Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न

 के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलमध्ये गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न



नाशिक :- दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी के.के वाघ शिक्षण संस्था व मुक्तांगण आयोजित गरु - शिष्य स्मृतीमाह स्पर्धा ४० वे निमित्त जिल्हास्तरीय गायन व सायन्स मॉडेल स्पर्धा मोठ्या आनंदात , उत्साहात व कूतुहलपुर्वक वातावरणात घेण्यात आली. के.के वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वती नगर कॅम्पस मध्ये दि. ३ ऑगस्ट २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . जिल्हास्तरीय विविध स्पर्धांपैकी ११ ऑगस्ट २०२३ च्या गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेचे संयोजन के.के. वाघ युनिव्हर्सल स्कूल डी.जी.पी नगर , नाशिक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.के वाघ परफॉर्मिंग आर्ट कॉलेजचे प्राचार्य श्री. मकरंद हिंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना श्री. अजिंक्य वाघ म्हणाले की विद्यार्थ्यांच्या लपलेल्या गुणांना वाव देणे व कल्पनाशक्तीचा विकास करणे गरजेचे आहे असे सांगितले. समूह गायन , वैयक्तिक गायन व सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी एकूण १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हे विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधून आले होते . सायन्स मॉडेल एकापेक्षा एक अधिक उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कल्पनांचे प्रत्यक्षदर्शी सादरीकरण होते. समूह गायन व वैयक्तिक गायन संपूर्ण वातावरणाला मोहून टाकणारे होते . 
सायन्स मॉडेल स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे:
ग्रामीण भागातील विद्यार्थी 
वेदांत भोर व स्वरा भोर ( लहान गट ) 
वेदांत करडे व दर्शन घोलप ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
शहरी भागातून निशांत दिवे ( लहान गट) , रोहित पाटील व कार्तिक पांडे ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
के.के वाघ युनिव्हर्सल स्कूल , डी.जी.पी नगर येथील आर्यन नखाटे , ओम कर्डिले व दक्ष मोतारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 
गायन स्पर्धेत ( सामूहिक) 
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, रानवड ( लहान गट ) , राईज एक्सप्रिरियल स्कूल, पिंपळगाव ( मोठा गट ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
वैयक्तिक गायन स्पर्धेत
आदित्य बस्ते ( लहान गट) 
कृष्णा चौधरी ( मोठा गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विश्वस्त श्रीमती. शकुंतला वाघ व विभागीय सचिव श्री. मच्छिंद्र कदम यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी के.के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. अजिंक्य वाघ , सौ. अवंतिका वाघ सरस्वती कॅम्पसचे समन्वय डॉ. व्हि.एम. सेवलीकर के.के वाघ शाळा व महाविद्यालयाचे समन्वय डॉ. बी.व्ही कर्डिले, शालेय समितीचे अध्यक्ष शि.क नाठे, डॉ. अनिल माळी , प्राचार्य मकरंद हिंगणे, ए.के दिक्षित, सुप्रसिद्ध सतारवादक उध्दव अष्टुरकर , प्राचार्या सौ.अश्विनी पवार , प्राचार्या सौ.निशा एंडाईत, प्राचार्या सौ. अमृत राव व के.के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्या सौ. चित्रा नरवडे . जिल्ह्यातून आलेले १०४ विद्यार्थी स्पर्धक , शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. उमेश सुर्यवंशी, सौ. प्राजक्ता अत्रे व सौ. स्वप्नाली शिंपी यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.




गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

९ ऑगस्ट रोजी आयटक सलग्न कामगार कर्मचारी संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण विरोधात रस्त्यावर!!

क्रांतीदिनानिमित्त आयटक सलग्न कामगार कर्मचारी संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण विरोधात रस्त्यावर ! 

 

मोर्चेकरांना संबोधित करतांना कॉ. राजू देसले 

नाशिक: केंद्र राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. देशभरात 9 ऑगस्ट रोजी आयटक सह केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. कामगार, कर्मचारी विरोधी चार श्रम सहिता रद्द करा, योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, कंत्राटी नर्सेस, अंगणवाडी सेविका , ग्राम रोजगार सेवक, यांना किमान वेतन लागू करा. गट प्रवर्तक ना शासकीय कर्मचारी दर्जा देईपर्यंत त्वरित वेतन सुसूत्रीकरण मध्ये समावेश करावा. ग्राम रोजगारसेवक अतिरीक्त नेमणूक पत्र रद्द करा. दीपावली बोनस द्या, ग्राम पंचायत कर्मचारी ना पेन्शन लागू करा जीप कर्मचारी दर्जा द्या, अंशकालीन स्री परिचर ना जीप सेवेत सामावून घ्या, शालेय पोषण आहार योजना कर्मचारी ना किमान वेतन लागू करा, घर कामगार मोलकरीण ना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम कामगार ना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमा, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी ना जिल्हा परिषद ने सातवा वेतन लागू करा. जीप सेवेत कायम करा. विज बिल कायदा 2023 रद्द करा. ई पी एस 95 पेंशनर्स ला त्वरित 9हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करा. कामगार कर्मचारी विरोधी धोरण रद्द करा आदि मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. वी .डी धनवटे होते. राज्य सचिव आयटक कॉ. राजू देसले यांनी नेतृव केले 9ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात आंदोलन यशस्वी केले. मोठ्या संख्येने सहभाग होता . 9ऑगस्ट रोजी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथून जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला होता . बैठकीस आयटक नेते सखाराम दुर्गुडे,नामदेव बोराडे, चित्रा जगताप, हसीना शेख, माया घोलप,भीमा पाटील, राजेन्द्र जाधव, एस खतीब, छाया वराडे, रामचंद्र टिळे , निवृत्ती कसबे, राजेन्द्र जाधव,राजेंद्र जगताप, मीनाक्षी मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 


मोर्चाचं आयटक संलग्न संघटना व भाकप, किसान सभा,आशा, गट प्रवर्तक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, विज वर्कर्स फेडरेशन, मोलकरणी , बांधकाम कामगार , ईपी एस 95 पेंशनर्स, कंत्राटी नर्सेस , ग्रिवज कामगार आदि चा सहभाग

संपादकीय : पर्यावरण संवर्धन

 संपादकीय 

पर्यावरण संवर्धन 



ध्याचे युग हे तंत्रज्ञानी आहे. मागील दोन वर्षात आपल्याला पर्यावरण, निसर्ग हे काय आहे आणि ते का जपावे हे कळालेच असेल . मागील वर्षी २०२० मध्ये कोरोना सारख्या मोठ्या महामारीचे संकट अख्ख्या जगात पसरले होते ह्यात रुग्णांना गरज भासत होती ती प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची मात्र आपल्याच दोषांमुळे, चुकांमुळे आपलाच अंत झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही ‌ हे का झाले ? हे कदाचित लोकांना माहिती नसावे. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी घेऊ शकतो ह्यामुळे हे झाले असावे. वृक्षतोड हे ह्याचे मुख्य कारण आहे. लहानपणापासून ऐकता - वाचता की वनस्पती सजीव आहेत. सुर्याच्या प्रकाशामार्फत ते श्वास घेतात. मग सजीवाने सजीवाचीच हत्या का करावी ? झाडांपासून आपल्याला प्राणवायू मिळतो परंतु आपण अनेक कारणांसाठी वृक्षतोड करतो परंतु वृक्ष लागवड करत नाही. या कारणांमुळे कोरोना स्थितीत अनेक रूग्णांना प्राणवायूचा तुटवड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही तुमच्या घराच्या फर्निचरसाठी पक्ष्यांचे घरे उद्ध्वस्त करून वृक्षतोड करून आपले घरे बांधतात. तुम्हाला राहायचा हक्क आहे त्याचप्रमाणे त्यांचाही ह्या जमिनीवर , आकाशावर , निसर्गावर राहण्याचा विसावण्याचा हक्क आहे. झाडे नसल्याने अनेक मोठ्या - मोठ्या शहरांतून पक्षी नाहीसे झाले आहेत. निसर्गाचे संतुलन बिघडले असल्याने सृष्टीचा कारभारही बिघडला आहे असे अनेकदा अनुभवते. पृथ्वीच्या अंतरंगात , भूगर्भात उष्णता वाढल्याने हिवाळ्यात, पावसाळ्यातही अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा पडतात. ह्यामुळे पावसाळ्यात सुध्दा अनेकदा पाऊस गैरहजर असतो यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई, दुष्काळ यांसारख्या समस्या नागरिकांना भेडसावत असतात. भूभागात उष्णता वाढण्याचे कारण रस्ताही असावा. रस्ता बनवतान काँक्रीट , डांबर यांचे मिश्रण योग्य पद्धतीने नसते. यामुळे रस्ते अधिक उंच किंवा जाड बनतात व रस्त्यावर अनेकदा अनेकवेळा डांबर टाकले जाते ह्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. ह्यामुळे भूभाग थंड होत नाही. ह्याचे हे कारण असू शकते. 

   भारत जरी तंत्रज्ञान आणि प्रगती साध्य केलेला देश असला तरीही पर्यावरण संतुलित राखण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वर्षातून फक्त ५ जून रोजी सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वृक्षारोपण करतात परंतु नंतर रोपाकडे कोणीही लक्ष देत नाही. काही पर्यावरण, निसर्ग प्रेमी अनेकदा वृक्षारोपण करतात व निसर्गाने दिलेल्या असंख्य गोष्टींचा मोबदला देतात‌ परंतु प्राणवायू, निसर्गाचे सान्निध्य इ. ह्या सर्व गोष्टींची गरज आपल्या सर्वांना आहे. लोक जसे गरज नसलेल्या कार्यक्रम, वाढदिवस शुभारंभ इ. साठी हजेरी लावतात सहभाग घेतात त्याचप्रमाणे सहभाग घेणारे व आयोजित करणाऱ्यांनी सुध्दा वृक्षारोपणाच्या , स्वच्छता अभियानाच्या इ. कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी व्हायला हवे. सर्वात पहिले हवा प्रदुषणामुळे निसर्गात व माणसांमध्ये विविध आजार पसरले आहे. वाहनांच्या निघणाऱ्या धुरामुळे निसर्गाच्या स्वच्छ हवेत दुषित हवा प्रस्थापित होते . यामुळे आपल्याला दुषित हवा मिळते व अनेक आजार शरीरात पसरतात. वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण होते. सरकारने इंधन जाळणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी आणायला हवी. वाहनांमुळे शहरात वाहनांची कोंडी होते. नागरिकांनी इंधन जाळणाऱ्या वाहने सोडून सायकल वापरणे सरु केले पाहिजे. सायकल वापरल्याने माणसांचे स्वास्थही सुदृढ राहील तसेच होणारे प्रदुषणही थांबेल . भारतातील युवा पिढीने वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. आणि तो त्यांनी घ्यावाच.

लेखक :- प्रसाद भालेकर 

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

९ ऑगस्ट रोजी सलग्न कामगार कर्मचारी संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण विरोधात रस्त्यावर !

 ९ ऑगस्ट रोजी सलग्न कामगार कर्मचारी

 संघटना केंद्र व राज्य सरकार धोरण 

विरोधात रस्त्यावर ! 

नाशिक ( दि. ७ ) : केन्द्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. देशभरात 9 ऑगस्ट रोजी आयटक सह केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. कामगार, कर्मचारी विरोधी चार श्रम सहिता रद्द करा, योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, कंत्राटी नर्सेस, अंगणवाडी सेविका , ग्राम रोजगार सेवक, यांना किमान वेतन लागू करा. गट प्रवर्तक ना शासकीय कर्मचारी दर्जा देईपर्यंत त्वरित वेतन सुसूत्रीकरण मध्ये समावेश करावा. ग्राम रोजगारसेवक अतिरीक्त नेमणूक पत्र रद्द करा. दीपावली बोनस द्या, ग्राम पंचायत कर्मचारी ना पेन्शन लागू करा जीप कर्मचारी दर्जा द्या, अंशकालीन स्री परिचर ना जीप सेवेत सामावून घ्या, शालेय पोषण आहार योजना कर्मचारी ना किमान वेतन लागू करा, घर कामगार मोलकरीण ना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम कामगार ना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमा, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी ना जिल्हा परिषद ने सातवा वेतन लागू करा. जीप सेवेत कायम करा. विज बिल कायदा 2023 रद्द करा. ई पी एस 95 पेंशनर्स ला त्वरित 9 हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करा. कामगार कर्मचारी विरोधी धोरण रद्द करा आदि मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक आयटक कामगार केंद्र नाशिक येथे झाली. अध्यक्षस्थानी कॉ. वी .डी धनवटे होते. राज्य सचिव आयटक कॉ. राजू देसले यांनी मार्गदर्शन केले. व 9ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात आंदोलन यशस्वी करावे. मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. 9 ऑगास्ट रोजी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथून दू. 1वा .जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढण्यात येणार आहे. बैठकीस आयटक नेते सखाराम दुर्गुडे,नामदेव बोराडे, चित्रा जगताप, हसीना शेख, माया घोलप,भीमा पाटील, राजेन्द्र जाधव, एस खतीब, छाया वराडे, रामचंद्र टिळे , निवृत्ती कसबे, राजेन्द्र जाधव,राजेंद्र जगताप, मीनाक्षी मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

अण्णा भाऊ साठे हे कम्यनिष्ट चळवळीचं विद्यापिठ होत. कॉ राजू देसले

 अण्णाभाऊ साठे जयंती विशेष 

१ / ०८ / २०२३ 

अण्णा भाऊ साठे हे कम्यनिष्ट 

चळवळीचं विद्यापिठ होत - कॉ . 

राजू देसले

महादेव खुडेंचे अण्णाभाऊ ; अलक्षित पैलूंचे आकलन पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात



(नाशिक ता.१ ) प्रगतिशील लेखक संघ नाशिक व इप्टा नाशिकच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चळवळीतील कार्यकर्ते लेखक महादेव खुडे लिखित 'अण्णाभाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन' पुस्तकाचा प्रकाशन सुप्रसिद्ध कवीइतिहास तज्ञ नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त समाधान महाजन यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगतिशील लेखक संघ राज्य सचिव तथा 'पुरोगामी ' कादंबरीचे लेखक राकेश वानखेडे हे भुषवणार आहेत. प्रगतिशील लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, असे अनेक सर्जनशील घटकांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी अ लोकवाड:मय प्रकाशन गृह कॉ. राजू देसले उपास्थित राहणार आहे.अरुण घोडेराव प्रगतिशिल लेखक संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे उपस्थित राहणार आहेत.सदर प्रकाशन सोहळात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद पवार व इप्टा नाशिक चे तल्हा शेख यांनी केले आहे. लेखक महादेव खुडे : अण्णा भाऊ साठेच्या साहित्याची चिकित्सा करणे आवश्यक वाटले. सध्याचा काळ जात अस्मिता अधिक तिव्र होण्याचा आहे.धर्म जातीचा विचार मांडत सत्ताधारी जात अस्मिता तिव्र करण्यास खतपाणी घालतात.
अण्णाभाऊ आजीवन कॉम्रेड होते. त्यांच्या विचारांना तिलांजली देण्यासाठी सध्याच्या राजकारण्यांना रस.
 प्रमुख पाहूणे समाधान महाजन यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले:- इतिहास हा माझा आवडता विषय आहे. कॉ महादेव खुडे यांचं पुस्तक
बरं झालं इंग्रज आलं व पेशवाई गेली. पुरोगामी महाराष्ट ही केवळ बिरुदावली न मिरवता आपल्या वर्तन व्यवहारात पुरोगामीत्व दिसावं.
महापुरुषांच्या विचारांची चिकित्सा करतांना तत्कालिन समाज वास्तवाचं आकलन झाल्याशिवाय संबंधीत महापुरुष आपणांस कळू शकत नाही.
ब्रिटीश भारतात आल्यामुळे ग्राम व्यवस्थेतील व्यवहारांत बदल झाल्याचे दिसून येते. त्यातून समाज व जात वास्तव समजून घेत इथला उपेक्षित नायक बोलता झाला.
आर्थशास्त्राकडे बघण्याची नवी दृष्टी कार्ल मार्क्स ने दिली.
दलित साहित्य हे वैश्विक असण्या मागे त्यांचं लेखन वैयक्तिक जीवनावर आधारित आहे.


