Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, १ मार्च, २०२५

आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

 आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

नाशिक:- विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे प्रयोग बघतांना मान्यवर 


नाशिक, २८ फेब्रुवारी २०२५: मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिर, गोरेराम लेन येथे मराठी राजभाषा दिन अर्थात कुसुमाग्रज जयंती आणि राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास शालेय समिती सदस्य अरुण बापूराव थेटे, बारकू रामभाऊ कोशिरे, सुभाष गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक के.के. तांदळे, तसेच जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय.बी. गायधनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी 'रमण प्रभावा'चा शोध लावला, त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता मॉन्टेसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग तयार करून प्रदर्शन भरवले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रयोगांविषयी सविस्तर माहिती दिली.

याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषणे व कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजनही करून मराठी भाषेचे महत्त्व आणि महती याविषयी जनजागृती केली.

शालेय समिती सदस्य सुभाष पाटील व शाळेचे मुख्याध्यापक के.के. तांदळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गावले यांनी केले, तर कार्यक्रमाचे फलक लेखन सविता पेखळे व शितल गडाख यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ पासून केंद्रीकृत पद्धतीने – जाणून घ्या महत्त्वाचे बदल

११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ पासून केंद्रीकृत पद्धतीने – जाणून घ्या महत्त्वाचे बदल  


राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्रातील ११ वी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण केंद्रीकृत पद्धतीने राबवली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ऑनलाइन पोर्टलवरून प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.  

 नवीन केंद्रीकृत पद्धती म्हणजे काय?  

- राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये या ऑनलाइन प्रणालीशी जोडली जातील.  
- विद्यार्थ्यांना फक्त एकाच ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरावा लागेल.  
- प्रवेशासाठी मेरिट लिस्ट आणि प्राधान्यक्रमानुसार जागा वाटप होईल.  
- गोंधळ, गैरव्यवहार आणि अतिरिक्त कागदपत्रांची गरज कमी होणार आहे.  

 प्रवेश प्रक्रियेत होणारे महत्त्वाचे बदल  

- प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागणार नाहीत.  
- ऑनलाइन मेरिट लिस्ट आणि जागा वाटप प्रणाली लागू होईल.  
- राज्यातील सर्व महाविद्यालयांसाठी एकाच पोर्टलवर प्रवेश अर्ज प्रक्रिया होणार.  
- प्रवेशाचा गोंधळ आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होईल.  
- महाविद्यालयांची प्रवेश क्षमता व उपलब्ध जागांनुसार प्रवेश दिला जाईल.  

 विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना  

- प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल.  
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी योग्य माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवा.  
- महाविद्यालय निवडताना अभ्यासक्रम व सुविधांचा विचार करा.  

शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी तपशील पाहा आणि अचूक माहिती मिळवा.  

तुमच्या ११ वी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा.  
जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक – तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तत्पर.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

 महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन 

नगरविकास विभागाच्या निधीतून प्रभाग क्र. २४ मध्ये विकासकामांना गती 


नवीन नाशिक: रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन करताना शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे 


नवीन नाशिक : उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून प्रभाग क्र. २४ मध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे सुरू आहेत. याच अनुषंगाने, महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील तसेच गजानन क्लास, एन-८ सेक्टर येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.  

शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे, शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना महानगर प्रमुख व प्रभाग क्र. २४ चे माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या प्रयत्नांतून या विकासकामांना मंजुरी मिळाली. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या मागणीला अखेर यश मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  


भूमिपूजन कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित नागरिकांनी प्रविण (बंटी) तिदमे यांचे विशेष आभार व्यक्त करत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभागातील रस्त्यांची सुधारणा होत असल्याचे गौरवोद्गार काढले.  

या प्रसंगी पुंडलिक चौधरी, रवि जाधव, अनिकेत भागवत, दुर्गेश चौधरी, संतोष निकम, दिनेश कडवे, पांडुरंग कडवे, संतोष खुडे, योगेश जाधव, संजय पाटील, शरद जाधव, प्रविण बनकर, शिवाजी खैरे, संकेत भागवत, मंगला शिरसागर, शुभम पवार यांच्यासह परिसरातील शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  

शासनाच्या पाठबळाने आणि स्थानिक नेतृत्वाच्या सहकार्याने प्रभाग क्र. २४ मध्ये होत असलेल्या या विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.  


— जीवन केशरी मराठी न्यूज पोर्टल, नाशिक

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्यातर्फे इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसाठी आवाहन

 जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्यातर्फे इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन



नाशिक:- मागील वर्षीप्रमाणे यंदाही जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्या वतीने इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.  

इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून १७ मार्च रोजी संपणार आहेत. त्यामुळे परीक्षेनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तके विक्री न करता गरजू विद्यार्थ्यांना दान करावीत. त्याचप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या परीक्षा झाल्यानंतर पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दान करण्यात आलेली पुस्तके संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरित केली जाणार आहेत. विशेषतः, जे विद्यार्थी पुस्तके दान करतील त्यांच्या हस्तेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येईल.  

विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असून, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, विविध संस्था आणि नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी खालील संपर्क क्रमांकावर संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधावा. तरी ह्या उपक्रमात नाशिक शहरातील सर्व शाळा , मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका, शिक्षक , विद्यार्थी, पालक, नागरीक, व्यवसायिक आदींनी सहभागी व्हावे. 

