टीयुसीआयचे पाचवे राज्य अधिवेशन संपन्न
कल्याण ( ७ , आक्टोंबर ) :- टीयुसीआयचे पाचवे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात नवीन राज्य कमिटीची निवड करण्यात आली. ऍड. निलेश सोनवणे यांची अध्यक्षपदी तर अनिल सूर्यवंशी यांची सचिवपदी निवड झाली.
रविवार, 6 ऑक्टोबर 2024 रोजी कल्याण येथील ऍड. रीना बनसोडे सभागृहात हे अधिवेशन पार पडले. यावेळी टीयुसीआयचे अखिल भारतीय महासचिव कॉ. चार्ल्स जॉर्ज, सचिव कॉ. फ्रेडी ताज्जात, सचिव कॉ. चंद्रशेखर आणि केंद्रीय कमिटी सदस्य ऍड. आदेश बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कॉ. फ्रेडी ताज्जात यांनी आपल्या भाषणात सध्याच्या आर्थिक महामंदीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या महामंदीमुळे जगभरातील कष्टकरी जनतेचे शोषण होत आहे आणि लोककल्याणकारी योजना बंद केल्या जात आहेत. त्यांनी कामगार संघटनांना सज्ज होण्याचे आवाहन केले.
कॉ. चार्ल्स जॉर्ज यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. कॉ. चंद्रशेखर यांनी जनतेला सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन केले आणि कम्युनिस्ट पक्षाने सज्ज होण्याचे आवाहन केले.
अधिवेशनात 12 सदस्यीय राज्य कमिटीची निवड करण्यात आली. 13 ते 15 डिसेंबर या काळात हैदराबाद येथे होणाऱ्या टीयुसीआयच्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी प्रतिनिधी मंडळाची निवडही करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा