Join The WhatsApp group
गुरुवार, १३ जुलै, २०२३
महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा
नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२३ आहे. यासाठी लाखोपर्यंतची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
१) आपण महात्मा जोतीराव फुले यांचा विचार जागर परीक्षेची माहिती विविध ग्रुपवर अधिक अधिक विद्यार्थी यांचे पर्यंत पोहचवू शकता २) आर्थिक अडचणी अभावी काही विद्यार्थि परीक्षेस बसू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रायोजत्व स्वीकारून ह्या उपक्रमास सहकार्य करू शकता. ३) महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी किमान १ विद्यार्थी साठी मदत करू शकता. ४) स्पर्धा कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा असल्याने जिल्ह्यातील आपल्या परिचित किमान ५ शाळांना या उपक्रमा बाबत अवगत करावे 🙏🏻
सुरज मांढरेंच्या नावाचे फेक इंस्टा अकाउंट !
सुरज मांढरेंच्या नावाने फेक इंस्टा अकाउंट ?
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांच्या नावाने एका अज्ञाताने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले आहे. ह्या प्रोफाईलवर ११६ फॉलोवर आहे. हे अकाउंट पूर्णपणे बनावट असल्याचे समजते . ह्या अकाउंट वरून अनेक जणांना संदेश गेले असतील अज्ञाताचा ह्यामागे काय उद्देश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मिडियावरचा वाढता कल लोकांच्या खासगी जीवनावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. सर्व नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत एवढी निष्काळजीपणा करतात का ? कोणत्याही सरकारी अधिकारी ह्यांचे बनावट सोशल मिडियावर अकाउंट बनवणे हा फार मोठा गुन्हा आहे .
मंगळवार, ११ जुलै, २०२३
१३ वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचे सुयश.
१३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिपमध्ये नाशिकचे सुयश.
नाशिक:- नुकतीच नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दि. ८ व ९ जुलै २०२३ या कालावधीत १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या स्पर्धकांनी अनेक पदके जिंकली. ह्यात नाशिकचा महेश देवकर , विष्णू देवकर व ओम मोरे यांनी रेगु ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले व १७ ते ४५ ह्या वयोगटात फाईट ह्या खेळाच्याप्रकारात कु. सलोनी बिडवे व दिवेश मुथा यांनी कांस्यपदक मिळविले व हर्षवर्धन जोशी ह्याने तुंगल ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले. ह्या स्पर्धेत सर्व विजेत्यांचे नाशिकचे मा. खासदार हेमंत ( आप्पा ) गोडसे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री. नागेश बनसोडे व मुख्य प्रशिक्षक श्री. किशोर येवले ( मुंबई ) ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा , महाविद्यालय आणि सर्व स्तरांतून सहभागी व विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदरच्या विद्यार्थ्यांचे १२ ते १५ २०२३ रोजी अखिल भारतीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ही स्व. मीना ताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी , आडगाव नाका, पंचवटी नाशिक - ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शाळा , महाविद्यालय यांनी सदरच्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
21 जिल्ह्याचे 215 खेळाडू तसेच महाराष्ट्र पोलीस टीम उपस्तिथ होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू विभागीय क्रीडा संकुल ,नाशिक येथे 12 ते 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या वरिष्ठ गटातील नॅशनल पिंच्याक सिल्या ट चॅम्पियनशिप ला खेळतील. व यातून फक्त टॉप 16 नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या 37 नॅशनल ला खेळतील. हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे. या खेळाला 5% आरक्षण आहे . या खेळाला युवक कल्याण आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशिया ची मान्यता आहे.हा खेळ एशियन गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्व् विद्यालय अश्या ऑफिशियल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. नुकताच 37 नॅशनल मध्ये याचा समावेश झाला आहे.
सोन्याच्या दुकानात अज्ञाताकडून लाखोंची चोरी !
| (छाया संग्रहित) |
अज्ञाताकडून सोन्याच्या दुकानात लाखोंची चोरी
सोमवार, १० जुलै, २०२३
सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान
सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान
गुरुवार, ८ जून, २०२३
मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का?
मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का?
- प्रसाद भालेकर, संपादक
___________________________________________________
समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिले जाते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून मुलांना शालेय पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शासनाने शाळेतून गळतीचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करतात परंतु नववी पासूनच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शाळेतून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण हे नववी नंतर मोठ्या प्रमाणात खालावले जाते . दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून जर मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली तर शासनास लाखो करोडो रूपयांचे नुकसान होणार नाही .
एकीकडे प्रशासनान बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबविण्यात अव्वल असते परंतु ६ मार्च १९८६ रोजी मुलींना शासकीय शाळांमध्ये तसेच अनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट करण्यात आले असले तरी शाळांमध्ये मुलींकडून शालेय शुल्क आकारले जातात असे का ?
शिक्षण हा माणसाचा पाया आहे हे प्रशासनास माहित नसावे का ? RTE अंतर्गत ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. ६ वे वर्ष म्हणजे पहिलीस प्रवेश मिळतो व विद्यार्थ्याचे १४ वे वर्ष म्हणजे तो विद्यार्थी ९ वी इयत्तेत असतो . परंतु शाळा आठवीनंतर मुलांना मोफत शिक्षण देण्यास नकार देतात.
अनेक अश्या शाळा आहेत ज्या आरटीई अंतर्गत घेतलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवतात त्यांना प्रवेश देण्यास अनेक अडचणी निर्माण करतात. ह्याचा कोणालाही फरक पडत नाही . शासनाने ज्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके देतात त्याचप्रमाणे ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाही दिल्यास काहीही गैर ठरणार नाही. एकीकडे प्रशासन बालकामास विरोध करते व एकीकडे त्याच बालकांना शिक्षणासाठी अडवते.
अनेक ठिकाणी रस्ते तयार होतात , अनेक विकास कामांसाठी अनेक खर्च होतात परंतु शिक्षणाचा खर्च हा शासनास नकोसा वाटायला लागतो का कुणास ठाऊक? मुले ही देवाघरची फुले म्हणतात पण महाराष्ट्रातील फुले ही पाण्यावाचून व मुले ही शिक्षणावाचून कोमजतील याचे भान ना शासनाने राखले पाहिजे . महागाईच्या काळात शासनाने वह्या - पुस्तके यांचे दर वाढवले आहेत त्यावर अनेक कर लादले आहे म्हणून जर शिक्षणाचा समानार्थी शब्द हा महागाई आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक मुले शिक्षणासाठी झटणारे आहेत परंतु त्यांना यश येत नाही. आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंत मोफत प्रवेश असतो मग नववी दहावीचे अंत्यसंस्कार करायचे का ? जे मुले आरटीई योजनेतंर्गत , शासनाने केलेल्या शिक्षण सुविधांची मदत घेऊन शाळेत प्रवेश घेत असतील त्यांची परिस्थिती तुम्ही ओळखायला शिकले नाहीत. त्यांच्यावर तुम्ही मर्यादा आणलेली आहे. जर मुले शिकली तरच तुम्हाला विकासशील भारत मिळणार नाही. काही शाळांमध्ये शौचालये साफ नसतात त्यांना दारे नसतात तेथे पाण्यासंबंधी अनेक अडचणी उद्भवतात त्या समस्येचे निराकरण वर्ष संपेपर्यंत केले जात नाही.
काही ठिकाणी मैदान नाही. परीपाठ हा अडगळीत ठिकाणी पार पडला जातो , संगीताचे शिक्षक नाही , संगणक आहे संगणक शिक्षक नाही मग तुम्हाला प्रगतशील विद्यार्थी मिळणार कसा ? मुलांच्या अभ्यासक्रमात अनेक गोष्टी घुसवल्या जातात मात्र ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्यांवर लक्ष दिले जात नाही. पुस्तके ही आपली मित्रे म्हणतात व मित्रांना मित्रांपासून दूर करणे असे संविधानात लिहलेले आहे का ? मुलांना त्यांचा योग्य तो हक्क मिळणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी बाल हक्क संरक्षण आयोग यांनी स्पष्ट केले होते की कोणत्याही कारणाने बालकांचे निकाल राखून ठेवल्यास शाळांवर कारवाई करण्यात येईल परंतु शाळांनी ह्यास दुर्लक्ष केले व आज अनेक विद्यार्थांचे निकाल शाळेने राखले आहेत. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी अशा सर्व शाळा आपली मनमाणी करतात व विद्यार्थी व पालकांना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षरीत्या मानसिक त्रास देतात. शासन ज्या प्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मोफत देतात त्याचप्रमाणे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही द्यावे व त्याचप्रमाणे ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे असे न करता इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण करावे कारण काही विद्यार्थी उशीरा शाळेत प्रवेश घेतात यामुळे वयोगटामुळे हा हक्क मुलांना मिळत नाही. यामुळे पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात यावा तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कला दाखवण्यासाठी शासनाने तसेच शाळांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करावे . शासनाने व इतर कोणीही मुलांच्या शिक्षणात भेदभाव करू नये .
मंगळवार, ९ मे, २०२३
मुलांसाठी प्रतिबद्ध शाळा कशी असावी?
मुलांसाठी शाळा निवडतांना ह्या गोष्टी लक्षात घ्या....
“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”
Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...
-
"ओळखीची भीती" - मराठी लघुचित्रपट समीक्षा | जीवन केशरी 🎬 जीवन केशरी - मराठी माहिती संक...
-
दिव्यांच्या आभाळात नाचले बालरुप - बाल शिक्षण मंदिरात दीपोत्सवाचा उत्साह ...





