मौजे सुकेणे विद्यालयात
गणरायांना भावपूर्ण निरोप
विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप
मौजे सुकेणे विद्यालयात गणरायांना भावपूर्ण निरोपाप्रसंगी आरती करताना संस्थेचे उपसभापती डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे सेवक व विद्यार्थी |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २७ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात नवव्या दिवशी गणरायांना कलामंचच्या मिरवणुकीसह भावपूर्ण निरोप देण्यात आला सुरुवातीला मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्यासह सर्व विद्यार्थी व सेवकांनी गणरायाची आरती केली व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला सुरुवातीला विद्यालयातील सर्व शिक्षकांनी निधीचे संकलन करत बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध रीतीने दोन हजार विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे स्नेहभोजन देण्यात आले .
शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप |
दुपारी चार वाजता संगीत मंचच्या पथकाच्या सहाय्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला या मिरवणुकीत ९ वीच्या सर्व मुला-मुलींनी सहभागी होत गणरायांना घोषणा पूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला याप्रसंगी प्राचार्य दवंगे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा