Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा 



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २७ मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी अभिनव कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते सुरुवातीला राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण मविप्र संस्थेचे उपसभापती मा श्री डी बी अण्णा मोगल यांच्या शुभहस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री अतुल भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्काऊट गाईड पथकाने संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष कामगिरी करणारे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लेझीम पथक प्रात्यक्षिक ,तिरंगा कवायत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा हेतू विशद करत अतिथींचे स्वागत केले यावेळी प्रशांत रावसाहेब मोगल यांनी शाळेला ११०००/- रुपये भेट तर संग्राम मोगल यांनी ५०००/-रुपये तर बाळासाहेब काळे यांनी ३०००/- रुपये भेट दिली कार्यक्रमासाठी सरपंच सुरेखा चव्हाण,उपसरपंच सचिन मोगल, रामराव मोगल, विश्वनाथ मोगल, सुभाष हळदे,विष्णू उगले, मुरलीधर मोगल, लालचंद सोनवणे, दिलीप मोगल, डॉ रवींद्र जाधव,बबन वडघुले, राजाराम भंडारे,भाऊसाहेब भंडारे बाळासाहेब काळे, रामकृष्ण बोंबले, अरुण मोगल,सोसायटी चेअरमन प्रकाश मोगल, सतीश मोगल,रावसाहेब मोगल, संग्राम मोगल, रामेश्वर काठे, दिनकर मोगल,अशोक भंडारे,श्याम मोगल,प्रकाश धुळे, चंद्रशेखर नळे आदी सह सर्व स्कूल कमिटी सदस्य,शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, विशाखा समिती, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासह उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे,अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे, सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांनी मानले

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

 ईव्हीएम निवडणुकीच्या विरोधात संविधान प्रेमी वकील भडकले 

संविधान प्रेमी वकील समितीच्या वतीने निदर्शने 



नाशिक :- जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत संशय असुन लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची सर्व स्तरातुन मागणी होत असतांना देखील केवळ निवडणुका जिंकण्यासाठी च ईव्हीएम चा घाट घातला जात असुन त्वरित ईव्हीएम बंद करण्यात येऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात येऊन उपजिल्हाधीकारी श्री.वाघ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संविधान प्रेमी वकील समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड,ॲड.पागिरे, ॲड.वायचळे,ॲड.राजेंद्र नन्नावरे,ॲड.लिलाधर जाधव,ॲड. मोरे साहेब,ॲड.सुधीर जाधव,ॲड.सुभाष गिते,ॲड.संदीप दंडगव्हाण,ॲड. भालेराव,ॲड.आर.एन कांबळे , अॅड . निलेश सोनवणे, लक्ष्मण सोनवणे,भारती चित्ते आदींसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

 स्वीटी जाचकला पीएचडी प्रदान



 
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३- मौजे सुकेणे ता निफाड येथील श्रीम शोभा मनोहर मोगल ह.मु नाशिकरोड यांची कन्या श्रीम स्वीटी गोदीराम जाचक उर्फ स्वीटी गोकुळ महाजन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये नुकतीच पीएच.डी. पदवी नाशिकच्या अग्रगण्य संदीप विद्यापीठातून प्राप्त केली. त्या सध्या गुरू गोविंदसिंग इंजिनियरिंग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी डीप लर्निंग या विषयावर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना इलाहाबाद आयआयटीतील डॉ. सयांतन नाथ आणि संदीप विद्यापीठातील संगणक विभाग प्रमुख डॉ. पवन भालदारे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिची आई शोभा मोगल(जाचक) वडील गोटीराम जाचक यांच्यासह अँड एन जी गायकवाड, मविप्र संस्थेचे माजी उपसभापती ॲड पंडितराव पिंगळे,सचिन पिंगळे,डॉ एम एन जाचक, मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम मोगल, अँड  रत्नाकर गायकवाड,,सुरज जाचक,भारत मोगल,गोकुळ महाजन आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या


शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

जनता विद्यालयाला यशोन्नती ; शाळेला सुवर्ण, रौप्य , कांस्यपदकांची पर्वणी 



नाशिक:- CPS OLYMPIAD FOUNDATION तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर बाह्यपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. ह्या परीक्षेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक -१ शाळेतील एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी एकूण ३३ विद्यार्थ्यांना यशोन्नती मिळाली आहे. यामध्ये १३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, १० विद्यार्थ्यांना रौप्यपदक , १०विद्यार्थांनी कांस्यपदक मिळविले आहे आणि २४ विद्यार्थ्यांची दुसऱ्या राऊंड साठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी शाळेतील समन्वयक के.एम.चव्हाण व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस. पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रविवार, १४ जानेवारी, २०२४

 मौजे सुकेणे येथे ३३ वर्षांनंतर भरला गुरुजनांसह दहावीचा वर्ग

 थोरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा : हृदयस्पर्शी कार्यक्रमात जागवल्या आठवणी

१९९०/९१ बॅचच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी उपस्थित गुरुजन व माजी विद्यार्थी


कसबे सुकेणे ता ८ - मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयातील १९९०/१९ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा व गुरुजनांचा स्नेहमेळावा ३३ वर्षानंतर संपन्न झाला.यानिमित्त भेटलेल्या वर्गमित्रांनी शाळेतील आठवणी जागवित एकमेकांची आत्मियतेने विचारपूस केली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक प्रभाकर सूर्यवंशी होते. सरस्वतीचे पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावर एम पी काळे,आर जी गाडे,पी ए डोकबाणे,ए वाय तिडके,ए के तिडके,बी के जाधव डी के दरेकर, बी व्ही जाधव,बी आर आवारे, एन पी महाले, बी ई महाले,एस पी कोठुळे,के बी हाडोळे,एस टी भोज,एस डी देवरे,आर एन वाघ, बी डी मालपुरे,डी पी बोरसे, एन ए रजपूत,एम पी आहेर, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, श्रीम यु डी सोनवणे,श्रीम एस पी शिंदे, श्रीम यु बी मालपुरे,श्रीम गवळी,श्रीम साठे,श्रीम सुमन जाधव,भारत मोगल,व्ही आर डेर्ल,एस पी मुळाणे आदीं उपस्थित होते. मुला-मुलींच्या हस्ते गुरुजनांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला यावेळी भरीव निधीचा धनादेश देण्यात आला माजी विद्यार्थी भाऊसाहेब लोखंडे, राजेंद्र काळे,भरत रहाणे, संतोष कुलथे,धनराज भंडारे, कल्पना भंडारे,अर्चना मोगल व दर्शना महाजन यांनी मेळाव्याची संकल्पना मांडली.या विद्यार्थ्यांनी एकत्र येत व्हाट्सअप सुपच्या माध्यमातून मेळावाविषयी मत मांडले मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परिचय करून दिला तर उपस्थित गुरुजनांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या उपस्थित माजी विद्यार्थ्यांना गुरुजनांच्या हस्ते स्नेह भेटीची आठवण राहावी यासाठी ट्रॉफी देण्यात आली सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व ग्रुपच्या माध्यमातून कला, क्रीडा व सामाजिक मित्र मंडळ स्थापन करून भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा संकल्प केला भाऊसाहेब लोखंडे याने प्रास्तविक केले भारत मोगल यांनी सूत्रसंचालन केले तर धनराज भंडारे यांनी आभार मानले. स्नेह मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी भाऊसाहेब लोखंडे, धनराज भंडारे,कल्पना भंडारे (पवार),प्रमोद भालेराव,योगेश्वर सोनवणे,भारत केवडे,संतोष राहणे,सुनील पवार,शंकर ठाकरे, नामदेव घारे,अण्णासाहेब दयाळ, संजय काळे,सरिता गुरगुडे (माळोदे),प्रकाश दयाळ,वैशाली दरेकर,कमल भोई,कविता गडाख,अर्चना मोगल,राजेंद्र काळे,भाऊसाहेब भंडारे,राजेंद्र मोगल,शैलेश मोगल,भरत राहणे, महेश गांधी,दिपक देशमुख,संजय गांधी,उत्तम विधाते,योगिता भालेराव,सविता मोरे,ज्ञानेश्वर चौधरी,भाऊसाहेब कातकाडे,, रविंद्र कातकाडे,वैशाली गांधी, मोनिका गांधी,मनिषा भोज, अनिल शेवकर,विलास सानप, संगीता नळे,विश्वनाथ वसईकर, रविंद्र आळंदे,उज्वला राहणे, सोमनाथ भागवत,दिपक कुमावत,अशोक बागले,दर्शना महाजन,निवृत्ती राहणे,गोरख गुरगुडे,संगीता भंडारे,सुलक्षणा जाधव,रतन शेवकर,ज्योती आव्हाड,शिवाजी शेवकर,संजय रईसवाल,श्याम भंडारे,सोमनाथ खापरे,शरद तिडके,निवृत्ती बोडके,दिपक कडाळे,दिलीप धुमाळ,राजीव गुंजाळ,राजू पिंजारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १९९०/९१ बॅचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष परीश्रम घेतले.


 मौजे सुकेणेची धनश्री पागेरेचे स्पर्यधा परीक्षेत यश 

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु धनश्री पागेरे गांधी विचार मंच परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्वर्ण पदक स्वीकारताना


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ११- गांधी विचार संस्कार परीक्षा स्पर्धेत मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु धनश्री चंद्रकांत पागेरे ही जिल्हयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली तिला प्रशस्तीपत्रक व सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले सदर स्पर्धा कर्मवीर काकासाहेब वाघ कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे पार पडल्या तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अंँड नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी बी अण्णा मोगल,चिटणीस दिलीप दळवी,तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अतुल भंडारे व मोतीराम जाधव, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक श्री भामरे आदींसह सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले तिला श्रीम वंदना गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

  

राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड नजरकैदेत



 नाशिक:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमधे येत असल्याने त्यांच्या या दौर्यात राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने कांद्याची निर्यात बंदी उठवावी,शेतकर्यांना भरीव अशी मदत करावी,भिकार्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कांद्याच्या माळा घालुन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला होता,त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटिसा बजावून जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड,दिंडोरी तालुका अध्यक्ष गोरखनाथ धाञक,सोमनाथ काळे,महेश चव्हाण व सहकार्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.शासणाच्या या हुकूमशाही ला आम्ही घाबरत नसून आमच्यावर कारवाई करण्याऐवजी कांदा निर्यात बंदी उठवील्यास आम्ही शासणाचे स्वागतच करु!यापुढे लोकशाही वाचविण्यासाठी आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देखील ॲड.सुरेश आव्हाड यांनी शासणा दिला असुन,सदरील कारवाई बाबत स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...