Join The WhatsApp group
मंगळवार, ९ मे, २०२३
मुलांसाठी प्रतिबद्ध शाळा कशी असावी?
राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त कवितेतून अभिवादन ..
मंगळवार, २ मे, २०२३
नाशिक:- मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे नाशकात भव्य आयोजन
(प्रातिनिधिक चित्र )
मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे आयोजन
नाशिक:- आजकाल मुले मोबाईलच्या अधीन गेली आहे.कोरोनाकाळात मुलांचे स्वास्थ्य फारच अस्वस्थ झाले आहे त्यांना व्यायाम व शारीरिक व मानसिक विकासाची फारच मोठ्या प्रमाणात गरज आहे काहीमुलांना फारच लहान वयात चष्मा लागतो काहींचे वजन फारच जास्त असते , उंचीचे प्रमाण कमी असणे अश्या विविध समस्या मुलांमध्ये आढळून येतात व आता मुलांना उन्हाळी सुट्यांची सुरूवात झालेली आहे तर ह्यात मुलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी व आरोग्य सुदृढ मार्शल आर्ट फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ह्या शिबिरात कराटे प्रशिक्षण, सुर्य नमस्कार, भारतातील प्राचीन व्यायाम पद्धती, लाठीकाठी शिकवणार आहेत तसेच गोल्फ घोडेस्वारी व पिस्तुल रायफल शूटिंग यांची तोंड ओळख करून दिली जाणार आहे. तसेच तज्ञांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे. मुलांना मंत्रशास्त्र , शरीरशास्त्र , मानवशास्त्र व भाषाशास्त्र यांची माहिती दिली जाणार आहे. मुलांची शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी व्यायाम हा फार महत्वाचा आहे व मुलांनी व्यायाम करणे फार गरजेचे असे तज्ञांकडून समजते. ह्या व्यायामाची आपल्याला फारच गरज आहे ह्यातुन कोरोना सारख्या महामारींचा सामना करणे अतिशय सोपे होणार आहे.ह्यात मुलांचा खेळातील पाया मजबूत होईल तसेच त्यांचा सार्वांगिक विकास होण्यासाठी प्रतिबध्द असे हे शिबिर आहे. शिबिराचा कालावधी ४ मे २०२३ ते १८ मे २०२३ असा असणार आहे. शिबिराचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी ३००/- आहे. शिबिराचे ठिकाण :- समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड, नाशिक येथे आहे. सकाळी ६:३० ते ७:३० व सायंकाळी ६:३० ते ७:३० ही शिबिराची वेळ आहे. अधिक माहितीसाठी श्री. अरविंद भालेकर मो. 9545979501/9529195688 ला संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...
-
नाशिक महानगरपालिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि राजकीय ...
-
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी हो...
-
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...