शिक्षक दिनानिमित्त नाशिकमधील विद्यार्थी समूहाचा अभिनव उपक्रम
नाशिक, ६ सप्टेंबर २०२४: राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक च्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत समूहाने शहरातील शिक्षकांचा विशेष सन्मान केला.
समूहाचे प्रमुख प्रसाद भालेकर यांनी सांगितले की, "शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांबद्दलच्या कृतज्ञतेचा आविष्कार करण्याचा दिवस आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला."
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांना कृतज्ञता पत्र आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समूहाच्या संपर्कातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या शिक्षकांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते, त्यांना मोबाईलवर कृतज्ञता पत्राची डिजिटल प्रत पाठवण्यात आली.
या उपक्रमामागील संकल्पना देणारे विद्यार्थी कु. अदित्य रिकामे आणि अनुष गोहिल यांनी सांगितले की, "आमच्या शिक्षकांनी आमच्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक छोटीशी कृती आहे."
जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक हा समूह नाशिक शहरातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समाजासमोर मांडणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारी ही संघटना अशा विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. आणि ह्या समूहात विद्यार्थ्यांचा स्वतः हून कार्यक्रम करण्यासाठी, उपक्रम राबविण्यासाठी मोठा सहभाग आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा हा राष्ट्रीय शिक्षक दिन समाजातील शिक्षकांचे योगदान अधोरेखित करतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होते.
या उपक्रमामुळे नाशिक शहरातील शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भविष्यात अशा अधिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा