महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन
नगरविकास विभागाच्या निधीतून प्रभाग क्र. २४ मध्ये विकासकामांना गती
नवीन नाशिक : उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून प्रभाग क्र. २४ मध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे सुरू आहेत. याच अनुषंगाने, महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील तसेच गजानन क्लास, एन-८ सेक्टर येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे, शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना महानगर प्रमुख व प्रभाग क्र. २४ चे माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या प्रयत्नांतून या विकासकामांना मंजुरी मिळाली. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या मागणीला अखेर यश मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भूमिपूजन कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित नागरिकांनी प्रविण (बंटी) तिदमे यांचे विशेष आभार व्यक्त करत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभागातील रस्त्यांची सुधारणा होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी पुंडलिक चौधरी, रवि जाधव, अनिकेत भागवत, दुर्गेश चौधरी, संतोष निकम, दिनेश कडवे, पांडुरंग कडवे, संतोष खुडे, योगेश जाधव, संजय पाटील, शरद जाधव, प्रविण बनकर, शिवाजी खैरे, संकेत भागवत, मंगला शिरसागर, शुभम पवार यांच्यासह परिसरातील शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शासनाच्या पाठबळाने आणि स्थानिक नेतृत्वाच्या सहकार्याने प्रभाग क्र. २४ मध्ये होत असलेल्या या विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
— जीवन केशरी मराठी न्यूज पोर्टल, नाशिक