विद्यार्थ्यांनो शालेय जीवनापासूनच विज्ञानाची कास धरा
मविप्र उपसभापती डी बी मोगल यांचे मौजे सुकेणेत प्रतिपादन
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १७- शालेय जीवनातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच विज्ञानाची कास धरावी असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल यांनी केले ते मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड येथे शालेय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते सुरुवातीला विज्ञानाचे जनक व मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपसभापती मोगल,शालेय समितीचे अध्यक्ष मोतीराम जाधव, उच्च माध्यमिक कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे,प्राचार्य रायभान दवंगे व स्कूल कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्कूल कमिटी सदस्य डॉ बाळासाहेब मत्सागर,ॲड उत्तमराव मोगल, सरपंच आनंदराव भंडारे, योगेश मोगल, रामराव मोगल, रामकृष्ण बोंबले, माधवराव भंडारे, दिलीप मोगल, रामेश्वर काठे, संदीप खोडे,प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे,कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे आदींच्या हस्ते शालेय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपसभापती मोगल यांनी शिक्षण आणि जीवन यांची सांगड विद्यार्थ्यांनी घातली पाहिजे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. विज्ञान प्रदर्शनांतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडत असतात असे प्रतिपादन केले प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीराम जाधव,अतुल भंडारे, विज्ञान शिक्षक रावसाहेब शेलार व प्राचार्य रायभान दवंगे यांनी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा गटातील एकूण ४९ उपकरणे व ४३ विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन विज्ञान रांगोळी द्वारे व उपकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली सूत्रसंचालन श्रीम ज्योती कुशारे यांनी तर आभार श्रीम मनीषा घोटेकर यांनी मानले विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. उद्घाटन प्रसंगी सर्व स्कूल कमिटी सदस्य ग्रामस्थ सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते