Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात कर्मवीर ॲड हांडे यांना अभिवादन 



 मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात मविप्र संस्थेचे माजी सभापती कर्म ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करताना प्राचार्य रायबान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात संस्थेचे माजी सभापती खासदार ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,सायन्स विभाग प्रमुख प्रा शुभांगी गांगुर्डे आदींच्या हस्ते कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनी कु स्नेहल शेवाळे व प्राचार्य रायभान दवंगे यांनी कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे यांच्या कार्याचा आढावा घेत मविप्र संस्थेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली सूत्रसंचालन सहावी ब ची विद्यार्थिनी कु श्रेया सानप व कु तेजस्वी गुरगुडे हिने तर आभार कु सौरभ वाघचौरे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...