी शिक्षण आणि जीवन यांची सांगड विद्यार्थ्यांनी घातली पाहिजे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. विज्ञान प्रदर्शनांतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडत असतात असे प्रतिपादन केले प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीराम जाधव,अतुल भंडारे, विज्ञान शिक्षक रावसाहेब शेलार व प्राचार्य रायभान दवंगे यांनी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा गटातील एकूण ४९ उपकरणे व ४३ विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन विज्ञान रांगोळी द्वारे व उपकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली सूत्रसंचालन श्रीम ज्योती कुशारे यांनी तर आभार श्रीम मनीषा घोटेकर यांनी मानले विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. उद्घाटन प्रसंगी सर्व स्कूल कमिटी सदस्य ग्रामस्थ सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

 

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांना अभिवादन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात मविप्र संस्थेचे माजी सभापती कर्म विठ्ठलराव हांडे यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी मविप्र उपसभापती देवराम मोगल, अतुल भंडारे ,मोतीराम जाधव, आनंदराव भंडारे,उत्तमराव मोगल,प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १६- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात मविप्र संस्थेचे माजी सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते तर व्यासपीठावर मविप्र उपसभापती देवराम मोगल,उच्च माध्यमिक कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे, सरपंच आनंदराव भंडारे, अँड उत्तमराव मोगल,डॉ बाळासाहेब मत्सागर ,योगेश मोगल,रामराव मोगल,रामकृष्ण बोंबले,माधवराव भंडारे, रामेश्वर काठे,प्राचार्य रायभान दवंगे आदी उपस्थित होते सुरुवातीला अध्यक्ष मोतीराम जाधव,उपसभापती देवराव मोगल प्राचार्य दवंगे व उपस्थितींच्या हस्ते कर्म विठ्ठलराव हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कु वैष्णवी भंडारे हिने तर शिक्षकांच्या वतीने रावसाहेब शेलार, संजय पगार, प्राचार्य दवंगे,अध्यक्ष मोतीराम जाधव यांनी अँड विठ्ठलराव हांडे यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती करून दिली तर अतिथी मनोगतातून उपसभापती देवराम मोगल यांनी कर्म विठ्ठलराव हांडे यांचे मविप्र समाज संस्थेत केलेले कार्य, शेतकरी कामगार पक्ष व विधान परिषदेचे सभापती म्हणून केलेले काम याविषयी माहिती करून दिली प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी,सूत्रसंचालन व स्वागत श्रीम ज्योती कुशारे यांनी तर आभार श्रीम मनीषा घोटेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे, प्रा राजेंद्र धनवटे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

 विद्यार्थ्यांनी गणिताची भीती न बाळगता धैर्याने पुढे जा - प्रा. अविनाश दवंगे


मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात चालू चला वाचूया या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांना पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रा अविनाश दवंगे, व्यासपीठावर उपसभापती डी बी मोगल,प्राचार्य रायभान दवंगे व आदी 


 

कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ९- विद्यार्थ्यांनी गणिताची भीती न बाळगता धैर्याने पुढे गेल्यास जीवनात यशस्वी होऊन आयुष्याचे गणित सुटण्यास मदत होते असे प्रतिपादन बालभारतीच्या पाठ्य पुस्तक निर्मितीत सहभाग असणारे समीक्षक, सूक्ष्म समीक्षक आणि गुणवत्ता प्रशिक्षक के टी एच एम कॉलेजचे प्रा अविनाश गंगाधर दवंगे यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित चला वाचू या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व पालक यांना गणिताची भीती दूर करून गणिताचा अभ्यास कसा करावा या विषयावर पालक मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल ,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे ,ओणे सरपंच संदीप कातकाडे, अभियंता दीपक भंडारे, दिनेश मोरे, रामेश्वर काठे, सौ साधना बोरा ,समाधान सुर्वे, सुनंदा टर्ले ,श्रुती देशमुख,अशोक देवकर, श्याम मोगल, संग्राम मोगल आदी उपस्थित होते प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी प्रा दवंगे यांनी विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा अभ्यास कसा करावा यासाठी सात सूत्र सांगितले तर जीवनात यशस्वी होण्यासाठी गणित विषयाचे कानमंत्र पालक व विद्यार्थ्यांना दिले यावेळी प्रा दवंगे यांची बालभारती पुणे ज्यु कॉलेज आर्ट,सायन्स व कॉमर्स शाखेच्या गणित या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे उपसभापती डी बी मोगल व प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी प्रा दवंगे यांनी शाळेच्या विकास कामासाठी उपसभापती डी बी मोगल व प्राचार्य रायभान दवंगे यांच्याकडे ५०००/- रुपयाचा धनादेश सुपूर्त केला यावेळी उपसभापती डी बी मोगल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, दीपक भंडारे यांनी तर शिक्षकांच्या वतीने दत्तू पडोळ व प्राचार्य दवंगे यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित केले अतिथींचे स्वागत भारत मोगल यांनी ,सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी तर आभार पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पालक संघाचे विलास डेर्ले, रामेश्वर धोंगडे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमासाठी पालक, माता पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात दिव्यांग सप्ताह 

 प्रभात फेरी,व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन


मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात दिव्यांग सप्ताह आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, दिव्यांग सहकारी व विद्यार्थी


कसबे सुकेणे ता ७- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे समाजात दिव्यांगाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढणे, व्याख्यानांचे आयोजन करणे, फलकांद्वारे जनजागृती करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, दिव्यांग विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्राचार्य दवंगे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्या हस्ते विद्यालयातील दिव्यांग शिक्षक सुभाष देशमुख कार्यालयीन कर्मचारी शरद मोरे जगदीश मोगल व सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य दवंगे यांनी दिव्यांग सप्ताह आयोजित करण्यामागचा हेतू विशद करत सर्व दिव्यांग शिक्षक व विद्यार्थ्यांना दिव्यांग सप्ताहाच्या शुभेच्छा देत समाजाने त्यांच्याकडे आपले सहकारी बांधव या दृष्टिकोनातून बघताना यांना शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आवाहन केले

  

 मौजे सुकेणे विद्यालयात महामानवाला अभिवादन




कसबे सुकेणे ता -६ मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व उपस्थितांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कु वैष्णवी देशमुख हिने महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ,समाज सुधारक होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते.त्यांनी जातीभेद व अन्यायाविरुद्ध लढा दिला भारतीय संविधानाचे जनक,दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा महामानव, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्यरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले सूत्रसंचालन कु मिसबा शेख व कु पूर्वजा सांगळे यांनी तर आभार कु नेहा विधाते हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 *(फोटो-मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य रायभान दवंगे,उपस्थित शिक्षक व विद्यार्थी)*



 वकील. सुरेश आव्हाडांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 


नाशिक :- महापरिनिर्वाण दिना च्या निमित्ताने महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चांदवड येथील पविञ स्मृतीस राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ कुठल्याही एका घटकांपर्यंतच मर्यादित नसून त्यांनी बहुजनांना चेहरा निर्माण करुन दिला,माणसांना माणूस बनविण्याचे काम महामानवाने केले असुन बहुजणांच्या उध्दारासाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची केले.वेळे प्रसंगी संपुर्ण कुटुंबानेच हाल अपेष्टा सहन करुन सर्वसमाजासाठी मोठा त्याग केला व गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या समाजाला मुक्त करण्याचे महान कार्य या क्रांतिसुर्याने केले.देश जरी स्वातंञ्य झाला होता तरी खर्या अर्थाने देशातील जनतेला स्वातंञ्य मिळवून देण्याचे काम घटणा निर्माण करुन या शिल्पकाराने केले व त्याचमुळे आज भारतीय नागरीक या स्वातंञ्याचा आस्वाद घेत आहेत.तरी साहेबांची केवळ जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करुन चालणार नाही तर त्यांनी दाखविलेल्या मार्गाने मार्ग क्रमण करुन त्यांचे विचार आत्मसात करायला हवे व त्यांनी दिलेला मुळमंञ शिका,संघटीत व्हा व अन्याया विरूद्ध संघर्ष करा! हा आचारणात आणने ही काळाची गरज आहे. काही जण जाणूनबुजून मनुस्मृती आणु पहात असून पुनः मनुचे राज्य आणण्याचा डाव आखत आहे,तरी अशा जातीवादी संघटणांच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्याची खरी गरज असल्याचे देखील ॲड.सुरेश आव्हाड यांनी यावेळी सांगून 
 *हाती घेऊनी पेणाला बनविली दुधारी तलवारं*
*लिहुनया कायदा देशाचा आजही चालतो कारभारं* असे उदगार काढुन अभिवादन केले.यावेळी विनोद केकाण,गणेश जाधव,समाधान धोञे,किरण पगारे,नितीन जाधव,संदीप केदारे,अशोक जाधव,नाना शिंदे,महेश मोरे,आनंद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.



मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...