📞 संपर्क: 9529195688  

📧 ईमेल: jivankeshrimarathi@gmail.com  


(ठिकाण व आयोजनाची तारीख नंतर कळविण्यात येईल.)

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

 वेळेवर पाणीपुरवठा नाही? AI तंत्रज्ञान हा उपाय की कर्मचाऱ्यांसाठी धोका?

एआय प्रातिनिधिक चित्र 


शहर असो किंवा ग्रामीण भाग, नियमित पाणीपुरवठा ही आजही मोठी समस्या आहे. काही ठिकाणी वेळेवर पाणी येत नाही, काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असतो, तर काही ठिकाणी अनेक दिवस पाणीच मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन, गळती, चुकीचे नियोजन आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.

यावर उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान प्रभावी ठरू शकते. पण AI वापरल्यास कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका आहे का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.

AI तंत्रज्ञान कसे उपयोगी ठरू शकते?

AI च्या मदतीने स्वयंचलित पाणीपुरवठा व्यवस्थापन करता येऊ शकते. स्मार्ट सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्स वापरून कोणत्या भागात किती पाणी आवश्यक आहे, हे पूर्वनियोजित करता येईल. झडपा आणि पंप स्वयंचलितरित्या सुरू-बंद करून वेळेवर पाणीपुरवठा करता येईल.

पाईपलाइनमधील गळती ओळखण्यासाठी AI सेन्सर्स वापरता येतात. यामुळे पाण्याची नासाडी टाळता येते आणि गळतीस त्वरित दुरुस्त करता येते. नागरिकांना SMS किंवा अॅपद्वारे पाणीपुरवठ्याची माहितीही देता येईल.

GPS आधारित टॅंकर ट्रॅकिंग वापरून टॅंकरचा प्रवास आणि वेळ निश्चित करता येईल. जिथे नळाद्वारे पाणी पोहोचत नाही, तिथे टॅंकर वेळेवर पोहोचण्याची खात्री होईल. टॅंकर कोठे आहे, किती पाणी वाटप झाले, याचा संपूर्ण डेटा अॅनालिटिक्स ठेवला जातो.

AI च्या मदतीने पाणी चोरी आणि अनधिकृत वापर ट्रॅक करता येतो. स्मार्ट मीटर्स वापरून अचूक पाणी वापराचा हिशोब ठेवता येतो आणि जास्त वापर करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येते.

AI मुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका आहे का?

हे खरे आहे की AI स्वयंचलितपणे अनेक कामे करू शकते, पण त्यामुळे माणसांची गरज संपणार नाही. AI हे मदतनीस म्हणून काम करेल, पर्याय म्हणून नव्हे. कर्मचारी डेटा विश्लेषण, देखभाल आणि सुधारणा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. AI संपूर्णपणे माणसांच्या नियंत्रणाखाली असेल, त्यामुळे त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज कायम राहील.

भविष्यातील बदल

AI मुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतील. स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट ऑपरेटर, डेटा विश्लेषक, IoT आणि सेन्सर तज्ञ, तसेच पाणीपुरवठा मॉनिटरिंग तज्ञ अशी पदे निर्माण होतील.

निष्कर्ष

AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळेवर पाणीपुरवठा सुनिश्चित करता येईल, गळती कमी करता येईल आणि जलसंपत्तीचा योग्य वापर करता येईल. AI हे कर्मचाऱ्यांचा पर्याय नसून त्यांना अधिक सक्षम करण्याचे साधन आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतल्यास पाणीपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम होऊ शकते.

पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. AI च्या मदतीने आपण ते अधिक शहाणपणाने वापरू शकतो!


लेखक: जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

बाल शिक्षण मंदिर शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मविप्र संचलित बालशिक्षण मंदिर शाळेत ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक , वेशभूषेत विद्यार्थी आदी.


नाशिक ( दि. २६ ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन आणि आदर्श शिशु विहार शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संजय ढिकले, कोशिरे, थेठे, किरण पाटील, नंदकिशोर तांबे, पुनमताई भोसले, वत्सलाताई खैरे आणि जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाय. बी. गायधनी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध आणि रंगतदार परेडने उपस्थितांचे लक्ष वेधले. शाळेतील गीत मंचाने देशभक्तीपर गीते सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक के. के. तांदळे यांनी गुलाब पुष्प देऊन केले. 

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इच्छा चव्हाण, रेणुका मानकर आणि स्वरूप बळावकर या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील भाषणांनी पालक व मान्यवरांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनाही उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

शालेय समिती सदस्य सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गावले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.


रविवार, १९ जानेवारी, २०२५

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेतर्फे भव्य आरतीचे आयोजन

 अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेतर्फे भव्य आरतीचे आयोजन

शिवसेनेच्या बैठकीत कार्यक्रमाबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देताना शिवसेना उपनेते विजय करंजकर


नाशिक: अयोध्या येथील रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रामकुंड, नाशिक येथे प्रभू श्रीरामाची आरती आणि गंगा-गोदावरीची महाआरती होणार आहे.

नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रामभक्त आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, शिवसेना पक्षाच्या वतीने २३ ते २७ जानेवारी दरम्यान 'भगवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती (२३ जानेवारी) आणि धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती (२७ जानेवारी) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी ...