Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

आयटक संघटनेचा उत्तर महाराष्ट्र मेळावा २७ ला संपन्न

 



आयटक संघटनेचा उत्तर 

महाराष्ट्र मेळावा २७ ला संपन्न 

 नाशिक: आयटक  संलग्न कामगार कर्मचारी संघटना चा उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा द्वारका नाशिक येथे  कॉ. दत्ता देशमुख सभागृह खरबंदा पार्क येथे पार पडला. सदर मेळावा केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणांच्या विरोधात एल्गार पुकारून त्याविरोधात आयोजलेल्या जनजागरण यात्रेच्या नियोजन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित केला  होता. मेळाव्यात नाशिक, अहमदनगर,नंदुरबार,धुळे, जळगाव जिल्ह्यातून सर्व संघटना, घटक संघटना,  आयटक संलग्न संघटना व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे अध्यक्ष  जेष्ठ विज कामगार आयटक नेते कॉम्रेड व्ही. डी. धनवटे होते तर प्रमुख मार्गदर्शक  आयटकच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत यांनी मार्गदर्शन केले .  आयटक राज्य सचिव कॉ. राजू देसले, राष्ट्रीय बिडी कामगार नेते कॉ.कारभारी उगले,आयटक राज्य सचिव कॉ. सुधीर टोकेकर , उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन, कॉ.सखाराम दुर्गुडे, कॉ.नामदेव बोराडे, कॉ. वैशाली खंदारे,  एस . खातिब ,हसीना शेख, माया घोलप, दत्तू तुपे भिका बांडे , राजेंद्र चौधरी, असे विविध संघटनेचे पदाधिकारी  मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल लेखक राकेश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी कॉ.मीनाताई आढाव यांची कन्या काजल आढाव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करून ज्युनियर इंजिनियर म्हणून विद्युत खात्यात नेमणूक झाल्याबद्दल आयटक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  तसेच महाराष्ट्र राज्य  कामगार कर्मचारी संघटना कृती समिती च्या राज्य सह निमंत्रक पदी कॉ. राजू देसले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सदर मेळावा आयटक महाराष्ट्राच्या वतीने राज्यात २० नोव्हेंबर २०२३  पासून कोल्हापूर येथून आयटक महाराष्ट्र वतीने  केन्द्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी धोरण विरोधात २० डिसेंबर २०२३ दरम्यान  राज्यव्यापी  जनजागरण यात्रा निघणार असून सदर यात्रा कोल्हापूर पासून सुरू होऊन नागपूरला समारोप होणार आहे. हि यात्रा उत्तर महाराष्ट्र प्रवेश केल्यावर  भव्य स्वरूपात स्वागत करून मोहिम यशस्वी करावी असे आवाहन आयटक राष्ट्रिय सचिव कॉ. बबली रावत यांनी केले. केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत आहे. योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, अंशकालीन स्री परिचर , उमेद, ग्राम रोजगार सेवक , आदींचे शोषण करत आहे. मणिपूर महिला अत्याचार  बाबत पंतप्रधान बोलत नाही. नवीन कामगार कायदे लागू झाले तर कामगार ना संघटित करणे कठीण होनार आहे. इपिएस 95 पेन्शनर 9हजार रूपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा यासाठी आंदोलन करतं आहे. कंत्राटी पद्धतीने शोषण सुरू आहे. वीज, बँक, विमा उद्योग खाजगीकरण करून विकण्याचे काम सुरु आहे. या विरोधात देशभर आयटक लढत आहे. महाराष्ट्र  आयटक वतीने 20नोव्हेंबर पासुन कोल्हापूर ते नागपूर राज्य व्यापी कामगार कर्मचारी धोरण विरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. व नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात वर 1लाख चा भव्य मोर्चा व्हावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.  2024 शेतकरी कामगार विरोधी, महागाई वाढवणारे,भाजप सरकारचा पराभव करावा असे आवाहन केले बबली रावत यांनी केले.

  मेळाव्याचे प्रास्तविक राजू देसले यांनी केले. उत्तरं महाराष्ट् त आयटक संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. जनजागरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.  मेळाव्याचे अध्यक्ष  धनवटे वि डी यांनी आयटक संगठना गेली 103  वर्ष  संघर्ष करित आहे. गाव तिथे आयटक चे सभासद आहेत. त्यामुळें यात्रेचे स्वागत जोरदार होईल. व्यापक जन जागृती साठी आजपासून सुरुवात करु या. सर्व संघटना नी तन मन धनाने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 मेळाव्यात खालील ठराव संमत करण्यात आले.

  1.  कामगार विरोधी केंद्र सरकारने ४ केलेले मागे घ्यावेत
  2. कांदा निर्यात शुल्क ४० टक्के निर्णय रद्द करावा.
  3.  मणिपूर महिला अत्याचार  चा निषेध
  4.   आशा, गट प्रवर्तक,  अंगणवाडी कर्मचारी, अंशकालीन स्री परिचर, उमेद, ग्राम रोजगार सेवक, शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, कंत्राटी नर्सेस कर्मचारी  आदींना शासकीय कर्मचारी दर्जा द्या.
  5.  गट प्रवर्तक ना राज्य शासकीय कर्मचारी दर्जा द्या. आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी ना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत  सुरू असलेल्या प्रक्रियेत गट प्रवर्तक चा समावेश करावा.
  6. कंत्राटी कामगार, योजना कर्मचारी ना दीपावली ला बोनस दया.
  7.  इ पी एस ९५पेंशनर्स ना ९हजार रूपये महागाई भत्ता सह पेन्शन लागू करा.
  8. ग्राम पंचायत कर्मचारी ना यावलकर समिती शिफारस लागू करा. पेन्शन द्या. जीप कर्मचारी दर्जा द्या
  9. वीज, बँक, विमा उद्योग चे खाजगीकरण थांबवा.
  10. जात, धर्म नावावर हिंसाचार थाबवा
  11. शेतकरी कामगार विरोधी धोरण रद्द करा
  12. विडी कामगार ना किमान वेतन लागू करा. राज्य शासनाने  भत्ता द्यावा.
  13. बांधकाम कामगार, घरेलु कामगार मंडळासाठी पुर्ण वेळ कर्मचारी दया. कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी रिक्त जागा त्वरित भरा.

 आदि ठराव करण्यात आले.

 मेळाव्यात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. . या प्रसंगी सुनिता कुलकर्णी, रेणुका वंजारी , सुरेखा खैरनार, चित्रा जगताप,  सुरेश पानसरे, निवृत्ती दातीर,  शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे , उषा अडांगळे,  आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात  सिता शेलके,  जयश्री गुरव, बाळू ढाकणे, राजेन्द्र जाधव, मंदाकिनी पाटिल, संगीता बिरारे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते. सूत्र संचलन भीमा पाटील यांनी केले. आभर  दत्तू तुपे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...