Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, २० मार्च, २०२५

विक्रम नागरे यांची शिव कर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

 विक्रम नागरे यांची शिव कर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती



नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशानुसार विक्रम नागरे यांची शिव कर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी विक्रम नागरे यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीच्या प्रसंगी शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (आप्पा) करंजकर, सह संपर्क प्रमुख राजु (आण्णा) लवटे, आणि महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Python मधील व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स Python मधील व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ...