Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

 दुःखितांच्या वास्तव वेदना व्यक्त करणे म्हणजे प्रगतिशीलता होय - साहित्यिक बी.जी. वाघ




नाशिक :- "शोषित- वंचित समाजाचा आवाज प्रगतिशील साहित्यातून प्रकट झाला आहे. दुःखितांच्या वास्तव वेदना व्यक्त करणे म्हणजे प्रगतिशीलता होय." असे प्रतिपादन साहित्यिक बी.जी.वाघ यांनी केले. तिसऱ्या नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन अध्यक्ष तुकाराम चौधरी व स्वागताध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांच्या सत्काराचे आयोजन वडाळा नाशिक येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रगतिशील लेखक संघाच्या ८ आक्टो. 23 रोजी नाशिक येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवशीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आणि स्वागताध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल न्यू उम्मीद जनजीवन बहुउद्देशीय संस्था नाशिक, शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती नाशिक, एम्स चॅरिटेबल ट्रस्ट,नासिक जिल्हा इतिहास संशोधक संस्था व संविधान प्रेमी नाशिककर यांच्या वतीने 

न्यू उम्मीद संस्था आलिशान सोसायटी वडाळा गाव नाशिक येथे सत्कार संपन्न. सदर सत्कार समारंभाचे अध्यक्ष छत्रपती शाहू जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष जयवंत खडताळे हे होते.

सुप्रसिद्ध साहित्यिक तथा माजी सनदी अधिकारी बी.जी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना वाघ असे म्हणाले की, 'स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रगतिशील लेखक संघ हा संविधान मूल्यांच्या बाजूने उभा आहे. ही चळवळ अतिशय जोमाने पुढे नेण्याची आज गरज आहे.'

यावेळी ज्येष्ठ पँथर नेते करूणासागर पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागात त्याचबरोबर शहराच्या स्लम एरियांमध्ये जाऊन ही चळवळ रुजवण्यासाठी प्रगतिशील लेखक संघ काम करत असल्याबाबत कौतुक केले . खलील पटेल, तन्जीम खान, मिनाज मिर्झा, हारुण रहेमान शेख व मुकुंद दिक्षित यांची देखील यावेळी भाषणे झाली. आपण प्रगतिशीलता हरवून चाललो आहोत त्यामुळे समाज अधोगतीला लागेल अशी चिंता यावेळेस त्यांनी व्यक्त केली.

    झालेल्या सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष कादंबरीकार तुकाराम चौधरी यांनी आपल्या लेखनाला या अध्यक्षपदामुळे आणि सत्कारामुळे बळ मिळाले असे भावपूर्ण उद्गार काढले. त्याचबरोबर कॉम्रेड राजू देसले यांनी मी रस्त्यावरील लढाईतला आंदोलनातला कार्यकर्ता आहे परंतु त्याच वेळेस सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जे साहित्य लिहिले जाते त्याच्या पूर्ण ताकदीने पाठीशी आहे म्हणूनच मी या उपक्रमात हिरीरीने भाग घेतो आहे, ८ऑक्टोबर रोजी होणाऱ्या साहित्य संमेलन मध्ये वि एन नाईक कॉलेज नाशिक तेथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.

या सत्कार सोहळ्यासाठी प्रगतिशील लेखक संजय संघाचे राष्ट्रीय सचिव राकेश वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे जिल्हा सचिव प्रल्हाद पवार, संविधान सन्मान अभियानाचे शिवदास म्हसदे संविधान प्रेमी नाशिककरचे किरण मोहिते आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी खलील पटेल, 

तन्जीम खान, मिनाज मिर्झा,अजमल खान, ॲड कृष्णा शिलवार, प्रभाकर धात्रक, तबरेश शेख, ॲड. वासिम खान, प्रा.डॉ. यशवंत साळुंखे , डॉ. श्रीहरी थोरवत, डॉ रामदास भौंग, डॉ शरद नागरे, मनोहर पगारे, शिवदास म्हासदे यांनी परिश्रम घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...