मौजे सुकेणे विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांना अभिवादन
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे व आदी |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २०- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, अभिनवच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे आदींच्या हस्ते कर्मवीर मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक प्रा सचिन भंडारे यांनी केले यावेळी विद्यार्थी कु कल्पेश हळदे, कु ज्ञानेश्वरी शेवकर यांनी तर शिक्षकांच्या वतीने भारत मोगल यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या कार्याची ओळख करून दिली. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी संस्थेच्या आद्य संस्थापकांनी संस्थेचा पाया रचला आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून आपण या संस्थेचे घटक आहोत याचा सार्थ अभिमान आपणास हवा असे प्रतिपादन केले सूत्रसंचालन विलास डेर्ले, यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राचार्य दवंगे यांच्यासह चिंधु गांगुर्डे, भास्कर गांगुर्डे, संजय पवार, एकनाथ हळदे, सुनील टर्ले, तुषार हळदे, साहेबराव आहेर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा