जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत मौजे सुकेणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश !
मौजे सुकेणे ता निफाड येथील विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश प्राप्त केले त्याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, दिलीप काळे, अनिल उगले, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी व आदी |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ६- महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा सेना संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले सदर स्पर्धा जय भवानी व्यायाम शाळा मनमाड येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात ६७ किलो वजनी गटात पियुष पुरकर याची विभाग स्तरावर निवड झाली आहे तर या स्पर्धेत ६१ वजनी गटात कृष्णा काठे,६७ वजनी गटात वेदांत सोनवणे, ७३ वजनी गटात कृष्णा विधाते,९६ वजनी गटात मनीष नळे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत ४० किलो गटात तनया आढाव, ५९ वजनी गटात अक्षदा शेवकर व ६४ किलो वजनी गटात ईश्वरी हंडोरे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप काळे व अनिल उगले यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे उपसभापती डी बी मोगल, तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख, प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा