कृत्रिम बुद्धिमत्ता: एक संधी
AI व ML ची मातृभाषेतून ओळख!
पुस्तकाची प्रस्तावना
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या तंत्रज्ञानाने जगभरात क्रांती घडवून आणली आहे. परंतु अजूनही मराठी भाषिक विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील माहिती इंग्रजीतूनच मिळते, ज्यामुळे अनेक प्रतिभावान तरुण या संधींपासून वंचित राहतात.
"कृत्रिम बुद्धिमत्ता: एक संधी" हे पुस्तक या अडचणीचे निराकरण करते. मातृभाषेतून AI आणि ML च्या जगताशी परिचय करून देणारे हे मराठीतील पहिले व्यापक ग्रंथ आहे. या पुस्तकात 257 पानांमध्ये 30+ सखोल अध्याय आहेत जे विद्यार्थ्यांना संकल्पनेपासून ते व्यावहारिक वापरापर्यंत सर्व माहिती देतात.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ तांत्रिक माहितीच देत नाही, तर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक संधी, व्यावसायिक शक्यता आणि शासकीय क्षेत्रातील अवसरांची संपूर्ण माहिती देते. 11वी नंतर कोणती शाखा निवडावी, ITI/Polytechnic चा फायदा कसा घ्यावा, आणि AI क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या सवयी लागतात - या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत.
पुस्तकाची वैशिष्ट्ये
- सोप्या व मराठी भाषेत स्पष्टीकरण
- 30+ सखोल अध्याय – संकल्पनांसह उदाहरणांसहित समजावलेले
- AI/ML च्या मूलभूत कल्पना, वापर, टूल्स, अभ्यास मार्गदर्शन
- प्रश्नमंजुषा आणि मूल्यवर्धक उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक संधींचे विवेचन
- 11वी नंतर कोणती शाखा निवडावी?, ITI/Polytechnic ची भूमिका
- खाजगी विरुद्ध शासकीय संधी
- AI मध्ये व्यवसाय, नोकरी आणि शासकीय क्षेत्रातील संधींचा उलगडा
- ऑनलाइन शिकण्यासाठी लागणाऱ्या सवयी, टूल्स, आणि अॅप्सची माहिती
लक्षित वाचकवर्ग
जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक
नेतृत्व मंडळ
विद्यार्थिनी नेतृत्व विभाग
विद्यार्थी प्रतिनिधी
आमच्याशी जुडा
मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमच्या समुदायात सहभागी व्हा!
📱 WhatsApp समूह मध्ये जुडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा