Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, १८ जुलै, २०२३

मोठी बातमी :- नाशिक शहरात बांधलेली जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे सदोष !

 मोठी बातमी :- नाशिक शहरात

 बांधलेली जवाहरलाल नेहरू 

घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे

 सदोष ! ; आंदोलनाचा इशारा


नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरूत्थान अभियांनांतर्गत वडाळागावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांवर रहिवाशांनी दि‌. १७ जुलै रोजी महापालिकेस निवेदन सादर केले. महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित नसल्याने तसेच इन्चार्ज श्री. चौधरी हे सुध्दा दौऱ्यावर असल्याने शिष्टमंडळाला दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण विभाग उपायुक्त श्रीमती. करूणा डहाळे यांना भेटून सदर प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न विभागाशी संबंधित नसला तरीही संबंधित विभागाला तशा प्रकारच्या सूचना देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सदरच्या तसेच निवेदकांनी सदर प्रकरणी येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप लिंगायत, अॅड. कृष्णा शिलावट, अॅड. नीलकमल सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते किरण नीतनवरे तसेच महिला रहिवासी उपस्थित होते.

नाशिक महापालिकेला दिलेल्या निवेदनात काय म्हटले ? 


प्रति 
माननीय आयुक्त
नाशिक महानगरपालिका नाशिक.
राजीव गांधी भवन, शरणपूर रोड.
नाशिक.
विषय: नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत वडाळा गावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांबाबत अर्ज तथा निवेदन.
अर्जदार तथा निवेदक: सावित्रीबाई फुले नगर वडाळा गाव. घरकुल योजना.
महोदय, 

आम्ही खाली सह्या करणारे रहिवाशी विनंतीपूर्वक अर्ज करतो तो येणेप्रमाणे;
1) नाशिक महानगरपालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत वडाळा गाव येथील सावित्रीबाई फुले नगरातील झोपडी वासियांसाठी घरकुल योजना सन 2016 मध्ये रहिवाशांना सदनिका देऊन राबविण्यात आली.
2) सदर योजनेअंतर्गत एकूण नऊ इमारतींमध्ये एकूण 720 सदनिकांमध्ये रहिवासी राहतात. सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे इमारती व सदनिका यांना तडे पडले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात सदनिकांमध्ये लिकेज झालेली आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो.
3) येथील सदनिका व इमारतीला पडलेले तळे व निकृष्ट बांधकाम त्याचप्रमाणे विविध समस्यांबाबत येथील रहिवाशांनी सन 2019 मध्ये रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याबाबत मनपाला निवेदन देण्यात आलं होतं. परंतु त्याबाबत कोणतीही दखल मनपाने घेतलेली नाही.
4) आज रोजी येथील समस्यां मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येथील सदनिकांमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच सांडपाण्याची सदोष व्यवस्था असल्यामुळे वारंवार चोकअप होते. व सर्व वसाहतीमध्ये दुर्गंधी व आरोग्यास धोका निर्माण होईल अशी अस्वच्छता निर्माण झालेली आहे.
5) येथील भुयारी गटारीची व्यवस्था कोलमडली असून रहिवाशांना येथील . रहिवाशांना येथील भुयारी गटारीची देखभाल व्यवस्था करणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरगेली आहे. कारण येथील रहिवाशी हे कामगार कष्टकरी हातावर पोट भरणारेअसल्याने आर्थिक खर्च करू शकत नाही. सदरच्या ड्रेनेज चोकअपमुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
6) येथील रहिवाशांनी येथे स्वच्छता अभियान मनपाने राबवावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु मनपाने त्याची दखल घेतली नाही. याउलट इंदिरानगर विभागातील उच्चभ्रूंच्या सोसायट्यांमध्ये मनपा ने स्वतःहून अनेक वेळा स्वच्छता अभियान राबविले होते व राबवित आहे. तसेच शहरातील अनेक घरकुल योजनेमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाते. परंतु सावित्रीबाई फुले घरकुल योजनेमध्ये मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तसेच इथे आजाराचे प्रमाण ही वाढलेले आहे.
सबब विनंती की,
अ. सावित्रीबाई फुले घरकुल योजनेतील इमारती व सदनिकांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात यावी.
आ. येथील भुयारी गटारीची स्वच्छता व चोकप दुरुस्त करण्यात यावे.
इ. येथील घरकुल वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मनपातर्फे राबविण्यात यावे.
वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा रहिवाशांतर्फे येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
हे निवेदन तथा अर्ज.

रविवार, १६ जुलै, २०२३

छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ

 छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ



नाशिक: छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नाशिक शाखा वतीने 30 वर्धापदिनानिमित्त व संस्थापक अध्यक्ष कॉ. माधवराव गायकवाड यांच्या ९९ जयंतनिमित्त दि. १६ जुलै २०२३रोजी सकाळीं १० वा. संस्था सभासद, ठेवीदार गुणवंत पाल्यांना सत्कार संस्थेच्या मेघदूत शॉपिंग सेंटर नाशिक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुनील ढिकले व कार्याध्यक्ष पदी मा. नारायण शेठ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सभासद सुवर्णा देसले यांना पी एच डी प्राप्त पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी प्रमूख म्हणून मार्गदर्शन करताना डॉ ढिकले यांनी छत्रपती नाशिक जिल्हा पतसंस्था 30वर्षा पासून नाशिक जिल्हा मध्ये सर्वसामान्य सभासदांना पुरवठा करून विकासाला चालना देत आहे. या बद्दल अभिनंदन केले. ८ शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्या सैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या कार्याला सलाम केला. संस्थेच्या हा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ नक्कीच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पत संस्था फेडरेशन नवं निर्वाचित जिल्हा अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी केले. नारायण वाजे यांनी सहकार चळवळीतील सभासद चे महत्व सांगितले. छत्रपती पतसंस्था चांगले काम करतं आहे. या बद्दल कौतुक केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अॅड.साधना गायकवाड होत्या. त्यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे सहकार शेत्रातील कार्याची माहिती दिली. पुढील वर्ष कॉ.माधवराव गायकवाड यांचे 100वा. जयंती आहे. या निमित्ताने शेतकरी, कामगार, सहकार विषयावर मंधन आयोजित करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आनंद वेक्त केला.मंचावर व्हा.चेअरमन अॅड. शिवाजी जाधव, संचालक अॅड. दत्ता निकम, कॉ. राजू देसले, धर्मेंद्र जाधव, भागवत पाटील, श्याम गरुड, ओझर वेवस्थपक अण्णा गुर्गुडे, चारुदत्त पवार प्रा.सोमनाथ मुठाळ, अॅड. रिकब जैन संस्थेचे सभासद, अल्प बचत खातेदार, ठेवीदार उपास्थित होतें 
 सूत्र संचलन संचालक राजू देसले यांनी केले प्रास्ताविक चारुदत्त पवार यांनी केले. आभार शशिकिरन साखला यांनी केले. स्वागत भालचंद्र देसले, किरण मालुंजकर, राकेश वालझडे, रामदास बेंडकोली , रोहित कर्पे,
श्रीमाल यांनी केले. 
 आपले
 ॲड दत्ता निकम कॉ राजू देसले संचालक
चारुदत्त पवार वेवस्थापक
अल्प बचत प्रतिनिधि कर्मचारी कर्मचारी वर्ग

गुरुवार, १३ जुलै, २०२३

महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा

महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा 

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२३ आहे. यासाठी लाखोपर्यंतची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
!! *मर्यादित प्रवेश*!! *मर्यादित प्रवेश*!!
*📖महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परिक्षा.📖*
*🎖️प्रथम पारितोषिक🎖(1,00,000 रुपये.)*
*🥈द्वितीय पारितोषिक🥈(50,000 रुपये.)*
*🥉तृतीय पारितोषिक तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी (10,000 रुपये) देण्यात येणार आहे.*
*तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.*
*या स्पर्धा परीक्षेत 7वी, 8वी, 9वी, व ,10वी. च्या विध्यार्थांना सहभागी होता येईल.*
👉 *नोंदणी करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2023*
 स्पर्धेवर उभा राहिलेले युग लक्षात घेऊनच आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत *✒" महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा”✒*📚📖 
*ती विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, शहाणपण, वाढवेल.*
👉 *नोंदणी करण्यासाठी*-
*संकेतस्थळ:* www.ecisindia.com
*Email:* info@ecisindia.com
*Help Desk number-*  9172764707 / 8208027943.       या उपक्रमास आपण खालील प्रमाणे सहकार्य व मदत करू शकता          

  १) आपण महात्मा जोतीराव फुले यांचा विचार जागर परीक्षेची माहिती विविध ग्रुपवर अधिक अधिक विद्यार्थी यांचे पर्यंत पोहचवू शकता    २) आर्थिक अडचणी अभावी काही विद्यार्थि परीक्षेस बसू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रायोजत्व स्वीकारून ह्या उपक्रमास सहकार्य करू शकता.                               ३) महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी किमान १ विद्यार्थी साठी मदत करू शकता.                                        ४) स्पर्धा कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा असल्याने जिल्ह्यातील आपल्या परिचित किमान ५ शाळांना या उपक्रमा बाबत अवगत करावे 🙏🏻
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७५०/- रूपयांची नोंदणी प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. 

सुरज मांढरेंच्या नावाचे फेक इंस्टा अकाउंट !

 सुरज मांढरेंच्या नावाने फेक इंस्टा अकाउंट ? 

महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त मा.श्री. सुरज मांढरे 




महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांच्या नावाने एका अज्ञाताने  इंस्टाग्रामवर फेक  अकाउंट बनवले आहे.  ह्या प्रोफाईलवर ११६ फॉलोवर आहे. हे अकाउंट पूर्णपणे बनावट असल्याचे समजते . ह्या अकाउंट वरून अनेक जणांना संदेश गेले असतील अज्ञाताचा ह्यामागे काय उद्देश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मिडियावरचा वाढता कल लोकांच्या खासगी जीवनावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. सर्व नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत एवढी निष्काळजीपणा करतात का ? कोणत्याही सरकारी अधिकारी ह्यांचे बनावट सोशल मिडियावर अकाउंट बनवणे हा फार मोठा गुन्हा आहे . 




मंगळवार, ११ जुलै, २०२३

१३ वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचे सुयश.

 १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिपमध्ये नाशिकचे सुयश.



नाशिक:- नुकतीच नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दि‌. ८ व ९ जुलै २०२३ या कालावधीत १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या स्पर्धकांनी अनेक पदके जिंकली. ह्यात नाशिकचा महेश देवकर , विष्णू देवकर व ओम मोरे यांनी रेगु ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले व १७ ते ४५ ह्या वयोगटात फाईट ह्या खेळाच्याप्रकारात कु. सलोनी बिडवे व दिवेश मुथा यांनी कांस्यपदक मिळविले व हर्षवर्धन जोशी ह्याने तुंगल ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले. ह्या स्पर्धेत सर्व विजेत्यांचे नाशिकचे मा. खासदार हेमंत ( आप्पा ) गोडसे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री. नागेश बनसोडे व मुख्य प्रशिक्षक श्री. किशोर येवले ( मुंबई ) ह्यांचे मार्गदर्शन लाभले.



शाळा , महाविद्यालय आणि सर्व स्तरांतून सहभागी व विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदरच्या विद्यार्थ्यांचे १२ ते १५ २०२३ रोजी अखिल भारतीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ही स्व. मीना ताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी , आडगाव नाका, पंचवटी नाशिक - ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शाळा , महाविद्यालय यांनी सदरच्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

21 जिल्ह्याचे 215 खेळाडू तसेच महाराष्ट्र पोलीस टीम उपस्तिथ होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू विभागीय क्रीडा संकुल ,नाशिक येथे 12 ते 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या वरिष्ठ गटातील नॅशनल पिंच्याक सिल्या ट चॅम्पियनशिप ला खेळतील. व यातून फक्त टॉप 16 नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या 37 नॅशनल ला खेळतील. हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे. या खेळाला 5% आरक्षण आहे . या खेळाला युवक कल्याण आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशिया ची मान्यता आहे.हा खेळ एशियन गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्व् विद्यालय अश्या ऑफिशियल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. नुकताच 37 नॅशनल मध्ये याचा समावेश झाला आहे.

सोन्याच्या दुकानात अज्ञाताकडून लाखोंची चोरी !

(छाया संग्रहित) 

अज्ञाताकडून सोन्याच्या दुकानात लाखोंची चोरी

नाशिक:- जेल रोड येथील शिवाजीनगर परिसरातील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात अज्ञाताकडून सोन्याचे दुकान फोडून सुमारे सव्वा आठ लाख रूपयांचे सोन्या - चांदीचे दागिने चोरले आहेत. 
या घटनेमुळे परिसरातील व इतर व्यावसायिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर विलास भावसार असे दुकानाच्या मालकाचे नाव आहे. दरवेळीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले यानंतर सकाळी त्यांच्या दुकानातील कामगार दर्शन दंडगव्हाळ ह्याला दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याने त्यांने त्वरित हि घटना भावसारांकडे सांगितली . दुकान उघडून पाहिले व तपासणीनंतर सव्वा आठ लाख रूपयांचे दागिणे गायब असल्याचे सांगितले . नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास सुरु आहे 

सोमवार, १० जुलै, २०२३

सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान


डॉ . सौ. सुवर्णा प्रकाश ( राजु ) देसले 

   सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान 


नाशिक 
:- भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र चे राज्य सहसचिव , आयटक चे सचिव व किसान सभा उपाध्यक्ष श्री. प्रकाश ( राजु ) देसले यांच्या पत्नी सौ. सुवर्णा प्रकाश देसले यांना दि. १० रोजी सावित्रीबाई फुले विद्ग्रंयापीठातून ग्रंथालय शास्त्र अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी , सुविधा आणि समस्या ह्या विषयात यांनी पीएचडी प्राप्त केली. महिलांनी आजच्या ह्या जगात आपली एक नवीन ओळख केली आहे .आज सुवर्णा प्रकाश देसले .. डॉ सुवर्णा प्रकाश देसले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तून ग्रंथालय शास्त्र अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी, सुविधा आणि समस्या या विषयात आज पी एच डी प्राप्त केली. 
 सुवर्णा दसलेंनी मराठीत एम. ए., डी. सी. एम., एम.लिब. पुणे विद्यापीठ मधून केले. के. टी. एच. एम व एच पी टी महाविद्यालयातून शिक्षण घेतले. आज पी एच डी सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ साहित्यिक मा. उत्तम कांबळे, लोकवाडमय प्रकाशन गृह अध्यक्ष डॉ भालचंद्र कांगो तसेच के के वाघ शिक्षण संस्था चे प्राचार्य डॉ भूषण कर्डिले, मा. सरोज जगताप, डॉ. विना ठाकरे, सार्वजानिक वाचनालय नाशिक, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक सहकार्य लाभले.

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...