Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २३ एप्रिल, २०२३

मोठी बातमी:- मनपाने थकविले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे मानधन!

(प्रातिनिधिक छायाचित्रे) 
लेखाविभागाने परत अंगणवाडी मानधन बाबत पाठविलेले बिले 

         मनपाने भविष्य निर्वाह निधी बाबत काढलेला  आदेश. 

नाशिक:- नाशिक महानगर पालिकेने प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आर्थिक बौद्धिक  तसेच मानसिक शोषण केले आहे. यावेळी नाशिक महानगर पालिकेने यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे फेब्रुवारी व मार्च २०२३ चे तसेच एप्रिल २०२३ असे एकूण तीन महिन्यांचे मानधन थकविले आहे. महिलांचे मानधनाची रक्कम ही प्रति महिला १ लाख नव्हे तर अवघे ४ ते ५ हजार आहे. हेही द्यायला नाशिक महानगर पालिका दिरंगाई करते . हे तीन महिने सर्व महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित पगार निघाले आहेत अपवाद म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस ! ह्यामुळे तीन महिने मानधन न निघाल्याने महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. व अंगणवाडी मध्ये एक - दोन नव्हे तर जवळपास ८०० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यात सर्व धर्मीय महिला आहेत. तसेच ह्यात विधवा , परित्यक्ता, अत्यंत हालाखिच्या परिस्थितीतून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला आहेत तसेच ह्या मासिक मानधनातून अंगणवाडीचे भाडे ह्या महिला आपल्या मानधनातून आजपर्यंत भरत आहेत याबाबत नगरपालिकेने आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. ऐन वेळी हिंदू धर्माचा अक्षय्य तृतीया व मुस्लिम धर्माचा रमजान ईद हा सण येत आहे. यात महिला आपला घरखर्च तसेच मुलांचा शैक्षणिक खर्च कसा भागवणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच नाशिक महानगर पालिकेने महिलांचा सलग चार वर्षे २०११ ते २०१६ पर्यंतचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नव्हता व जेव्हा ही बाब प्रशासानाच्या कामगार हितरक्षक सभेच्या वतीने लक्षात आणून दिली गेली तेव्हा महिलांकडून १२% रक्कम भविष्य निर्वाह निधी भरणेहेतू  आकारण्यात यावी असा आदेश काढण्यात आला. मासिक मानधनातून प्रति महिला १०००/- कपात करण्यात यावे असे आदेशात म्हटले होते.  परंतु यांस सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तीव्र विरोध केला कारण सलग चार वर्षे भविष्य निर्वाह निधी न भरणे हि प्रशासनाची फार मोठी चूक आहे तसेच महिलांचे मानधन हे फारच तुटपुंजे आहे त्यांच्या मानधनातून जर १०००/- कपात केल्यास महिला उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न उपस्थित झाला व आजपर्यंत कामगार हितरक्षक सभा ह्यांना लक्षात आणून देईपर्यंत प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष केले होते का ? प्रशासनाने जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे व महिलांनी यावर भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम नाशिक महानगर पालिकेने भरावी असा आग्रह धरला. परंतु महानगर पालिकेने महिलांचा ह्या निर्णयास विरोध पाहून महिलांचे सलग तीन महिन्यांचे मानधन दिलेले नाही यामुळे महिलांवर उपासमारीची तसेच आर्थिक कर्ज घेवून मरण्याची वेळ आली आहे तश्यातच सातपूर विभागातील अंगणवाडी कर्मचारी यांनी १०००/- नव्हे तर ५००/- कपात करावे असे निवेदन दिले ह्याचा हेतू हाच की महिलांना थकविलेले मानधन लवकर मिळेल.व आपल्या चिल्या-पिल्यांना सणासुदीचे दोन गोड घास मिळेल व मुलांचा शैक्षणिक खर्च भागविता येईल हाच होय. ह्या महिला जीव कुंठीत धरून तारेवरची कसरत करून दिवस काढत आहेत तरी नाशिक महानगर पालिका प्रशासनास विनम्रता पुर्वक सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस यांच्यातर्फे विनंती करण्यात येत आहे. प्रशासनाने याबाबत साकल्याने विचार करून लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करावे

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा युवाशाहीर प्रसाद भालेकर

 आदि नमन तुझं भगवती द्यावी मज मती 

गातो मी महती 

डॉ. भीमराव आंबेडकर 

राज्यघटनेचा शिल्पकार 

अन्यायावर केला न्यायाचा प्रहार.... जी.जी.जी 


१४ एप्रिल १८९१ चा सुर्य उजडला... 

क्रांति घडविण्याला 

 न्याय हक्कासाठी लढण्याला  

तेव्हा न्यायाची  , क्रांतीची मशाल धगधगली 


दलितांवर होतात अन्यायाचे वार 

बाबासाहेबांनी केले न्यायाचे प्रहार 

शिक्षणाची घेवून नाव 

दलित , गरिबांसाठी घेतली धाव 

असा हा भारताचा महामानव जी... 


अश्या ह्या महामानवाची क्रीती बेफाम 

इंग्रज , बिट्रिशांना फुटला घाम 

भारत सोडून गेले लांब 

अन् झाला नव्या भारताचा प्रारंभ जी... 


दिले न्याय, हक्क मानवांस

चवदार तळ्याचे पाणी उघडले दलितांस 

जातिभेदाचा मोडला फास 

क्रिर्तीचा डंका भिडे गगणास जी...

लेखक :- युवाशाहीर प्रसाद भालेकर 

मो. ९५२९१९५६८८ 

शाळेचे नाव:- मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक - १ 

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...