परिवर्तनवादी विचारांच्या महापुरुषांचा इतिहासात समावेश सन २०१२ पर्यंत नसणे हे खेदजनक आहे.
कम्यूनिष्ट पक्ष इथली जात व्यवस्था समजून घेण्यात कमी पडला असा उल्लेख महादेव खुडेच्या पुस्तकात येते हे धाडसी वाक्य आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले:- 
रस्त्यावरील चळवळ करत प्रचंड व्यासंग जोपासत महादेव खुडे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्यातील अलक्षित पैलू या पुस्तकात अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
महापुरुषांच्या विचारांची चिकित्सा करतांना ती प्रामाणिक पणे करावी. टिकाकारांमुळे महापुरुष सर्वदूर पोहचतात.
खूडेंचं पुस्तक एक प्रकारची आत्मटिका आहे. त्यातून अधिक सकस साहित्य निर्मिती होतं.
कांदबरी हा साहित्य प्रकार लोकशाही प्रणाली बरोबर चालणारा आहे. लोकशाहीच्या हातातलं शस्त्र हे कादंबरी आहे. हा प्रकार अण्णा भाऊंनी समर्थपणे पेलला.
आलेल्या सर्व पाहुण्यांचे , मान्यवरांचे आभार विराज देवांग यांनी मानले. 

शनिवार, २९ जुलै, २०२३

धक्कादायक ! आशा सेविकेवर लोखंडी रॉडने डोक्यावर वार

 धक्कादायक ! आशा सेविकेवर

 लोखंडी रॉडने डोक्यावर वार



पिंपरी ( दि. २९ ) :- रेखा उर्फ संजिवणी धनवटे ( रा. पांगरी ) ह्या महिला आशा सेविका असून यांना निरोधची मागणी करून, लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले असून डोक्यात बरेच टाके पडले आहे व डावा व उजवा हे दोन्ही हात निकामी झाले आहे. व त्या आशा सेविका रक्तबंबाळ अवस्थेत परभणी सरकारी दवाखान्यात असताना आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरूड यांनी भेट देऊन त्यांच्या आरोग्याचा आढावा घेऊन काळजी घेण्यासाठी सांगितले. तरी हा गुन्हा करणारा गुन्हेगार बाळू शामराव बुधवंत या गुन्हेगारास ३५३ गुन्ह्याखाली अटक करून शिक्षा देण्यात यावी व त्या महिलेस न्याय देऊन भरपाई द्यावी अन्यथा आशा वर्कर गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन व बेदमुदत उपोशन करण्याचे आवाहन आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरड , समता कदम , वंदन हाके , सिरीकांत सुपरनिस, आशा जावडे , जयश्री पंचांगे , वर्षा बांदल , सारिका घाटोळ आदींनी जिंतूर पोलिस निरीक्षकांना अर्ज देतांना केले आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत. आशा कर्मचारी अल्प मानधन वर काम करीत आहे. महाराष्ट्र शासन च नवे जगाने कोरोना काळात काळात आशानी केलेला कामाचा गौरव केला आहे त्यामूळे त्वरीत पोलीसांनी कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन महाराष्ट्र राज्यातील आशा गट प्रवर्तक सर्व जिल्हाभर राज्यात आंदोलन करतील. असा इशारा राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक कॉ. राजू देसले यांनी दिला.

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

महादेव खुडे लिखित अण्णाभाऊ ; अलक्षित पैलूंचे आकलण' पुस्तकाचे प्रकाशन

 महादेव खुडे लिखित अण्णाभाऊ ; 

अलक्षित पैलूंचे आकलण' 

पुस्तकाचे प्रकाशन



नाशिक ता.२८ ) प्रगतिशील लेखक संघ नाशिक व इप्टा नाशिकच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त  चळवळीतील कार्यकर्ते लेखक महादेव खुडे लिखित  'अण्णाभाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन' पुस्तकाचा प्रकाशन सुप्रसिद्ध कवीइतिहास तज्ञ नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त समाधान महाजन यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे होत असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगतिशील लेखक संघ राज्य सचिव तथा 'पुरोगामी ' कादंबरीचे लेखक राकेश वानखेडे हे भुषवणार आहेत. प्रगतिशील लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, असे अनेक सर्जनशील घटकांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी अ लोकवाड:मय प्रकाशन गृह कॉ. राजू देसले उपास्थित राहणार आहे.अरुण घोडेराव प्रगतिशिल लेखक संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे उपस्थित राहणार आहेत.सदर प्रकाशन सोहळात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद पवार व इप्टा नाशिक चे तल्हा शेख यांनी केले आहे. मंगळवार दि. १‌ ऑगस्ट रोजी सायं ५ :०० वा. पत्ता :- हुतात्मा स्मारक, बिटको शाळेजवळ , जूना सीबीएस,  नाशिक . 

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...