Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

जालनातील लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी सेल कडून आत्मक्लेष आंदोलन !

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मांना निवेदन 



नाशिक :- 

मनिपुर मधे झालेल्या हिंसाचाराच्या व जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष आंदोलन करण्यात येऊन नाशिक जिल्हधिकारी श्री जलाज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.



    गेले अनेक वर्षांपासून इतरमागासवर्गीय समाज जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करतोय.यासाठी अनेक आंदोलने व निवेदन देऊन झालेली असुन स्व.गोपीनाथजी मुंढे तसेच भुजबळ साहेबांनी देखील अनेकदा जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.तरीसुद्धा कोणतेही सरकार यावर ठोस निर्णय घेत नाही.आता भुजबळ साहेब सत्तेत असुन केंद्रात देखील मिञपक्षाचे सरकार असल्याने भुजबळ साहेबांनी जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा,अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जची तसेच मनिपुर मधील हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत केंद्रीय ग्रुह मंञी अमित शहा व महाराष्ट्राचे ग्रुहमंञी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावे OBCच्या अथवा इतर कुठल्याही घटकाच्या आरक्षणास धका न लावता 

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे.यासाठी शेड्युल्ड ९ चा वापर करण्यात येऊन आरक्षणावर घालण्यात आलेली ५०%ची मर्यादा काढून टाकण्यात यावी.तामिळनाडू च्या धरतीवर आरक्षणाची मर्यादा वाढविल्यास सर्वच घटकांना आरक्षणाचा फायदा होईल.अर्धवट मंडल आयोग लागू केल्याने OBC समाजाचे मागासलेपणा कमी झालेले नसून मराठा समाजाला सरसकट कुणबी च्या माध्यमातून OBC आरक्षण दिल्यास कुणबी समाजा बरोबरच OBC च्या इतर घटकांवर मोठा अन्याय होईल व त्या माध्यमातुन मराठा समाजाच्या पदरात देखील काही पडणार नसुन हे जुमलेबाज सरकार सरसकट मराठा समाजाला कुणबी च्या नावाने OBC मधे घुसवुन वेळ काढु पणा करत आहे. असे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही व हे सरकार मराठा OBC वाद लावुन दंगली घडविण्याच्या मनस्थिती असल्याने त्वरित जातनिहाय जनगणना करण्यात येऊन मराठा,ब्राम्हण,जैन,शिख, ख्रिश्चन या सर्व घटकांना संख्येनुसार आरक्षण देण्यात यावे.इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करुन इतर मागासवर्गीय समाजाचे न्यायालयाने थांबविलेले राजकिय आरक्षण पुनः सुरु करण्यात यावे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॅालर्शीप वेळेत देण्याची व्यवस्था व्हावी.ओबीसी वर्गाचा अनुशेष भरण्यात यावा रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागु कराव्यात.जालना जिल्ह्यामधे मराठा आंदोलकवार झालेल्या लाठीचार्जचा तपास करण्यात येऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे,हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण,भारतीताई चित्ते,रेखा शेलार,ॲड.शाम तावरे,ॲड.नितीन जाधव,अमोल कदम,ॲड.नामदेव गिते,बन्सिलाल भागवत,गणेश धोञे,राजेंद्र मोरे,शारदा मोरे,रंजना पगार,चंद्रकला बुरडे,मीना पेहरकर,अभिलाश भावसार,वसंत पगार,रमेश निकम,भास्कर धुमाळ,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे बालगोपालांकडून

 दहीहंडी उत्सव

मौजे सुकेणे अभिनव बाल विकास मंदिर च्या विद्यार्थ्यांकडून दहीहंडी उत्सव याप्रसंगी वेशभूषा केलेले बालगोपाल, शिक्षक, विद्यार्थी व पालक


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता ६ - मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर मौजे सुकेणे ता निफाड येथील बालगोपालांकडून दहीहंडी उत्सवासह गोपाल काला हा कार्यक्रम प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीम संगीता सोनवणे तर व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे उपस्थित होत्या .सुरुवातीला उपस्थित पालक व शिक्षकांच्या हस्ते सरस्वती मातेचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीम प्रियंका खुळे यांनी उपस्थितांना माहिती करून दिली यावेळी विद्यार्थ्यांनी बाल श्रीकृष्ण, राधा, गोपाल व गोपिकाऔ यांच्या वेशभूषा परिधान करत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळावर नृत्य सादर केले व मोठ्या उत्साहात बाल गोपालांकडून दहीहंडी फोडण्यात आली उपस्थितांना दही प्रसादाचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन प्रियंका मोगल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ठाकरे, वर्षा चौधरी, प्रियंका खुळे,कावेरी देशमुख, राहुल मोगल ,प्रियंका मोगल, राणी साबळे,मीरा जाधव, संगीता पगारे,पुष्पा पगारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी पालक वर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 मौजे सुकेणेची खूशी बोरा 

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत

 द्वितीय

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु खुशी बोरा हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करताना संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे व आदी.







कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता ६- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने समाज दिनानिमित्ताने माझी शाळा माझा अभियान या उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयाची सहावी अ ची विद्यार्थिनी कु खुशी दिलीपकुमार बोरा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तिला शिक्षक दिनी संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी बी मोगल, तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख,शिक्षणाधिकारी डॉ अशोक पिंगळे, तिचे वडील दिलीपकुमार बोरा आदी उपस्थित होते तिच्या या यशाबद्दल प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, तिच्या मार्गदर्शक कला शिक्षिका सविता कापडी,विशाखा वाघ ,सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले

  

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात डॉ 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 

अभिवादन

 शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनवून चालवली शाळा

फोटो मौजे सुकेणे विद्यालयात शिक्षक दिनी शिक्षक बनलेले सर्व विद्यार्थी, प्राचार्य रायभान दवंगे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक









कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता.५- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता.निफाड विद्यालयात शिक्षक दिनी भारताचे उपराष्ट्रपती थोर शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते. सुरुवातीला प्राचार्य दवंगे व उपप्राचार्य अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,पंतप्रधान आश्विनी भंडारे,उपपंतप्रधान ओमकार शेवकर व उपस्थितांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून ज्ञानदानाचे काम केले मुख्याध्यापक म्हणून कु अश्विनी भंडारे,उपमुख्याध्यापक म्हणून कु ओमकार शेवकर तर पर्यवेक्षिका म्हणून कु उत्कर्षा भार्गवे व कु प्रीती गांगुर्डे यांनी काम पाहीले शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व गुरुजनांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आदर्श ठरलेल्या विद्यार्थी शिक्षक कु तेजल भोज,निकिता केदारे, नुजहत टाकारी,साक्षी कर्डक,यश गुरगुडे,शिफा शेख,पायल धुळे, भक्ती भंडारे,उम्मेहानी पठाण, अक्षरा गांधी,आदित्य रावते, गायत्री पवार,उत्कर्षा भार्गवे,भक्ती शेवकर,अश्विनी धनराव,सिद्धी जाधव,उदय कुयटे,गायत्री मोरे, धनश्री पागेरे,कल्पेश हळदे,स्नेहल भंडारे,अश्विनी भंडारे,अनुष्का भंडारे,आशिष विधाते यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय पंतप्रधान कु आश्विनी भंडारे हिने केले यावेळी कु आशिष विधाते, कृणाल कुमावत,धनश्री पागेरे, कल्पेश हळदे, यश गुरगुडे,कृष्णा भंडारे,ओमकार शेवकर यांनी शिक्षक म्हणून आलेले अनुभव कथन केले तर शिक्षकांच्या वतीने दत्तू पडोळ व प्राचार्य रायभान दवंगे यांनी मनोगतातून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून का साजरी केली जाते याविषयी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन कु श्रुती बोरा व तेजल भोज हिने तर आभार कु रसिका शिंदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

 जनता विद्यालयात शाहीर साबळेंना मानवंदना

शाहीर कृष्णराव साबळे
( छाया संग्रहित ) 


नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शाहीर‌ अर्थात शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. ३ सप्टेंबर २०२३ रोजी यांची जन्मशताब्दी आहे. विद्यार्थी प्रसाद भालेकर ह्याने शाहीर साबळेंच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व जेजुरीच्या खंडेराया हे गीत शाहीर साबळेंच्या जयंती स्मरणार्थ सादर करून मानवंदना दिली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी. शिंदे , श्रीमती. जाधव मॅडम , श्रीमती. पिंगळे मॅडम , श्रीमती गोवर्धने मॅडम , श्रीमती गटकळ मॅडम , श्रीमती घुमरे मॅडम , श्रीमती पाटील मॅडम , श्री. बेंडकोळी सर , श्रीमती गायखे मॅडम , श्रीमती ठाकरे मॅडम आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. परिपाठ समिती प्रमुख श्रीमती चौधरी मॅडम ह्यांचे मार्गदर्शन मिळाले.


शाहीर कृष्णराव साबळेंना‌ जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतांनाचे बॅनर 
( प्रसाद ग्राफिक्स आर्ट व जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तथा बातमी संकेतस्थळ ) 


शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

 आरोग्य अभियान कार्यरत गट प्रवर्तक चा राज्य व्यापी मोर्चा १३सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान वर

 नाशिक: राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत गट प्रवर्तक चा राज्यव्यापी मोर्चा मुंबई येथे आझाद मैदान वर आयोजित करण्यात आला आहे. आज मागणी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना देण्यात आले. गट प्रवर्तक ना शासकिय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या व इतर मागण्यांसाठी दि. १३/०२/ २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११.०० पासुन विराट मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत.


महाराष्ट्रामध्ये सन २००५ सालापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीपासुन गटप्रवर्तक या अभियानात काम करीत असुन सध्या महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची संख्या ३५०० पेक्षाही जास्त आहे. बहुतांश गटप्रवर्तक पदवीधर आहेत. गटप्रवर्तकांची नेमनुक सरकार करते. त्यांना मानधन सरकार देते. त्यांना दंड, शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे. म्हणजे त्यांचा "मालक” सरकार असुन गटप्रवर्तक या शासनाच्या “कर्मचारी" आहेत. या तत्वानुसार एनएचएम ही "आस्थापना" आहे. गटप्रवर्तकांची नेमनुक भारतीय संविधानानुसार आरोग्य विषयक घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरीता झाली आहे. एनएचएम सारख्या तात्पुरत्या योजनेचा गटप्रवर्तक भाग नाहीत तर एनएचएम योग्य रित्या चालवण्यासाठी गटप्रवर्तकांची पदे कायदयाने (Statutory Post) निर्माण केलेले पदे आहेत..साधारणतः वीस आशा स्वंयसेविकांसाठी एका गटप्रवर्तकाची नेमनुक करण्यात आली आहे. गटप्रवर्तकांना त्यांच्या जॉब चार्ट नुसार वीस दिवस पी.एच.सी. च्या कार्यक्षेत्रात दौरे करुन पाच दिवसात आशांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करुन वरीष्ठांना सादर करावा लागतो. दौऱ्या दरम्यान गटप्रवर्तकांना आशांना भेटी देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आशांच्या कामावर देखरेख करणे ही कामे करावी लागतात. म्हणजेच त्यांना सुपरविझनचे व क्लार्कचे असे दोन्ही कामे करावी लागतात. त्यामुळे गटप्रवर्तक या कुशल कर्मचारी या वर्गातमोडतात. गेली १८ वर्षापासून हे काम गटप्रवर्तक दररोज ८ तासापेक्षाही जास्त वेळ काम करत आहेत. त्यांच्या जॉब चार्ट व्यतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेली कामे सुध्दा त्यांच्या कडुन सक्तीने करवुन घेतले जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत गटप्रवर्तकांना ११ महिन्याची आर्डर दिली जाते. नंतर दोन दिवस ब्रेक देऊन वैदयकीय अधिकारी यांच्या शिफारशीनुसार त्यांची पुनर्नियुक्ती केली जाते. अशाच प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. परंतु गटप्रवर्तकांना शासन कंत्राटी कर्मचारी मानत नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलेले लाभ गटप्रवर्तक कंत्राटी असुनसुधा तसा त्यांच्याबरोबर करार करुन सुध्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ गटप्रवर्तकांना शासन नाकारत असून महाराष्ट्र शासन या ३५०० गटप्रवर्तकांवर दररोज अन्याय करीत आहे. एनएचएमकडुन गटप्रवर्तकासोबत केलेल्या करारात फक्त दौऱ्यावर आधारीत प्रवास भत्ता देण्याचे नमुद आहे. त्यांना दरमहा साधारणतः १३५०० रुपये मोबदला प्रवासासाठी मिळतो. त्यात त्यांचा सध्याच्या महागाईच्या काळात प्रपंच चालणे कठिण आहे. प्रवास खर्च वितीरिक्त किमान वेतन लागू करा.


आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासन यांचा आदेश जा. क्र. राआसोमु / मनुष्यबळ कक्ष / वेतन सुसूत्रीकरण / ५०३३३-५४१३० दि. ५ ऑक्टोबर २०२० अन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सुसूत्रीकरण करुन त्यांना नवीन वेतनश्रेणी लागु केलेली आहे. एनएचएम मधील कंत्राटी कर्मचारी Data entry operator यांना दरमहा १८००० वेतन मिळते. हे काम क्लेरीकल आहे. तसेच गटप्रवर्तकांचे कामसुदधा क्लेरीकल व सुपरविझनचे असुनसुदधा शासन गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी मानत नाही. जा. क्र. राआसो/ मनुष्यबळ / कं. कर्म/ वा. मानधनवाढ व अनुभव बोनस / १२५७४३-१२६१३१/२०२२ दि. ०३/०२/२०२२ या आदेशान्वये कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५% वार्षिक वेतनवाढ व १५% अनुभव बोनस (Loyalty Bonus) शासन देते. गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा खुप कमी आहे. एकाच क्षेत्रात एक समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात खुप मोठी तफावत ठेवणे हे योग्य वाटत नाही.


दि. १८/०८/२०२३ रोजी मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य, म.रा.यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात दहा वर्षे सेवा पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात आला नाही. तेव्हा गटप्रवर्तकांनाही सदर निर्णयानुसार शासकिय सेवेत कायम करण्यात यावे. वरील परिस्थितीत आम्ही खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत. मागण्या:-


१. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागु असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षीक वेतनवाढ ५% व अनुभव बोनस (Loyalty Bonus) १५% गटप्रवर्तकांनासुध्दा लागु करावा. याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा.


२.गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत. 


३.गटप्रवर्तक या आशांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांना भेटी देणे, अशी कामेकरतात. ही सर्व कामे सुपरव्हिजनची आहेत. "गटप्रवर्तक" हा शब्द जनमानसांना समजण्यासाठी कठिण आहे. तेव्हा गटप्रवर्तकांना "गटप्रवर्तक " ऐवजी "आशा सुपरवायझर" हे नाव देण्यात यावे. 


५.गटप्रवर्तकांना ऑन-लाईन कामे सांगण्यात येतात. त्याकरीता त्यांना स्मार्ट फोन देण्यात यावा. तसेच डेटा पॅक रिचार्ज करण्यासाठी दरमहा ३०० रुपये देण्यात यावेत. गटप्रवर्तकांचा आरोग्यवर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत

आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करुन दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.


६.गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु. २५०

दिले जात होते. आशा सॉफटवेअर बंद असल्याचे कारण पुढे करुन सदर मोबदला देण्याचे बंद केले आहे. आशा सॉफटवेअर जरी सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा

गटप्रवर्तकांना सदर मोबदला प्रति महा रु. २५०/- पुर्ववत सुरु करण्यात यावा. 


वरील प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी दि. १३/०९/२०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११.०० पासून विराट मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा शिष्टमंडळाला वेळ देवून सहानुभुतिपूर्वक चर्चा करुन प्रश्न त्वरीत निकाली काढावेत. अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा कृती समिती व आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशागटप्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले वतीने करीत आहोत. गट प्रवर्तक नी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुवर्णा मेतकर, प्रतिभा कर्डक, सुवर्णा लोहकरे, बेबी धा त्रक, सुनीता कुलकर्णी, अर्चना गडाख, मनिषा राजगुरू, अरुणा आव्हाड, सुनीता गांगुर्डे, गीतांजली काळे, आदींनी केले आहे 



 खेलो इंडिया वुमन्स लीग पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्चस्‍व


नवी मुंबई : स्पोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल कोपरखैरणे, नवी मुंबई येथे २६ व २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबईच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले‌.


या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे नगरसेवक

ममितजी चौघुले, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जैसन मुंबई झोन मॅनेजिंग डायरेक्टर क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, शीतल कचरे, डॉ. प्रतीक माने, सुधीर वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील ५३५ खेळाडू सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जिटो प्रिन्सिपल क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, संदीप पाटील, अध्यक्ष, मुंबई झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन, सुरेखा येवले, अध्यक्षा, नवी मुंबई पिंच्याक सिलॅट, असोसिएशन, वीरेंद्र शिव, M.D., मलविन इंटरप्राइज, अनुज सरनाईक, साहेबराव ओहोळ, अरविंद शिर्के, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

स्पर्धेचे 'प्रथम क्रमांकाचा सांघिक चषक' २५ सुवर्ण, ५ रौप्य, १४ कांस्य अशा सर्वाधिक पदकांसह नवी मुंबई संघाने पटकावला. त्याप्रमाणे 'द्वितीय क्रमांकाचा सांघिक चषक' ११ सुवर्ण, ९ रौप्य, १५ कांस्य पदकांसह सांगली संघाने पटकावला. तसेच 'तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक' १० सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदकांसह पुणे ग्रामीण संघाने पटकावला. 

दरम्यान, किशोर येवले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांचा सत्कार करून पिंच्याक सिलॅट खेळाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाल्याची महिती दिली. या राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडू महाराष्ट्राला जास्तीतजास्त पदके मिळवून देतील, असे शिरगावकर यांना सांगितले. पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे; पण, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे महाराष्ट्र संघ मागील ११ वर्षे अव्वल स्थानी असूनसुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना शासनाच्या नोकर भरतीचा आणि योजनांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देऊन खेळाडूंना योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती नामदेव शिरगावकर यांच्याकडे केली.

 त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट या खेळाला खेलो इंडिया वुमन्स लीगमध्ये सामील करून पिंच्याक सिलॅटच्या महिला खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड ह्यांचे आभार मानले. 

नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पिंच्याक सिलॅट खेळाविषयी बोलताना या खेळाचा गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाल्याबद्दल किशोर येवले सरांचे व त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना सरावासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मदत ही महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाईल, असे सांगितले. किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे शिरगावकरांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देण्याचे आश्वासित करून महाराष्ट्रातील खेळाडूंना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या मिटिंगमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा शब्द सर्व खेळाडूंना दिला.

पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. 


या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...