स्वातंत्र्य सैनिक कॉ.
माधवराव गायकवाड
जीवनगौरव पुरस्कार
२०२३ माजी मंत्री
बाळासाहेब थोरात यांना
जाहीर
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात |
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात |
नाशिक: छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नाशिक शाखा वतीने 30 वर्धापदिनानिमित्त व संस्थापक अध्यक्ष कॉ. माधवराव गायकवाड यांच्या ९९ जयंतनिमित्त दि. १६ जुलै २०२३रोजी सकाळीं १० वा. संस्था सभासद, ठेवीदार गुणवंत पाल्यांना सत्कार संस्थेच्या मेघदूत शॉपिंग सेंटर नाशिक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुनील ढिकले व कार्याध्यक्ष पदी मा. नारायण शेठ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सभासद सुवर्णा देसले यांना पी एच डी प्राप्त पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी प्रमूख म्हणून मार्गदर्शन करताना डॉ ढिकले यांनी छत्रपती नाशिक जिल्हा पतसंस्था 30वर्षा पासून नाशिक जिल्हा मध्ये सर्वसामान्य सभासदांना पुरवठा करून विकासाला चालना देत आहे. या बद्दल अभिनंदन केले. ८ शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्या सैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या कार्याला सलाम केला. संस्थेच्या हा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ नक्कीच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पत संस्था फेडरेशन नवं निर्वाचित जिल्हा अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी केले. नारायण वाजे यांनी सहकार चळवळीतील सभासद चे महत्व सांगितले. छत्रपती पतसंस्था चांगले काम करतं आहे. या बद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अॅड.साधना गायकवाड होत्या. त्यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे सहकार शेत्रातील कार्याची माहिती दिली. पुढील वर्ष कॉ.माधवराव गायकवाड यांचे 100वा. जयंती आहे. या निमित्ताने शेतकरी, कामगार, सहकार विषयावर मंधन आयोजित करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आनंद वेक्त केला.मंचावर व्हा.चेअरमन अॅड. शिवाजी जाधव, संचालक अॅड. दत्ता निकम, कॉ. राजू देसले, धर्मेंद्र जाधव, भागवत पाटील, श्याम गरुड, ओझर वेवस्थपक अण्णा गुर्गुडे, चारुदत्त पवार प्रा.सोमनाथ मुठाळ, अॅड. रिकब जैन संस्थेचे सभासद, अल्प बचत खातेदार, ठेवीदार उपास्थित होतें
सूत्र संचलन संचालक राजू देसले यांनी केले प्रास्ताविक चारुदत्त पवार यांनी केले. आभार शशिकिरन साखला यांनी केले. स्वागत भालचंद्र देसले, किरण मालुंजकर, राकेश वालझडे, रामदास बेंडकोली , रोहित कर्पे,
श्रीमाल यांनी केले.
आपले
ॲड दत्ता निकम कॉ राजू देसले संचालक
चारुदत्त पवार वेवस्थापक
अल्प बचत प्रतिनिधि कर्मचारी कर्मचारी वर्ग
नाशिक:- नुकतीच नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दि. ८ व ९ जुलै २०२३ या कालावधीत १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या स्पर्धकांनी अनेक पदके जिंकली. ह्यात नाशिकचा महेश देवकर , विष्णू देवकर व ओम मोरे यांनी रेगु ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले व १७ ते ४५ ह्या वयोगटात फाईट ह्या खेळाच्याप्रकारात कु. सलोनी बिडवे व दिवेश मुथा यांनी कांस्यपदक मिळविले व हर्षवर्धन जोशी ह्याने तुंगल ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले. ह्या स्पर्धेत सर्व विजेत्यांचे नाशिकचे मा. खासदार हेमंत ( आप्पा ) गोडसे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री. नागेश बनसोडे व मुख्य प्रशिक्षक श्री. किशोर येवले ( मुंबई ) ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा , महाविद्यालय आणि सर्व स्तरांतून सहभागी व विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदरच्या विद्यार्थ्यांचे १२ ते १५ २०२३ रोजी अखिल भारतीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ही स्व. मीना ताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी , आडगाव नाका, पंचवटी नाशिक - ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शाळा , महाविद्यालय यांनी सदरच्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
21 जिल्ह्याचे 215 खेळाडू तसेच महाराष्ट्र पोलीस टीम उपस्तिथ होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू विभागीय क्रीडा संकुल ,नाशिक येथे 12 ते 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या वरिष्ठ गटातील नॅशनल पिंच्याक सिल्या ट चॅम्पियनशिप ला खेळतील. व यातून फक्त टॉप 16 नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या 37 नॅशनल ला खेळतील. हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे. या खेळाला 5% आरक्षण आहे . या खेळाला युवक कल्याण आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशिया ची मान्यता आहे.हा खेळ एशियन गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्व् विद्यालय अश्या ऑफिशियल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. नुकताच 37 नॅशनल मध्ये याचा समावेश झाला आहे.
(छाया संग्रहित) |
STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...